Letest News
अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी! तीन किलोमीटर दूर श्रीराम मंदिर कशासाठी? साईभक्त डॉ. एस. बी. गोंदकर पाटील यांचा प्रांजळ आग्रह समता पतसंस्थेच्या बोगस खात्याप्रकरणी आरोपी अशोक खरात न्यायालयीन कोठडीत भाविकांच्या कथित आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीनंतर दुकान सील मात्र गुन्हा दाखल न झाल्याने संताप शिर्डी पोलिसांची दमदार कामगिरी!मंदिर परिसरातून बेपत्ता झालेली १२ वर्षीय चिमुरडी काही तासांत सुखरूप आ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी पालकमंत्र्यांच्या बैठकीकडे भाजप पदाधिकाऱ्यांची पाठ; विखे यांना कर्जतमध्येच धक्का? शिर्डीतील 'झिंग्या'वर एमपीडीएचा बुलडोझर- खून-अपहरण-मारहाण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराची थेट नाशिक कारा... लेंडीबागेत नव्हे तर आरक्षित जागेवर उभारा भव्य श्रीराम-श्रीकृष्ण मंदिर! शिर्डी ग्रामस्थांचे साई संस्थ...
अ.नगरक्राईम

ड्रग्स स्फोटाने राजकारण पेटलं-सुजय विखेंचं पोलिसांना अल्टिमेटम “गुंड दीपक पोकळेच्या कार्यालयाचे उद्घाटन कोणी केले? खासदार नीलेश लंके

अहिल्यानगर / पुणे | प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यात पकडलेल्या मोठ्या ड्रग्स साठ्याने राज्याच्या राजकारणात अक्षरशः आग पेटली असून, या प्रकरणावरून आरोप‑प्रत्यारोपांची धग दिवसेंदिवस वाढत चालली आहे. भाजप नेते सुजय विखे यांनी खासदाराचे नाव न घेता अप्रत्यक्ष आरोप करत पोलीस यंत्रणेलाच जाहीर चॅलेंज दिले आहे.
“येत्या आठ दिवसांत पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन ड्रग्स कोणाचे होते आणि पारनेर येथे कोणाकडे ठेवले होते याचा खुलासा करावा, अन्यथा पुढील आठ दिवसांनंतर मीच सर्व पुरावे उघड करेन,” असा थेट इशारा सुजय विखे यांनी दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.  

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

“गुंड दीपक पोकळेच्या शिर्डी येथे कार्यालयाचे उद्घाटन कोणी केले? शिर्डीत हारात उभे असलेले चेहरे कोणाचे? – खासदार नीलेश लंके यांचा थेट राजकीय स्फोट”
पुणे जिल्ह्यातील ड्रग्स साठ्याच्या कारवाईनंतर राज्यात राजकारण तापले असतानाच, या वादाला आता वेगळीच कलाटणी मिळाली आहे. ड्रग्स प्रकरणात अप्रत्यक्षपणे आपले नाव जोडले जात असल्यावर खासदार नीलेश लंके यांनी आक्रमक पवित्रा घेत विरोधकांच्या गोटात खळबळ उडवून दिली आहे. “पारनेरकडे बोट दाखवण्याआधी तुमच्या मतदारसंघातील गुन्हेगारीचा आरसा पाहा,” असा थेट हल्ला करत लंके यांनी राहता येथील कुख्यात गुंड दीपक पोकळ प्रकरण उघड्यावर आणले.
लंके म्हणाले,


“राहता येथील गुंड दीपक पोकळच्या शिर्डी येथील कार्यालयाचे उद्घाटन कोणी केले? त्या कार्यालयावर कोणाचे नाव झळकत होते? शिर्डी येथे त्याच्या भव्य उद्घाटनावेळी आणि स्वागतावेळी हारात उभे असलेले नेते कोण होते, हे आधी जनतेला सांगा.”
राहाता मतदार संघातील याच गुंडाने  एका निष्पाप तरुणाचा जीव अत्यंत क्रूरपणे घेतला, याची आठवण करून देत लंके यांनी विरोधकांवर मौन बाळगल्याचा गंभीर आरोप केला.
“त्या हत्येवर तुमची तोंडं का बंद होती? त्या निष्पापाच्या कुटुंबासाठी तुम्ही आवाज का उठवला नाही?” असा थेट सवाल त्यांनी केला.


राजकीय आश्रयाशिवाय अशी गुंडगिरी फोफावत नाही, असा सूचक इशारा देत लंके म्हणाले,
शिर्डीत “गुंडांना हार घालून मिरवणारे लोक आज ड्रग्सवर बोलत आहेत, हे हास्यास्पद आहे.”
“माझं नाव घेतल्याशिवाय काहींचा दिवस जात नाही,” असे म्हणत लंके यांनी विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करत शेवटी अत्यंत बोचऱ्या शब्दांत सांगितले –
“हाथी चलता है… कुत्ते भोकते है!”

राजकीय वरदहस्त असलेला राहाता तालुक्यात दीपक पोकळचे दोन नंबर धंदे आजही तेजीत… गुटखा तस्कर खाबिया आणि बंटीची खुलेआम तस्करी सुरु तरी मौन का?
राहता परिसरात गुंड दीपक पोकळ याचे दोन नंबर धंदे आजही खुलेआम सुरू आहेत. अवैध व्यवहार, दहशत, आर्थिक वसुली आणि गुन्हेगारी नेटवर्क याबाबत स्थानिक पातळीवर वारंवार तक्रारी होत असतानाही, संबंधित यंत्रणा मात्र गप्प का आहेत? हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. यात सर्वच यंत्रणा मोहमायात अडकलेली दिसते?
दीपक पोकळ याच्यावर यापूर्वी गंभीर गुन्ह्यांची नोंद असूनही
➡️ त्याचे नेटवर्क मोडीत काढले गेले का?
➡️ त्याच्या आर्थिक स्रोतांची चौकशी झाली का?
➡️ राहाता मतदारसंघात त्याच्या दोन नंबर धंद्यांवर ठोस कारवाई का होत नाही? राहाता तालुक्यात खाबिया व बंटीची राजरोसपणे गुटखा तस्करी सुरूच आहे 


असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. विशेष म्हणजे, एका निष्पाप तरुणाच्या हत्येशी नाव जोडले गेलेल्या व्यक्तीचे अवैध व्यवहार आजही सुरू असतील, तर यामागे राजकीय किंवा प्रशासकीय वरदहस्त तर नाही ना? अशी शंका नागरिक व्यक्त करत आहेत.
ड्रग्स, गुन्हेगारी आणि संघटित टोळ्यांवर कठोर भूमिका घेतली जात असताना, दीपक पोकळसारख्या व्यक्तीबाबत मात्र निवडक शांतता का पाळली जाते?
हा मौनाचा पडदा आता हटवण्याची गरज असल्याची भावना परिसरातील नागरिकांतून व्यक्त होत आहे.



जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button