Letest News
पती बेपत्ता म्हणून पत्नीची पोलिसांत तक्रार शोध घेताना समोर आला धक्कादायक प्रकार! पत्नीच्या नावाने रू... पैशांसाठी विवाहितेचा छळ चारित्र्यावर संशय घेत मारहाण‘गाडी घेण्यासाठी माहेरून पैसे आण नाहीतर जिवंत सो... ओबीसी मोर्चाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुखपदी बाळासाहेब गाडेकर शिर्डीत साईबाबांच्या धुपारतीच्या वेळेत बदल श्रावण सोमवारी सायंकाळी ६ वाजताच धुपारती चक्क भरदिवसा किराणा दुकानाचा गल्ला साफ! दान करायला आले अन् सोन्याची पोत घेऊन पसार!शिर्डीत महिलेची हातचलाखीने फसवणूक ४० हजारांचे सोने लंपास NH-160 च्या निकृष्ट कामावर पिपाडांचा हल्लाबोल!ठेकेदार सल्लागार एजन्सी व दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाख... शिर्डी मतदारसंघात मतदारांची धक्कादायक घट ४० हजारांहून अधिक अर्ज जमा नाहीत! सिब्बलांच्या मागणीने ठाकरेंच्या मनातील ‘धनुष्यबाण’ बाहेर? श्रीकांत शिंदेंचा शिर्डीतून घणाघात! दहीहंडी फोडून पारायण सोहळ्याची सांगता ८ हजार २०० पारायणार्थींचा सहभाग — साईनामाच्या जयघोषाने शिर्डी ...
राजकीयशिर्डी

दीड लाखांचे दागिने सापडूनही मोह टाळला-स्वच्छता कर्मचाऱ्याने जपला साईसेवेचा मान

शिर्डी : श्री साईबाबा संस्थानच्या सेवेत कार्यरत असलेल्या स्वच्छता विभागाच्या बाह्यस्त्रोत कंत्राटी महिला कर्मचारी सौ. रेखा रविंद्र अवचिते यांनी आपल्या प्रामाणिकपणाचा आदर्श घालून देत साईनगरीची मान उंचावली आहे.
दि. ३ जून २०२६ रोजी दुपारी साईबाबा हॉस्पिटल बाहेरील पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी काम करत असताना त्यांना अंदाजे १ तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व कानातील दागिने सापडले. या दागिन्यांची किंमत सुमारे १ लाख ४० हजार रुपये इतकी होती. एवढ्या मौल्यवान वस्तू सापडूनही कोणताही मोह न बाळगता त्यांनी ते तात्काळ संरक्षण कार्यालयात जमा केले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


दरम्यान, चौकशीदरम्यान हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या सौ. मिराबाई कैलास गांगुर्डे (रा. पिंपळवाडी) यांचे दागिने हरवल्याचे त्यांच्या पुत्र श्री. दत्तात्रय कैलास गांगुर्डे यांनी सांगितले. दागिन्यांची योग्य ओळख व खातरजमा केल्यानंतर ते त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. हरवलेले दागिने परत मिळाल्याने गांगुर्डे कुटुंबीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
सौ. रेखा अवचिते यांनी दाखविलेल्या या प्रामाणिकपणा व कर्तव्यनिष्ठेचे श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. गोरक्ष गाडीलकर तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. भीमराज दराडे यांनी विशेष अभिनंदन केले.


“साईबाबांच्या सेवेत असताना प्रामाणिकपणा हीच खरी पूजा आहे,” याची जिवंत प्रचिती सौ. रेखा अवचिते यांनी आपल्या कृतीतून दिली. आजच्या काळात लाखो रुपयांचे दागिने परत करून त्यांनी केवळ एक कुटुंबाचा आनंद परत मिळवून दिला नाही, तर साईसेवेतील प्रामाणिकतेचा आदर्शही समाजासमोर ठेवला आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button