Letest News
मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी!
अ.नगरक्राईम

जिल्ह्यात अवैध धंदे सुरू! अप्रत्यक्ष पोलीस अधीक्षकांची जाहीर कबुली!

शिर्डी (प्रतिनिधी) 

sai nirman
जाहिरात

अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असलेले अवैध धंदे बंद करावेत‌. अन्यथा शेजारच्या पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचे पथक पाठवून हे अवैध धंदे बंद केले जातील .असे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी म्हटले आहे. मात्र त्यावरून या जिल्ह्यामध्ये अवैध धंदे सुरू आहेत व ते त्या त्या पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांना आतापर्यंत ते बंद करण्यासाठी  यश आलेले नाही. हे त्यावरून सिद्ध होत आहे.

DN SPORTS

kamlakar

जर आतापर्यंत हे अवैध धंदे बिंदासपणे सुरू आहे तर त्या पाठीमागे कारण काय? की चिरीमिरी घेऊन या धंद्यांना अप्रत्यक्षपणे पाठबळ दिले जात आहे कि काय? व इतके दिवस जिल्ह्यामध्ये अवैध धंदे सुरू आहेत.हे जिल्हा पोलीस अधीक्षकांना यापूर्वी कधी आठवले नाही.

मात्र बीड, परभणी घटनेनंतर राज्यात ठीक ठिकाणी आंदोलने होत असल्यामुळे आत्ताच जिल्हा पोलीस अधीक्षकांना जिल्ह्यात अवैध धंदे सुरू असल्याचे दिसले की काय ?असा सवाल आता जिल्ह्यातील नागरिकांमधून होत आहे.

 ‌सध्या बीड तसेच परभणी येथील घटनेवरून राज्यातील गृह विभागावर राज्यातील नागरिक ताशेरे ओढत असताना, व राज्यात ठीक ठिकाणी या घटनेमुळे निषेधार्थ आंदोलने होत असतानाच या अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध धंदे सुरू असल्याचे व ते त्वरित बंद करा. अन्यथा शेजारच्या पोलीस स्टेशनच्या अधिकारी, कर्मचारी येऊन ते बंद करतील. असा इशारा देण्याची वेळ जिल्हा पोलीस अधीक्षकांवर आली आहे.

हे सुद्धा जिल्हा पोलीस अधीक्षकांचे अपयश नाही का? ज्याच्या पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध धंदे बिनधास्तपणे सुरू आहेत .त्या पोलीसअधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी दुसरे पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचाऱ्यांना तेथे पाठवून हे अवैध धंदे बंद केले जातील. असा इशारा देण्याचा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी निर्णय घेणे म्हणजे ज्या पोलीस स्टेशन हद्दीत हे अवैध धंदे चालू आहेत .

तेथील पोलीस अधिकारी ,कर्मचारी हे निष्क्रिय किंवा अकार्यक्षम ठरल्याचे अप्रत्यक्ष त्यांनी या आपल्या वक्तव्यातून  जाहीर केले आहे किंवा चिरीमिरी घेऊन हे अवैध धंदे सुरू असल्याचे अप्रत्यक्षपणे त्यातून स्पष्ट होत आहे. असे आता जिल्ह्यातील नागरिक बोलत आहेत.


        अहिल्यानगर हा  राज्यातील सर्वात मोठे क्षेत्रफळ असणाऱ्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हद्दीमध्ये अवैध दारू विक्री, अवैध गांजा चरस विक्री, अवैध प्रवासी वाहतूक,  वेश्याव्यवसाय , अवैध मटका, जुगार, वाळू तस्करी, असे अनेक अवैध धंदे  सुरू आहेत.हे विविध प्रकारचे अवैध व्यवसाय सुरू असल्याचे एक प्रकारे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आपल्या बोलण्यातून जणू कबुली दिली असून हे अवैध धंदे प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्वरित बंद करण्यात यावे

.त्या त्या पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी त्वरित  कारवाई करावी .अन्यथा शेजारील पोलीस स्टेशनच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे ,पथक तेथे जाऊन अवैद्य व्यवसाय बंद केले जातील. असे जाहीरपणे राकेश ओला यांनी शिर्डीत सुरक्षा आढावा घेताना म्हटले असल्यामुळे जिल्ह्यातील अवैध धंदे हे सुरू आहेत हे त्यावरून स्पष्ट होत आहे. या अवैद्यधंदे आतापर्यंत बिनधास्तपणे सुरू आहेत कशाच्या व कोणाच्या पाठबळावर हे सुरू आहेत.

याचाही प्रथम अभ्यास करून त्यांच्यावरही कडक कारवाई केली पाहिजे, व जिल्ह्यामध्ये अवैध धंदे सुरू आहेत. ते बंद झाले नाहीत याला जबाबदार कोण ?हे त्या त्या पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी कर्मचाऱ्यांचे अपयश असले तरी जिल्ह्याचे एक जबाबदार अधिकारी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षकांचे अपयश नाही का ?असा सवाल आता नागरिकांमधून होत आहे. अवैध धंदे सुरू असल्यामुळे जिल्ह्यामध्ये गुंडगिरी, दादागिरी हाणामाऱ्या वाढत आहेत.

कायदा व सुव्यवस्था बिघडत असताना आत्तापर्यंत जिल्हा पोलीस अधीक्षक शांत का होते.व बीड आणि परभणी च्या घटनेनंतर राज्यात विविध ठिकाणी आंदोलने होत असतानाच जिल्ह्यात असे अवैध धंदे बंद करण्यासाठी दुसऱ्या पोलीस स्टेशनच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे पथक तेथे पाठवण्यात येऊन ते बंद केले जातील असे वक्तव्य करणे हे कितपत योग्य आहे. असेही नागरिकांमधून बोलले जात आहे.

जर जिल्ह्यामध्ये पोलीस स्टेशनचे अधिकाऱ्यांना अवैध धंदे बंद करण्यास अपयश येत होते तर मग जिल्ह्याचे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस अधिकारी  काय करत होते,? असाही सवाल उपस्थित होत आहे. तसेच हे
 पोलीस अधिकारी कर्मचारी, चिरमिरी घेतात ,मग अवैध धंदे कसे बंद होतील ,ते बंद व्हावेत म्हणून दक्षिण नगर जिल्ह्याचे खासदार निलेश लंके

यांना चार ते पाच दिवस उपोषण,आंदोलन करावे लागले होते. त्यानंतरही हे अवैध धंदे बंद झाले नाहीत. आजतागायत ते सुरू आहेत व ते बंद करण्यासाठी आता जिल्हा पोलीस अधीक्षकांची तळमळ सुरू आहे. ती खरी आहे की वरवर आहे. असा संभ्रम जिल्ह्यातील नागरिकांना आता त्यामुळे होत आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button