Letest News
विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतले साई समाधीचे मनोभावे दर्शन शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रेशनचा तांदूळ बोबडे आणि पवार काळ्या बाजारात नेतो! गोर - गरीबांच्या मुखातील  अन्न कसा हिरावून घेतो !! सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साई मंदिरात सापडली ४८ हजारांची सोन्याची अंगठी-कर्तव्य बजावताना सापडली सोन्याची अंगठी लक्ष्मण घोरपडें... राहाता तालुक्यातील एकरूखे येथे सरकारी वकिलाच्या घरी धाडसी दरोडा- १.५१ लाखांचा ऐवज लुटून चार दरोडेखोर... साईबाबांवर हात ठेवून शपथ घ्या- टक्केवारी कोणी मागितली?निलेश लंके यांचा विखेंवर घणाघात मंदिर परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाटइशारा देऊनही संस्थान-नगरपरिषद सुस्त अखेर साईभक्त महिलेवर कु... पती बेपत्ता म्हणून पत्नीची पोलिसांत तक्रार शोध घेताना समोर आला धक्कादायक प्रकार! पत्नीच्या नावाने रू... पैशांसाठी विवाहितेचा छळ चारित्र्यावर संशय घेत मारहाण‘गाडी घेण्यासाठी माहेरून पैसे आण नाहीतर जिवंत सो... ओबीसी मोर्चाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुखपदी बाळासाहेब गाडेकर
राजकीयशिर्डी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळचा सक्तीवर युटर्न-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या घोषणेनंतर गोंधळ

मुंबई/प्रतिनिधी – एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सवलतीच्या तिकिटांवर नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) बंधनकारक केल्याची घोषणा झाल्यानंतर राज्यात मोठा गोंधळ उडाला होता. मात्र आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळनेच स्पष्ट केलं आहे की, एसटी प्रवासासाठी NCMC स्मार्टकार्डची अद्याप सक्ती करण्यात आलेली नाही.
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत सवलतीच्या तिकिटांसाठी NCMC कार्ड अनिवार्य करण्यात आल्याचे सांगितले होते. त्यानंतर विविध माध्यमांमध्ये यासंदर्भातील बातम्या झळकल्या.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

परंतु महामंडळाने ट्विटद्वारे खुलासा करत, “NCMC स्मार्टकार्डची नोंदणी प्रत्येक आगारात सुरू आहे; मात्र एसटी प्रवासात त्याची सक्ती अद्याप नाही,” असे जाहीर केले. ही माहिती एसटीचे सहाय्यक जनसंपर्क अधिकारी रोहन देसाई यांनी दिली.
दरम्यान, माहिती व जनसंपर्क संचालनालयनेही सोशल मीडियावर फिरणारा “NCMC कार्ड अनिवार्य” असल्याचा दावा खोटा व दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे एकीकडे मंत्र्यांची घोषणा आणि दुसरीकडे शासनाच्याच प्रसिद्धी विभागाचे स्पष्टीकरण यामुळे प्रशासनातील समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


नागरिकांच्या संतापानंतर माघार?
ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास, विद्यार्थ्यांना सवलतीचे पास अशा योजनांचा लाभ घेण्यासाठी NCMC कार्ड बंधनकारक करण्याच्या निर्णयामुळे ग्रामीण भागातून तीव्र नाराजी व्यक्त झाली होती.
हे कार्ड १९९ रुपयांना विकत घ्यावे लागणार, त्यात किमान १०० रुपयांचा बॅलन्स ठेवणे आवश्यक, तसेच ५० रुपयांच्या पटीत रिचार्ज करावे लागणार – या अटी सर्वसामान्य, विशेषतः खेड्यापाड्यातील प्रवाशांसाठी जाचक असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

“आधार, पॅन, विविध शासकीय कार्डांनंतर आणखी एक कार्ड कशासाठी?” असा थेट सवाल नागरिकांनी उपस्थित केला.
नागरिकांच्या विरोधानंतरच शासनाने पाऊल मागे घेतल्याची चर्चा रंगली आहे. अधिकृतरीत्या सक्ती नसल्याचे सांगितले असले तरी प्रारंभीची घोषणा आणि त्यानंतरचे स्पष्टीकरण यामुळे राज्य शासनाच्या भूमिकेतच गोंधळ असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
सवलतीच्या प्रवाशांना दिलासा मिळाला असला तरी भविष्यात हा निर्णय पुन्हा लागू केला जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button