Letest News
'लिंगपिसाट कॅप्टन खरात'च्या अडचणीत मोठी वाढ-42.88 कोटींच्या कथित मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ईडीचे तब्बल 3... अकोल्यात गुटखा माफियांवर मोठा घाव! 80 लाखांचा अवैध गुटखा कारखाना उद्ध्वस्त MCOCA च्या कारवाईचीही चर्... शिर्डीत किरण बेदींचा परखड इशारा!'गुन्हेगारांना तिकीट देणारे पक्षही तितकेच दोषी मतदारांनी पैशांच्या आ... श्रीरामपूरात एसपी सुदर्शन मुमक्का यांचा खाकीला थेट इशारा!"दबावाखाली काम करू नका… दोषींना सोडणार नाही... शेतकऱ्यांच्या लुटीला अखेर लगाम! खत लिंकिंग करणाऱ्यांवर कृषी विभागाचा 'सर्जिकल स्ट्राईक' तलवारीने हल्ला मित्रिणीचा शोध घेत सुरू झाला वाद तरुणावर जीवघेणा वार… नंतर स्कुटी पेटवून दहशत! "दहशतीच्या राजवटीला श्रीरामपूरचा कडाडून विरोध बेग टोळीविरोधात संताप उसळला" गुन्हेगारांचा कर्दनकाळ व्हा!' – राजकीय दबाव झुगारून संघटित टोळ्यांचा बिमोड करा- आयजी संजय येनपुरे या... माजी खासदार विखेंवर अॅड. सुरेश लगड यांचा घणाघाती हल्ला "चांगल्याला चांगले म्हणण्याची दानत ठेवा" दैनिक साईदर्शनच्या पाठपुराव्याला यश- पोलीस खात्यातील बोका शंकर चौधरी निलंबित-आता बडतर्फीची मागणी जोर...
अ.नगरक्राईम

श्रीरामपूरात एसपी सुदर्शन मुमक्का यांचा खाकीला थेट इशारा!”दबावाखाली काम करू नका… दोषींना सोडणार नाही नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कारवाई करा!”

श्रीरामपूर | प्रतिनिधी
श्रीरामपूर शहरात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांच्या तक्रार निवारण दिनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहर व तालुक्यातील विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी पोलीस प्रशासनाशी संबंधित तक्रारी, अन्याय आणि विविध समस्या थेट एसपींसमोर मांडल्या. प्रत्येक तक्रारदाराचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत एसपी मुमक्का यांनी संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्काळ बोलावून प्रकरणांचा विलंब न करता कायदेशीर मार्गाने निपटारा करण्याचे स्पष्ट आदेश दिले.
यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांविरोधातही अनेक तक्रारी मांडण्यात आल्या. त्यावर एसपी मुमक्का यांनी अत्यंत कठोर भूमिका घेत, “खाकीचा सन्मान राखून काम करा. नागरिकांकडून पुन्हा अशा प्रकारच्या तक्रारी आल्यास कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. प्रत्येक तक्रारीची निष्पक्ष चौकशी होईल आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल,” असा स्पष्ट इशारा दिला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


बैठकीदरम्यान श्रीरामपूरमधील वाढत्या गुन्हेगारीचाही आढावा घेण्यात आला. गुन्हेगारीवर कठोर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी अधिक आक्रमक आणि कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नागरिकांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता प्रत्येक तक्रारीवर तातडीने कारवाई करण्याची ग्वाहीही एसपींनी दिली.
तक्रार निवारण दिनात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रकरणांवरही सुनावणी झाली. काही नागरिकांनी फायनान्स कंपनीकडून झालेल्या कथित फसवणुकीबाबत, तर काहींनी खोटे गुन्हे दाखल झाल्याच्या तक्रारी एसपींसमोर मांडल्या. संबंधित प्रकरणांची सखोल चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले.


कार्यक्रमानंतर एसपी सुदर्शन मुमक्का यांनी श्रीरामपूर येथील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेत त्यांना स्पष्ट शब्दांत बजावले की, “कोणत्याही राजकीय किंवा इतर व्यक्तींच्या दबावाखाली काम करू नका. कोणाकडून दबाव आणला जात असेल तर त्याची माहिती थेट मला द्या. मात्र गुन्हेगारांविरोधात कायद्याच्या चौकटीत राहून कठोर, निःपक्षपाती आणि तडजोड न करणारी कारवाई करा.”
नागरिकांचा विश्वास जिंकणे ही प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याची जबाबदारी असून, कायदा हातात घेणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींशीही चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेत आवश्यक सूचना देण्यात आल्या.


: एसपी मुमक्का यांचे खाकीला स्पष्ट आदेश
कोणत्याही राजकीय दबावाखाली काम करू नका.
नागरिकांच्या प्रत्येक तक्रारीची निष्पक्ष चौकशी करा.
दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवरही कठोर कारवाई करा.
गुन्हेगारांविरोधात तडजोड न करता कायदेशीर कारवाई करा.
नागरिकांचा विश्वास जिंकणे हीच पोलिसांची खरी जबाबदारी.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button