Letest News
निमगाव को-हाळे बायपासवर भीषण अपघात — कातोरे वस्ती हादरली! काका कोयटे हजर हो! SID ची नोटीस-समता पतसंस्थेत १००+ बोगस खाती? सावकारीच्या जाळ्यात अडकलेले शिर्डी? खरात अटकेत-मोठ्या नावांची धास्ती!” “पोलीसांचा मोठा फटका! अशोक खर... शिर्डीची लेक ठरली उज्ज्वल यशाची प्रेरणा — डॉ. सृष्टी सोनवणे यांचे एमबीबीएसमध्ये उच्च श्रेणीने यश शिर्डीला जोडणाऱ्या रस्त्यासाठी २१३ कोटी रुपयांची तरतूद “कायदा राखणारेच झाले लाचखोर!” — पाथर्डीत पोलीसांचा काळा चेहरा उघड “१० हजारांत पोटातील भविष्य विक्रीला!” — राहाता तालुक्यात गर्भलिंग निदानाचा काळाबाजार उघड जबरदस्ती धर्मांतराचा आरोप —आरोपी ताब्यात-विविध कलमांन्वये गुन्हा दाखल- शिर्डीत खळबळ- मुंबईच्या झोपडपट्टी दादाची शिर्डीत पेट्रोल पंपावर दादागिरी -शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल “९ नाण्यांचा वाद” पुन्हा पेटला — शिर्डीत संतापाची लाट-“भीती संपली म्हणून धंदा?” — ग्रामस्थांचा थेट स...
अ.नगरक्राईम

लाखोंचा चालतो गोरख धंदा!–राहता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. डॉ.गोकुळ घोगरे

खाजगी रुग्णालयाच्या मनमानी मुळे अनैसर्गिक शास्त्रक्रिया प्रसुतीत दिवसें दिवस कमालीची वाढ होत असल्याने अनैसर्गिक प्रसूतीं मुळे महिलांना यामुळे आरोग्यावरच्या विपरीत परिणामांना सामोरे जावे लागत असून अनैसर्गिक शस्ञक्रिये मुळे महिलांना शारीरिक व कुटुंबाना अर्थिक भुडदंड सहन करावा लागतात यात खाजगी रुग्णालयाची दुकानदारी जोरात सुरु असून या कडे सर्व सोयीस्कर रित्या दुर्लक्ष करीत असतांना दिसत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

अत्याधुनिक तंत्रज्ञानांमुळे नैसर्गिक प्रसूतीपेक्षा शस्त्रक्रिया प्रसूती सोपी वाटत असल्याने शस्त्रक्रिया प्रसूतीच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचे दिसत असून जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार १२ ते १५ टक्क्यांपेक्षा जास्त शस्त्रक्रिया प्रसूती कुठेच नको असे असतांनाही सरकारी। रुग्णालय वगळता खासगी रुग्णालयांमध्ये ही टक्केवारी वाढल्याचे समोर येत आहे.

प्रसूती हा आजार नसून अनंत काळापासून चालत आलेली एक प्रजनन प्रक्रिया आहे. जी पशू-पक्षी यांच्यासह सर्व प्राण्यांसह मानवी जीवनामध्ये पाहावयास मिळते. पूर्वी शस्त्रक्रिया प्रसूती पद्धत नसतांना ९५ टक्क्यांपेक्षा अधिक महिलांच्या नैसर्गिक प्रसूती होत असे. मात्र १९७८ नंतर सोनोग्राफी मशिनसह इतर आधुनिक तंत्रज्ञानाचा शोध लागल्याने त्यांचा अती वापर वाढल्याचे निदर्शनास येत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार १२ ते १५ टक्क्यांपेक्षा जास्त शस्त्रक्रिया प्रसूती कुठेच नको आहेत. यापेक्षा अधिक प्रसुती सरकारी अथवा खासगी रुग्णालयांमध्ये होत असेल तर ते चुकीचे आहे. असे असतांना रुग्णांच्या मनात भीती निर्माण करून दिवसेंदिवस शस्त्रक्रियेद्वारा होणाऱ्या प्रसूतीच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. हे प्रमाण १५ टक्क्यांपेक्षा अधिक नको असतानाही सरकारी
रुग्णालयामधील शस्त्रक्रिया प्रसूतीचे प्रमाण १६ ते २१ टक्के दिसत असून ज्यात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.

