Letest News
संघटित गुन्हेगारीचे कलम १११ लागू आरोपींवर 'मोक्का'सारखी कठोर कारवाई AI चा गैरवापर की राजकीय कट? पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नावाने मॉर्फ ऑडिओ-व्हिडिओ प्रकरण-संगम... शरीरात घुसला चक्क बॉलपेन- श्री साईनाथ रुग्णालयात दुर्मिळ व जीवघेण्या शस्त्रक्रियेला यश शिर्डीतील महिला हत्येनंतर माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांची काव्यात्मक टीका-सोशल मीडियावर चर्चेला उध... शिर्डीच्या भूमिपुत्री डॉ. सिमरन साई कोतकर यांची वारकऱ्यांसाठी निस्वार्थ सेवा-सर्वत्र कौतुकाचा वर्षाव शिर्डी पोलिसांचा गुटखा माफियांवर धडक प्रहार! दोन ठिकाणी एकाच वेळी छापे दोघे ताब्यात हजारो रुपयांचा ग... साई समाधीवरील चित्रीकरण प्रकरण पेटले- सखोल चौकशीसह फोटो एडिट करून विकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची ... महिलेचा खळबळजनक आरोप-बलात्कार-पिस्तुलाचा धाक जीवे मारण्याच्या धमक्या शिर्डी पोलिसांत मध्यरात्री FIR जर्मनीतील ४१ साईभक्तांची शिर्डीत भक्तीमय साईसेवा समाधी मंदिरात गुंजले साईभजन ठगसेन भूपेंद्र सावळेचे साथीदार फरार आरोपींना कोणाचे अभय?" – DGP समोर डॉ. राजेंद्र पिपाडांचा संतप्त स...
Blog

खाकी वर्दीचा गैरवापर करुनसध्या तुम्ही कितीही करा हो नंगानाच !एकेदिवशी तुम्हास तुरुंगाची हवा खावीच लागेल हा आमचा पक्का विश्वास !!

शिर्डी ( प्रतिनिधी) भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. अश्या सर्वात मोठ्या लोकशाही देशांमध्ये कायद्याचे राज्य आहे. भारताचे संविधान व कायदा यावर भारत देश हा जगात सर्वश्रेष्ठ असा देश मानला जातो.व संपूर्ण भारतीयांचा लोकशाही व कायद्यावर मोठा विश्वास आहे. मात्र अनेकदा काही अधिकारी  आपल्या मर्जीप्रमाणे वागतात.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

आपल्या अधिकाराचा गैरवापर करतात.कायद्याचा धाक अशा अधिकाऱ्यांना राहिला नाही. असेच उदाहरण अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून घडले असून जिल्हा पोलीस अधीक्षकांना कायद्याचा धाक राहिला नसल्याचे एका उदाहरणावरून लक्षात येत असून हे उदाहरण म्हणजे एका पत्रकाराला व  कुटुंबांना व दोन्ही मुलींना एक वर्षांपूर्वी बेदम मारहाण करून त्याचे घडलेल्या घटनेचे रेकॉर्डिंग रद्द करून मोबाईल फोडण्यात आले.

पोलीस अधीक्षक हे  पोलीस अधीक्षक होण्या अगोदर न्यायाधीश होते त्यांना  कायद्याच्या पळवटा  माहिती आहेत. त्यामुळे अशा घटना घडूनही यावर पांघरून घालण्याचे काम त्यांच्याकडून होत आहे. त्यांनी आपल्या पोलीस दलातील काही पुरुष पोलिसांना सांगून एक वर्षांपूर्वी पत्रकाराच्या कुटुंबियांवर अन्याय केला होता .त्या घटनेला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. अधिकाराचा वापर करत कायद्याला न जुमनता विनाकारण अन्याय करणाऱ्या या पोलीस अधिकाऱ्याला कायदाच धडा शिकवेल असा आमचा विश्वास आहे.

आम्ही कायद्याला मानणारे आहोत. कायदा हा कोणत्याही व्यक्ती पेक्षा श्रेष्ठ आहे. कोणीही आपल्या अधिकाराचा वापर कायदा सोडून कसाही करत असेल तर कायदा त्या व्यक्तीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा आमचा विश्वास आहे त्यामुळेच आम्ही कायद्याची लढाई सर्वसामान्य कुटुंब असूनही या मग्रूर मोठ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात लढत आहोत. कायद्याने आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. असे मत पत्रकार कुटुंबाच्या सदस्यांनी एका पत्रकात व्यक्त केले आहे.


