Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
अ.नगरराजकीय

मित्र पक्षात युती नाही झाली तर शिवसेना स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार सदाशिव लोखंडे

शिर्डी प्रतिनिधी/ शिर्डी लोकसभा मतदारसंघातील एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेना कार्यकर्त्याची बैठक आयोजित करण्यात आली होती शिवसेना सदस्य नोदणी अभियान सुरू करण्यात आले आहे त्या बाबत नियोजन बैठक माजी खासदार सदाशिव लोखंडे आ विठ्ठलराव सध्या, राहुल खताळ,माजी आमदार भाऊसाहेब कांबळे शिवसेना जिल्हा प्रमुख कमलाकर कोते नितीन औताडे नाशिकचे माजी महापौर अजय बोरास्ते आदी सह विविध मान्यवर उपस्थित होते

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

यावेळी बोलताना माजी खासदार सदाशिव लोखंडे म्हणाले की आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका मित्र पक्षात युती झाली नाही तर एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना स्वबळावर लडणार आहे जो पक्ष निर्णय देईल त्यानुसार काम करु असे सांगितले


लोखंडे पुढे म्हणाले की राहता कोपरगाव श्रीरामपूर येथे अतिक्रमण कारवाई झाली आहे ज्या दुकानदारावर अन्याय झाला त्याचे पुनर्वसन झाले पाहिजे यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे अशी भूमिका व्यक्त केली नाशिक महानगर पालिकेचे माजी महापौर अजय बोरास्ते म्हणाले की तळागाळापर्यंत शिवसेनेचे कार्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोहचवण्यासाठी शिवसेनेची सदस्य नोदणी अभियानाचा उद्देश आहे

त्यांनी जे निर्णय घेतले जनतेपर्यंत जावे त्याचा सामान्य जनतेला फायदा झाला पाहिजे शिंदे हे १८ तास काम करणारे नेते आहे लाडकी बहिण शेतकरी बेरोजगार यांना न्याय दिला आहे सामान्य माणसाच्या वेदना त्याना माहिती आहे एकनाथ शिंदे याची शिवसेना खरी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर काम करणारी शिवसेना ठरली आहे मोठ्या प्रमाणावर सदस्य नोदणी होईल असा विश्वास व्यक्त केला

या प्रसंगी नितीन औताडे म्हणाले की प्रत्येक तालुक्यात ३०ते ३५ हजार व शिर्डी लोकसभा मतदार संघात दिड ते दोन लाख सदस्य नोंदणी साठी शिवसेनेचे पदाधिकारी एक विचाराने काम करतील असा विश्वास व्यक्त केला यावेळी शिवसेना महिला आघाडी युवा सेना महिला आघाडी प्रमुख सुनिता शेळके विमलताई पुडे शुभम वाघ महेश देशमुख आदीसह मान्यवर उपस्थित होते

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button