Letest News
नगर-मनमाड महामार्गाची साडेसाती संपणार कधी? सहा वर्षांत तीन कंत्राटदार बदलले तरी लोकप्रतिनिधींचे मौन ... तोतया पत्रकारांची धाड की खंडणीचा डाव? महिलेकडे मागितले तब्बल एक लाख! ग्रामपंचायत अधिकाऱ्याची १० हजारांची लाच मागणी ५ हजार घेताना ACBच्या जाळ्यात! साईबाबांच्या बदनामीकारक व्हिडीओंना चाप बसणार! दिल्ली उच्च न्यायालयाचे GAC ला दणका शिर्डीत १३ ते २१ ऑगस्टदरम्यान साईसच्चरित पारायण सोहळा! धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका...
राजकीयशिर्डी

#Shirdi #Saibaba #TatyaKotePatil #साईबाबांचे जिवलग भक्त कै. तात्याजी गणपतराव कोते पाटील यांची ८१ वी पुण्यतिथी उद्या भक्तिभावात

शिर्डी :
शिर्डीच्या इतिहासात साईबाबांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू भक्त म्हणून ओळखले जाणारे कै. तात्याजी गणपतराव कोते पाटील यांची ८१ वी पुण्यतिथी गुरुवार दि. १२ मार्च २०२६ रोजी शिर्डी येथे भक्तिभावाने साजरी करण्यात येणार आहे. या पुण्यतिथीनिमित्त धार्मिक कार्यक्रम, कीर्तन तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून साईभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


कै. तात्याजी कोते पाटील हे साईबाबांचे अत्यंत निकटवर्ती भक्त होते. साईबाबांनी त्यांना आपल्या सख्ख्या भावाप्रमाणे मान दिला होता, तर तात्याजींच्या मातोश्री बायजामाई यांना साईबाबा आईप्रमाणे मानत असत. बायजामाई यांनी साईबाबांची आयुष्यभर मातेसारखी सेवा केली होती. त्यामुळे साईबाबा आणि कोते पाटील कुटुंब यांचे नाते अतूट आणि भावनिक मानले जाते. शिर्डीच्या धार्मिक व सामाजिक परंपरेत या कुटुंबाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.


पुण्यतिथीनिमित्त सकाळी ७ ते ९ या वेळेत कै. तात्याजी कोते पाटील यांच्या समाधीचे पूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत समाज प्रबोधनकार ह.भ.प. कृष्णानंद महाराज (बेलापूर) यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. या कीर्तनातून साईभक्ती, संत परंपरा तसेच समाजप्रबोधनाचे संदेश दिले जाणार आहेत.


तसेच साईबाबांच्या माध्यान्ह आरतीनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सर्व साईभक्तांना महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा संपूर्ण कार्यक्रम श्री साईबाबा मंदिर परिसरातील कै. तात्याजी कोते पाटील यांच्या समाधीस्थळी पार पडणार आहे.


हा धार्मिक सोहळा साईभक्त कै. तात्याजी कोते पाटील भक्त मंडळ तसेच समस्त कोते पाटील परिवार, शिर्डी यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. साईबाबांचे जिवलग भक्त असलेल्या तात्याजींच्या पुण्यस्मरणानिमित्त दरवर्षी हा कार्यक्रम भक्तिभावाने साजरा केला जातो आणि त्याला मोठ्या संख्येने साईभक्त उपस्थित राहतात.
या पुण्यतिथी सोहळ्याला उपस्थित राहून साईभक्तांनी श्रद्धांजली अर्पण करावी आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button