Letest News
शासकीय विश्रामगृहात व्हिआयपी!व्हिव्हिआयपी तथा मंत्रीगण येतात!! थंड पेय तथा चहा! कॉफी पंचपक्वाने सोबत... राहात्यात सोशल मीडियावर बदनामीचा धडाका सहा जण पोलिसांच्या रडारवर! मंत्र्याचा मुलगा राजकुमार शिर्डी परिसरात पोलीस वाहनांच्या ताफ्यात फिरण्यावरून राजेंद्र पिपाडांचा घणा... नागपूरच्या साईभक्ताकडून ४ लाख ५६ हजार रुपयांचा सोन्याचा आकर्षक ओम ब्रोच श्री साईचरणी अर्पण अॅड. गौरव लोकचंदानीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! NMIMSमध्ये अॅड. गौरव लोचंदानींचा विशेष सन्मान जय महाकाली मित्र मंडळाची नवरात्रोत्सवाच्या नियोजनासाठी आज बैठक “माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई!
राजकीयशिर्डी

शिर्डीत केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे आगळेवेगळे स्वागत डॉ. राजेंद्र पिपाडा यांच्या पेरू बागेतील पेरूंनी सत्कार

शिर्डी (साई दर्शन न्यूज) – केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री मा. ना. श्री. शिवराजसिंह चौहान व त्यांच्या पत्नी सौ. साधना सिंह चौहान यांचे शिर्डी दौऱ्यादरम्यान भाजपाचे नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी आगळ्या-वेगळ्या पद्धतीने स्वागत केले.
डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी त्यांच्या स्वतःच्या पेरू बागेतील ताजे, सेंद्रिय पेरू भेट स्वरूपात देत केंद्रीय कृषिमंत्र्यांचा सत्कार केला. शेतकरी आणि शेतीशी नाते जपणाऱ्या या स्वागतामुळे उपस्थितांमध्ये विशेष चर्चा रंगली होती. कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही या साध्या पण अर्थपूर्ण स्वागताचे मनापासून कौतुक केले.
यावेळी RPI चे नेते दिलीपराव वाघमारे, प्रगतशील शेतकरी शिवाजीराव आनप, निखिल पिपाडा, साहिल पिपाडा, श्रुती पिपाडा व ट्विंकल पिपाडा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी केंद्रीय मंत्र्यांशी संवाद साधत शेती, शेतकरी आणि ग्रामीण विकासासंदर्भात विचारांची देवाणघेवाण केली.
शेतीप्रधान भारतात शेतकऱ्यांच्या उत्पादनातून केलेले हे स्वागत शेतकऱ्यांचा सन्मान आणि कृषी संस्कृतीचे प्रतीक असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या भेटीमुळे शिर्डीत राजकीय तसेच सामाजिक वर्तुळात सकारात्मक चर्चा पाहायला मिळाली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button