Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
क्राईमशिर्डी

बसस्थानकात दुचाकी चोरीचा प्रयत्न-कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने कट उधळला

शिर्डी शहरात पोलीस व सुरक्षा यंत्रणा निष्क्रिय ठरल्याचा संताप व्यक्त होत असतानाच बसस्थानक परिसरात दुचाकी चोरीचा थरार उघडकीस आला. शिर्डी पोलीस, नगर परिषद विशेष पथक आणि शिर्डी वाहतूक पोलीस यांच्या उपस्थितीतच चोरट्यांनी हात साफ करण्याचा प्रयत्न केल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

संस्थान व बसस्थानक कर्मचाऱ्यांची सतर्कता; एक आरोपी जेरबंद
तीन चोरटे बसस्थानक परिसरात आले आणि पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकी चोरण्याचा प्रयत्न करत होते. मात्र श्री साईबाबा संस्थान कर्मचारी आणि बसस्थानक कर्मचाऱ्यांनी ही बाब ओळखत तत्काळ त्यांना हटकले. आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना एका संशयिताला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.


एकाच दिवशी ५-६ दुचाकी चोरी; टोळीचा संशय

धक्कादायक बाब म्हणजे याच दिवशी संध्याकाळी शिर्डी शहरातून ४ ते ५ दुचाकी चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. तर बिरोबाबन परिसरातूनही एक मोटारसायकल लंपास झाली. पोलिसांनी निमगाव-निघोज येथील एका युवकाला ताब्यात घेतले असून ही एकट्याची कृती की टोळी कार्यरत आहे याचा तपास सुरू आहे.CCTV वाढवले; MSF तैनातीची मागणी जोरात
घटनेनंतर तातडीने संस्थान प्रशासनाने बसस्थानक परिसरात CCTV कॅमेरे वाढवून सुरक्षा कडक केली आहे. तरीही भाविक, प्रवासी आणि स्थानिकांच्या वाहनांची सुरक्षा धोक्यात असल्याने MSF (महाराष्ट्र सुरक्षा बल) कर्मचारी कायमस्वरूपी तैनात करण्याची मागणी जोर धरत आहे.
👉 शिर्डीत दुचाकी चोरट्यांचा उच्छाद वाढत असताना पोलीस प्रशासन नेमकं काय करतंय? असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button