Letest News
“गुन्हेगारीचे उदात्तीकरण आक्षेपार्ह रील्स अन् वाढीव साऊंड खपवून घेणार नाही!” — भारती-गलांडे यांचा मं... पत्रकार’ असल्याचे सांगत पाच हजारांची खंडणी!तहसीलदार-प्रांत अधिकाऱ्यांकडून कारवाई करवून घेण्याची धमकी समृद्धी महामार्गावर दरोड्याचा डाव उधळला! तलवार- कत्ती- पंक्चर करण्यासाठी खिळ्यांच्या फळ्या अन् बनावट... मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे द... राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ४९४१९ इतकी प्रकरणे निकाली आणि साधारणतः ४९ कोटी रुपयांची तडजोड शिर्डी विकास सोसायटीत ‘एकाच खुर्ची’चा बादशहा! सचिव बडे यांच्याविरोधात सभासदांचा एल्गार सचिन गोंदकर यांच्या अकाली निधनाने शिर्डीत हळहळ डॉ. एकनाथ काका गोंदकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर “कुठे ट्रम्प कुठे गल्लीतील फिरणारे तुम्ही?” पिपाडांचा सुजय विखेंवर घणाघात! बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा दणका! विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोन भंगार दुकानदारांवर गुन्हे ... शांत, संयमी पण कायद्याच्या अंमलबजावणीत दबंग अधिकारी रणजीत गलांडे यांचा वाढदिवस
राजकीयशिर्डी

“साईबाबांची पालखी समोर असताना कुठल्याही संकटाची भीती नाही!” — निस्सीम साईभक्त विजयभाऊ कोते

शिर्डी : साईबाबांच्या पवित्र नगरीतून श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाचा महासागर घेऊन हजारो साईभक्त काशी, अयोध्या आणि नेपाळमधील पशुपतिनाथाच्या पवित्र दर्शनासाठी रवाना झाले आहेत. श्री साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट आणि साई निर्माण ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या विशेष धार्मिक यात्रेला साईनामाच्या जयघोषात आणि साईबाबांच्या कृपेच्या विश्वासात भक्तिमय प्रारंभ झाला.

sai nirman
जाहिरात

“साईनाथ महाराज की जय… ओम साईराम…” या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. साईबाबांची पालखी पुढे आणि हजारो साईभक्त मागे, असे अद्भुत आणि भारावून टाकणारे दृश्य यावेळी पाहायला मिळाले.

या विशेष रेल्वे यात्रेत सुमारे दीड हजार साईभक्त सहभागी झाले असून त्यामध्ये तब्बल एक हजार महिलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, गेल्या अनेक वर्षांपासून साईभक्तांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या या यात्रेच्या माध्यमातून हजारो भाविकांनी देशभरातील प्रमुख तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेतले आहे.

DN SPORTS

१० वर्षांत १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन; आता संकल्पपूर्ती यात्रेत पशुपतिनाथ दर्शन

निस्सीम साईभक्त विजयभाऊ कोते यांनी सांगितले की, गेल्या दहा वर्षांमध्ये साईभक्तांसोबत १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन पूर्ण करण्यात आले असून ही यात्रा संकल्पपूर्ती यात्रेचा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.

ते म्हणाले, “दरवर्षी साईबाबांच्या पारायणानंतर ही यात्रा आयोजित करण्यात येते. यापूर्वी बद्रीनाथ आणि केदारनाथ यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काशी, अयोध्या, गोरखपूर, मनोकामना मंदिर आणि काठमांडूमधील पशुपतिनाथ मंदिराचे दर्शन घेण्याचा योग साईभक्तांना मिळणार आहे.”

या यात्रेदरम्यान साईबाबांची पवित्र पालखीही भाविकांसोबत असणार असून, विविध तीर्थक्षेत्रांमध्ये साईभक्तीचा संदेश पोहोचविण्यात येणार आहे.

अल्पदरात विशेष रेल्वे यात्रा; महिलांचा उत्स्फूर्त सहभाग हे वैशिष्ट्य

kamlakar

या यात्रेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे साईभक्तांसाठी अत्यंत अल्पदरात विशेष रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेषतः महिलांचा मोठ्या प्रमाणात असलेला सहभाग ही या यात्रेची जमेची बाजू ठरत आहे.

विजयभाऊ कोते यांनी सांगितले की, “या यात्रेमध्ये सहभागी होणाऱ्या भाविकांमध्ये महिलांची संख्या मोठी आहे. कुटुंबातील महिलाही कोणत्याही भीतीशिवाय आणि पूर्ण विश्वासाने या यात्रेत सहभागी होतात. कारण त्यांना विश्वास आहे की साईबाबांची पालखी सोबत आहे आणि सर्वांचे दर्शन आनंदाने व सुखरूप पूर्ण होईल.”

नेपाळमधील परिस्थिती सुरक्षित; यात्रेला कोणताही धोका नाही

नेपाळमध्ये अलीकडेच निर्माण झालेल्या विपरीत परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यात्रेच्या सुरक्षेबाबत विचारण्यात आले असता विजयभाऊ कोते यांनी सांगितले की, यात्रेचे संपूर्ण नियोजन आणि परिस्थितीची माहिती घेण्यात आली आहे.

“ज्या ठिकाणी साईबाबांची कृपा आणि पालखी सोबत असते, त्या ठिकाणी कोणतीही अडचण येणार नाही, असा सर्व साईभक्तांचा विश्वास आहे. नेपाळमधील परिस्थितीबाबत स्थानिक पातळीवर माहिती घेण्यात आली आहे. पशुपतिनाथ परिसर सुरक्षित असून अलीकडील आपत्तीचे ठिकाण यात्रेच्या मार्गापासून सुमारे २०० किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती मिळाली आहे,” असे त्यांनी सांगितले.

तसेच पशुपतिनाथ मंदिर परिसरातील साईबाबा मंदिराच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून तेथील परिस्थितीची माहिती घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

“जिथे बाबा, तिथे भक्तांचा विश्वास”

साईबाबांची पालखी, हजारो भक्तांचा उत्साह आणि मनामध्ये दर्शनाची ओढ घेऊन निघालेली ही विशेष यात्रा केवळ तीर्थयात्रा नसून श्रद्धेचा एक अनोखा प्रवास ठरत आहे.

काशीच्या विश्वनाथापासून अयोध्येच्या रामलल्लापर्यंत आणि नेपाळच्या पशुपतिनाथापर्यंत साईभक्तीचा जयघोष पोहोचविणारी ही संकल्पपूर्ती यात्रा साईबाबांच्या चरणी अर्पण झालेली श्रद्धेची अनोखी भेट ठरत आहे.

“साईनाथ महाराज की जय… ओम साईराम…” या अखंड नामस्मरणात हजारो साईभक्तांचा हा भक्तिमय प्रवास आता काशी, अयोध्या आणि पशुपतिनाथाच्या पवित्र दर्शनासाठी पुढे मार्गक्रमण करीत आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button