Letest News
ड्रेनेजची तक्रार केली म्हणून महिलेवर हात उचलला! लाथाबुक्क्यांनी मारहाण दगडाने डोके फोडले ‘कुटुंबाला... शिर्डीत भक्तिमय वातावरणात श्री गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात अनाथ बालकांसोबत ‘दबंग’ अधिकाऱ्याचा वाढदिवस!कायदा-सुव्यवस्थेत कणखर भूमिका सामाजिक जाणीवेतही तितकीच सं... मध्यस्थीची भावना जुनी आधुनिक स्वरूप अधिक परिणामकारक! — न्या. शिवाजी कचरे प्रमुख जिल्हा व सत्र न्याया... कडक शिस्तीच्या अधिकाऱ्याला सर्वपक्षीय सलाम! अमोल मोरे यांची प्रांताधिकारीपदी पदोन्नती सापडलेला लाखाचा मोबाईल साईभक्ताला परत संस्थान कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाला सलाम! निर्व्यसनी तरुणाईची एकजूट ढोल-ताशांच्या गजरात रंगणार गोविंदांचा जल्लोष शिर्डीच्या साईदरबारी भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा गोकुळाष्टमीनिमित्त साईचरणी सोन्याचा ब्रोच अर्पण भगवान थोरात यांची ग्राहक संरक्षण समितीच्या राहाता तालुका प्रवक्तेपदी नियुक्ती
राजकीयशिर्डी

साई चरणी ३५०७ किलो सेंद्रिय केशर आंब्याचे अर्पण भाविकांना तीन दिवस आमरसाची मेजवानी

शिर्डी : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील नारायणवाडी (नारायणबाग) येथील प्रगतशील शेतकरी श्री. रवी नारायण कराळे यांनी साईबाबांप्रती असलेली आपली श्रद्धा व्यक्त करत तब्बल ३५०७ किलो सेंद्रिय केशर आंबा श्री साई चरणी प्रसाद स्वरूपात अर्पण केला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून श्री. कराळे हे पूर्णतः सेंद्रिय पद्धतीने केशर आंब्याचे उत्पादन घेत आहेत. कोणत्याही रासायनिक खतांचा किंवा घातक औषधांचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीने तयार करण्यात आलेल्या या दर्जेदार आंब्यामुळे साईभक्तांना आरोग्यदायी आणि शुद्ध आमरसाचा आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


या सेंद्रिय केशर आंब्यापासून तयार करण्यात आलेला स्वादिष्ट आमरस आजपासून पुढील तीन दिवस श्री साईबाबा संस्थानच्या प्रसादालयामध्ये प्रसाद भोजनासोबत भाविकांना दिला जाणार आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत साईभक्तांसाठी ही खास “आमरस मेजवानी” ठरणार असून भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
साईबाबांच्या चरणी अर्पण झालेला हा आंबा केवळ फळांचा प्रसाद नसून श्रद्धा, सेवा आणि शुद्धतेचे प्रतीक असल्याची भावना अनेक भाविकांनी व्यक्त केली. भक्तीभावातून केलेल्या या अनोख्या सेवेमुळे श्री. रवी नारायण कराळे यांच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
“साईंच्या प्रसादात गोडवा…
आणि भक्तीमध्ये सेंद्रिय सुवास!”

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button