Letest News
साईनामाशी नातं असलेली ज्येष्ठ व्यक्ती हरपली-आशालता ताई नागरे यांच्या निधनाने शिर्डीत शोककळा रामनवमी उत्सवात ‘रिल’चा स्फोट शिर्डीची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा ‘लाचखोरीचा स्फोट!’ — शिर्डीचे प्रांत सीताराम गायकर यांचे जावई लाचखोर गोविंद शिंदे यास दिवस पोलीस कोठ... ‘रॉकेल आहे… पण स्टोव्ह नाही!’ शिर्डीत नागरिकांची अक्षरशः कोंडी लक्ष्मीनगर अतिक्रमण प्रश्न तापला- शिर्डी प्रशासनाची मोठी हालचाल-स्थळपाहणी व चौकशीचे आदेश- तहसीलदारां... शिर्डीचा भूमिपुत्र निहार गीते पुन्हा झळकणार रुपेरी पडद्यावर-‘बेवारस’मधून साकारणार महत्त्वाची भूमिका “दारू पाजून काळी आई लुटली?” कॅप्टन खरातवर कोट्यवधींच्या जमिनीचा डल्ला-शिर्डीत संतापाचा ज्वालामुखी! साईनगरीत प्रामाणिकतेचा आदर्श-सुरक्षा व आरोग्य कर्मचाऱ्यांची ईमानदारी ठरली कौतुकास्पद! शिर्डीतून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा इशारा- भोंदूबाबा खरात प्रकरणात “कठोर कारवाई अटळ!” मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम
अ.नगरक्राईम

तरुणाचा मृत्यू,घात की अपघात चर्चा

कोपरगाव तालुक्यातील नगर-दौंड मार्गावर असलेल्या खिर्डी गणेश शिवारात रेल्वे रुळाच्या बाजूला एका अंदाजे वय वर्षे ३० असलेल्या तरुणाचा मृतदेह कोपरगाव तालुका पोलिसांना सापडला असून सदर तरुण नगर वरून बसला असल्याचे दिसून येत असून तो उत्तर प्रदेशातील झांशी येथे चालला असल्याचे त्याचे तिकिटावरून समजत असल्याची माहिती मिळाली आहे.त्यामुळे त्याचा मृत्यू हा अपघात आहे की घातपात आहे अशी उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

sai nirman
जाहिरात

कोपरगाव तालुक्यातील नगर मनमाड मा रेल्वे मार्ग जात असून आता तो दुहेरी झाला आहे.त्याचे विद्युतीकरण झाले आहे.त्यामुळे या मार्गावरून रेल्वे गाड्यांची अवाक जावक वाढली आहे.त्याच प्रमाणात अपघात वाढले असल्याचे दिसत आहे.अशीच घटना दिनाक २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.२५ वाजेपूर्वी कोपरगाव तालुक्यातील खीर्डी-गणेश शिवारात उघड झाली आहे.
या प्रकरणी तेथील स्थानिक शेतकऱ्यांत याची खबर शहर पोलिसांना कळवली होती.त्यानुसार त्या ठिकाणी शहर पोलिसांनी धाव घेतली होती.सदर युवकास ताब्यात घेतले असता व त्यास उपचारर्थ कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले असता तेथील उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले आहे.दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन भेट दिली आहे व स्थळ पंचनामा केला आहे.याबाबत नागरिक उलट सुलट चर्चा करत आहेत.
सदर तरुणाच्या अंगावर काळा शर्ट असून त्यास खुरटी दाढी असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान या प्रकरणी खबर देणार वैद्यकीय अधिकारी डॉ.उंबरकर यांनी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.तालुका पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी भारतीय नागरी सुरक्षा संहिता सन २०२३ चे गुन्हा क्रं.१२/२०२४चे कलम १९४ नुसार नोंद दाखल केली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस ना.ए.एस.वलवे या करत आहेत.

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button