Letest News
शिर्डीत पर्यटकांच्या गाड्यांवर चोरट्यांचा डल्ला साईभक्ताची बॅग-मोबाईल आणि रोख रक्कम लंपास पोलीस असल्याची बतावणी-प्रेमसंबंधांचे आमिष अन् शिर्डीत अत्याचार? नांदगाव प्रकरणाने खळबळ “डेथ नेटवर्क”चा फैलाव? राहाता तालुक्यात गर्भलिंग रॅकेटची भीषण साखळी उघड होण्याची चिन्हे पोलीस ठाण्यातही लिंगपिसाट भोंदू खरातचा माज साक्षीदारांनाच दिली दमदाटी! भोंदू खरातचा जेलमधील मुक्काम वाढला-कोर्टाकडून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी राहात्यात गर्भलिंग रॅकेटचा महाभंडाफोड-पुण्यापर्यंत पोहोचले धागेदोरे- राहता तालुक्यातील “मोठे मासे” र... साईदरबारात पुन्हा दिसली प्रामाणिकतेची झलक-१५ हजारांची पर्स साईभक्ताला सुखरूप परत इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैनस्नॅचिंग-श्रीरामपूरची टोळी जेरबंद-LCB ची धडाकेबाज कारवाई पाथर्डीत समता पतसंस्थेचा गाशा गुंडाळला? ठेवीदारांचे लाखो अडकले? पाथर्डीत एकच खळबळ समता पतसंस्थेच्या घोटाळ्यात ED ची मोठी एन्ट्री-अशोक खरातच्या लॉकरमधून कोट्यवधींचं घबाड
अ.नगरराजकीय

जिल्हा प्रशासनाने स्ट्रॉंगरूमची केली पाहणी मतमोजणी जागेला जिल्हाधिकारी यांनी दिली भेट

नेवासा, दि.२१ – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ व जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी रविवारी नेवासा येथील स्ट्राँगरूमला भेट देऊन तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

ईव्हीएम यंत्राचे वाटप व मतमोजणीच्या दिवशी स्ट्राँगरूममधील जागेचे नियोजन याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. ईव्हीएम सुरक्षेच्यादृष्टीने स्ट्राँगरूमचे ठिकाण व परिसराची पोलीस अधीक्षकांनी पाहणी केली. नेवासा तहसील कार्यालयात उभारण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील विविध कक्षांनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी भेट देऊन आढावा घेतला.

जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी सुरक्षेच्या आढावा घेऊन कामकाजाची पाहणी केली तसेच निवडणूक आचारसंहितेच्या अंमलबजावणीच्यादृष्टीने सूचना दिल्या. सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

याप्रसंगी नेवासा विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी अरूण उंडे, तहसीलदार डॉ.संजय बिरादार, नेवासा पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, अपर तहसीलदार पाटील, नगरपंचायत मुख्याधिकारी सोनाली ‌म्हात्रे आदी उपस्थित होते.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button