Letest News
ड्रेनेजची तक्रार केली म्हणून महिलेवर हात उचलला! लाथाबुक्क्यांनी मारहाण दगडाने डोके फोडले ‘कुटुंबाला... शिर्डीत भक्तिमय वातावरणात श्री गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात अनाथ बालकांसोबत ‘दबंग’ अधिकाऱ्याचा वाढदिवस!कायदा-सुव्यवस्थेत कणखर भूमिका सामाजिक जाणीवेतही तितकीच सं... मध्यस्थीची भावना जुनी आधुनिक स्वरूप अधिक परिणामकारक! — न्या. शिवाजी कचरे प्रमुख जिल्हा व सत्र न्याया... कडक शिस्तीच्या अधिकाऱ्याला सर्वपक्षीय सलाम! अमोल मोरे यांची प्रांताधिकारीपदी पदोन्नती सापडलेला लाखाचा मोबाईल साईभक्ताला परत संस्थान कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाला सलाम! निर्व्यसनी तरुणाईची एकजूट ढोल-ताशांच्या गजरात रंगणार गोविंदांचा जल्लोष शिर्डीच्या साईदरबारी भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा गोकुळाष्टमीनिमित्त साईचरणी सोन्याचा ब्रोच अर्पण भगवान थोरात यांची ग्राहक संरक्षण समितीच्या राहाता तालुका प्रवक्तेपदी नियुक्ती
अ.नगरक्राईम

शेतकऱ्यांच्या लुटीला अखेर लगाम! खत लिंकिंग करणाऱ्यांवर कृषी विभागाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’

अहिल्यानगर : खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना खतासाठी हेलपाटे मारायला लावणाऱ्या, सक्तीचे खत लिंकिंग करून आर्थिक लूट करणाऱ्या आणि शासकीय नियमांची पायमल्ली करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांविरोधात कृषी विभागाने अभूतपूर्व धडक कारवाई केली आहे. जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्या नेतृत्वाखाली जून-जुलै महिन्यात राबविण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेत अनेक धक्कादायक अनियमितता उघडकीस आल्या.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


तपासणीदरम्यान काही कृषी केंद्रांकडून शेतकऱ्यांना आवश्यक असलेले खत देण्यासाठी इतर उत्पादने खरेदी करण्याची सक्ती केल्याच्या तक्रारी सत्य असल्याचे आढळून आले. याशिवाय ई-पॉस यंत्रणेवरील ऑनलाइन खत साठा आणि प्रत्यक्ष गोदामातील साठा यामध्ये मोठी तफावतही निदर्शनास आली. शासकीय अनुदानित खतांच्या वितरणात पारदर्शकता राखण्याऐवजी नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कृषी विभागाने कठोर भूमिका घेतली.
या कारवाईत एकूण ४६ कृषी सेवा केंद्रांवर प्रशासकीय कारवाई करण्यात आली. त्यापैकी २४ केंद्रांचे परवाने तात्पुरते निलंबित करण्यात आले, तर २१ कायमस्वरूपी बंद असलेल्या केंद्रांसह श्रीरामपूरमधील एका कृषी केंद्राचा परवाना रद्द करण्यात आला. अशा प्रकारे एकूण २२ परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आल्याने जिल्ह्यातील कृषी व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.


कृषी विभागाने स्पष्ट इशारा दिला आहे की, शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे खत लिंकिंग करणे, चुकीची माहिती देणे, कृत्रिम टंचाई निर्माण करणे किंवा ई-पॉस प्रणालीमध्ये अनियमितता करणे अजिबात सहन केले जाणार नाही. अशा प्रकारच्या गैरप्रकारांविरोधात पुढील काळातही तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असून दोषींवर कठोर कारवाई सुरूच राहील.
: शेतकऱ्यांना आवाहन
खत खरेदी करताना कोणत्याही कृषी सेवा केंद्राकडून इतर औषधे, बियाणे किंवा उत्पादने सक्तीने घेण्यास भाग पाडले जात असेल, जादा दर आकारला जात असेल किंवा बिल देण्यास टाळाटाळ केली जात असेल, तर तात्काळ कृषी विभागाकडे तक्रार नोंदवावी. प्रत्येक तक्रारीची गांभीर्याने दखल घेत संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button