   या सर्व घटने संदर्भात पत्रकार कुटुंबांच्या वतीने प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आम्ही सर्व सामान्य कुटुंबातील आहोत मात्र कायद्यावर आमचा विश्वास असल्यामुळे आम्ही कायद्याने लढा देत आहोत. सत्य परेशान होता है  लेकिन पराजित नाही होता. या वाक्याप्रमाणे आमची लढाई सुरू आहे. या सर्व घटने संदर्भात या पत्रकारांच्या कुटुंबाने पत्रकार म्हटले आहे  की, आम्ही न्यायासाठी नागपूरला उपोषण करण्याचे ठरवले होते. तशी अगोदर  नोटीसही दिली होती.

पण
 पत्रकार उपोषणाला जाऊ नये. उपोषणाला गेले म्हणजे आपले पितळ उघडे पडेल. म्हणून षडयंत्र रचून  पत्रकार व कूटुंबाला अहिल्यानगरला जिल्हा पोलीस अधीक्षकांनी बोलावून घेतले. काहीतरी मार्ग निघाल्या उद्देशाने आम्ही तेथे गेलो. मात्र तेथे वेगळेच घडले. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आम्हाला न्याय देण्याऐवजी पोलीस निरीक्षक
 दिनेश आहेर आणि तेथे उपस्थित पंधरा-वीस पुरुष पोलिसांना सांगून मारहाण करायला लावली. 

इतकेच नाहीतर त्यांच्या सोबत असणाऱ्या या पत्रकार व त्यांच्या पत्नी आणि मुलींना अक्षरशा पुरुष पोलिसांनी मारहाण करून हात धरून ओढीत नेत  एका रूममध्ये बेकायदेशीर कोंडून ठेवले.  त्यांच्या कडे असलेल्या मोबाईल मध्ये या सर्व घडलेल्या घटनेची सर्व शूटिंग केलेली होती. आपले बिंग उघडे पडेल म्हणून त्या पोलिसांनी ती  डिलीट करून मोबाईल फॉर्मेट केले .त्याचीही माहिती आम्ही माहिती अधिकारात मागितली होती.पण तीही देण्यात आली नाही.

त्याची तक्रार वरिष्ठांकडे करण्यात आली. परंतु कोणीही त्याची दाखल घेतली नाही. अधिकारी एकमेकांच्या चूकांवर पांघरूण घालतात .हे त्यातून स्पष्ट होते.  . हे घडल्यानंतर  हा घडलेला प्रकार व ही सर्व घटना दाबण्यासाठी अनेकदा कळतनकळत पीडितेच्या पतीवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे.


अनेक अधिकाऱ्यांना मध्यस्थीही घातले. अनेक लोकांना मध्यस्ती घातले .अनेक  नेते मंत्र्यांना मध्यस्ती घालून हे प्रकरण कशे मिटवता येईल हे प्रयत्न पोलीस अधीक्षकांनी केले. अप्रत्यक्षपणे  अमिष दाखवण्यात आले.  परंतु या अमिष ,या मोहाला आम्ही बळी पडलो नाही.या कोणत्याही मोहाला बळी न पडता आणि  कुठूनही न्याय न मिळाल्याने पीडितेने शेवटी न्यायालयात धाव घेतली आहे .

कायद्याला पायदळी तुडवणाऱ्या ह्या पोलीस अधिकाऱ्यांना कायद्यानेच उत्तर देणार असल्याचे या पीडितेने सांगितले आहे.या हल्लेखोर अधिकाऱ्याला बहुतेक कायद्याचा धाक राहिला नसल्याने तो नंगानाच करीत आहे .परंतु कायद्याच्या कचाकड्यातून कोणालाही सूट नाही.

हे कदाचित त्यांना माहित नाही आणि पीडितेला कायद्यावर विश्वास आहे आणि एक दिवस ह्या अत्याचार करणाऱ्यांना अधिकारी व कर्मचारी यांना जेलची हवा खावीच लागणार आहे. कायदा सर्वांपेक्षा मोठा आहे व अन्याय करणाऱ्यांना नक्कीच कायदा धडा शिकवेल. असा आम्हाला विश्वास आहे. असे या  पिडीत पत्रकार यांच्या कुटुंबाने या प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button