Letest News
पाथर्डीत समता पतसंस्थेचा गाशा गुंडाळला? ठेवीदारांचे लाखो अडकले? पाथर्डीत एकच खळबळ समता पतसंस्थेच्या घोटाळ्यात ED ची मोठी एन्ट्री-अशोक खरातच्या लॉकरमधून कोट्यवधींचं घबाड “साईप्रसाद की भ्रष्टाचार?” प्रसादालयातील खरेदीवर गंभीर प्रश्नचिन्ह शिर्डीत फसवणुकीचा नवा डाव! गजराच्या नावाखाली भाविकांची लूट लोणीत गर्भलिंग निदान रॅकेटचा मोठा पर्दाफाश- आणखी १ डॉक्टरसह २ एजंट जाळ्यात निमगाव को-हाळे बायपासवर भीषण अपघात — कातोरे वस्ती हादरली! काका कोयटे हजर हो! SID ची नोटीस-समता पतसंस्थेत १००+ बोगस खाती? सावकारीच्या जाळ्यात अडकलेले शिर्डी? खरात अटकेत-मोठ्या नावांची धास्ती!” “पोलीसांचा मोठा फटका! अशोक खर... शिर्डीची लेक ठरली उज्ज्वल यशाची प्रेरणा — डॉ. सृष्टी सोनवणे यांचे एमबीबीएसमध्ये उच्च श्रेणीने यश शिर्डीला जोडणाऱ्या रस्त्यासाठी २१३ कोटी रुपयांची तरतूद
क्राईमशिर्डी

बकरी ईद दरम्यान गोठ्यातून बांधलेल्या सहा बोकडांची चोरी!

शिर्डी (प्रतिनिधी)

sai nirman
जाहिरात

राहता तालुक्यातील सावळीविहीर खुर्द येथील गोठ्या मधून बांधलेले सहा बोकड चोरी गेले. मालेगाव येथून सहा बोकड खरेदी करून ते सावळीविहीर खुर्द येथील गोठ्यामध्ये बांधून ठेवलेले असताना रात्री अज्ञात इसमाने या सहा बोकडांची बकरीच्या ईद अगोदर चोरी केली आहे.

DN SPORTS

kamlakar

यासंदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,याबाबत बरकत युसुफ खाटीक यांने शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की,


माझे स्वताचे मटनाचा व्यवसाय असुन त्यावर आमचे कुटुंबाची उपजीवीका करतो. माझा सावळीविहीर खु शिवारात गट नंबर 148 मध्ये माझी 10 गुंठे जागा असुन त्यामध्ये माझा शेळ्याचा गोठा आहे. त्यामध्ये मी माझे मटणाच्या दुकानासाठी खरेदी केलेल्या शेळ्या व बोकड ठेवत असतो तसेच मी पाळलेल्या शेळ्या व बोकड त्यांच गोठ्यामध्ये असतात.


दि. 26/05/2025 रोजी रात्री 11/00 वाजण्याचे सुमारास भी मालेगाव येथुन सहा बोकड खरेदी करुन माझ्या सावळीविहीर खु ॥ येथील गोठ्या मध्ये बांधुन घरी गेलो. तेव्हा माझे अगोदर खरेदी केलेले सहा बोकड तेथेच बांधलेले होते त्यानंतर मी व माझा भाऊ अकील असे दिनांक 27/05/2025 रोजी सकाळी 06/30 वाजण्याच्या सुमारास माझ्या शेळ्याच्या गोठयावर गेलो


तेंव्हा 26/05/2025 रोजी मालेगाव येथील बाजारातून खरेदी केलेले एकूण साठ हजार रुपये किमंतीचे सहा बोकड दिसुन आले नाही. त्यांचा गोठ्याच्या आजुबाजुला शोध घेतला असता ते दिसुन आले नाही .

कोणीतरी अज्ञात चोरटयाने ते चोरुन नेले आहे. अशी फिर्याद शिर्डी पोलीस स्टेशनला दिल्यानंतर शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button