सरकारी रुग्णालयापेक्षा खासगी रुग्णालयामध्ये महिला प्रसूतीचे प्रमाण अधिक आहे. मात्र खासगी रुग्णालयामध्ये प्रसूतीचे अंकेक्षण होत नसल्याने खासगी रुग्णालयामधील नैसर्गिक व शस्त्रक्रिया करुन केलेल्या प्रसूतीच्या संख्येची उकल होत नाही.

गरोदरपणाचे दिवस पूर्ण झाल्यानंतर महिलेच्या पहिल्या प्रसूतीसाठी बारा ते सोळा तास, दुसऱ्या प्रसूतीसाठी सहा ते आठ तास व तिसऱ्या प्रसूतीसाठी चार ते सहा तास लागतात मात्र महिलांमध्ये वेदना सहन करण्याची तयारी नसल्याने व महिलांच्या मनात भीती निर्माण करून जसे की बाळाच्या गळ्याभोवती नाळ गुंडाळलेले आहे, बाळाने पोटात शी केली आहे, पिशवीतील पाणी कमी झाले, बाळाचे ठोके कमी झाले आहे, अशा प्रकारच्या भीती दाखवून शस्त्रक्रिया करून प्रसूती करण्याकडे डॉक्टरांचे प्रमाण वाढत आहे.

अनैसर्गिक प्रसूती च्या शस्त्रक्रिया करीता ग्रामीण भागात २० ते ४० हजार रुपये, तर शहरी भागात ५० हजार ते १ लाख रुपयांच्या पुढे पैसे मौजावे लागतात.

एकूण प्रसूतींपैकी २० टक्के प्रसूती सरकारी रुग्णालयात होतात. तर ८० टक्के प्रसूत्या ह्या खासगी रुग्णालयात होतात.

खासगी हॉस्पिटलमध्ये नैसर्गिक व शस्त्रक्रिया प्रसूतीची नोंद केली जात असली तरी या शस्त्रक्रिया करुन प्रसूती कोणत्या कारणाने केल्या जातात, याचे अंकेक्षण होत नाही. त्यामुळे खासगी रुग्णालयातील नैसर्गिक प्रसूती व शस्त्रक्रियाद्वारे झालेली प्रसूती यांचा नेमका आकडा किती आहे, याची उकल होत नाही.

शस्त्रक्रियेद्वारे वाढत चाललेल्या प्रसूतींना डॉक्टर व रुग्ण तितकेच जबाबदार आहेत. रुग्णांना थांबायला वेळही नाही व डॉक्टरांनी निर्माण केलेली आभासी भीती तर दुसऱ्या बाजूला डॉक्टरांनी रुग्णांमध्ये भीती निर्माण करून मांडलेले आपले लाखोंचे गोरखधंदे यामुळे नैसर्गीक प्रसूतींपेक्षा त्यांना शस्त्रक्रिया प्रसूती करणे सोपी वाटते. कोणतीही जोखीम राहत नाही यामुळे अनैसर्गिक प्रसूतीची शस्त्रक्रिया करणा-या रुग्णालयांची दुकानदारी जोरात फोफावत आहे.

ग्रामीण रुग्णालयांमध्ये अनैसर्गिक शास्त्रक्रिया प्रसूतीचे प्रमाण २५ ते 30 टक्के आहे. खाजगी रुग्णालयांनी देखील अनैसर्गिक शास्त्रक्रिया प्रसूतीचे प्रमाण २५ ते ३० टक्यापर्यंत आणण्यासाठी प्रयत्न कराला पाहीजे. या मुळे प्रस्तुत माताची प्रकृती व्यवस्थित राहील व कुटुंबाला अर्थिक भुर्दंडाचा सामना करावा लागणार नाही. नागरिकांनी खाजगी रुग्णालया ऐवजी ग्रामीण रुग्णालया कडे आपले पाय वळवले पाहिजे जेणेकरून त्यांना आर्थिक भुर्दंडाला सामोरे जावे लागणार नाही व महिलांनाही आभासी भीती मुळे अनैसर्गिक शास्त्रक्रिया प्रसूतीलाही जास्तप्रमाणात सामोरे जावे लागणार नाही.
वैद्यकीय अधिक्षक डॉ. गोकुळ घोगरे राहाता ग्रामीण रुग्णालय.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button