Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
क्राईमशिर्डी

साईबाबांच्या पावन भूमीत गुटखा तस्करीचा विळखा; शिर्डीत खुलेआम ‘विष’ विक्री सुरू-‘खाबीयां’नी वर डोके काढले; १२ जणांची संघटित तस्करी साखळी

शिर्डी प्रतिनिधी 
साईबाबांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेली, श्रद्धा-भक्तीचे जागतिक केंद्र असलेली शिर्डी नगरी आज एका गंभीर आणि धक्कादायक वास्तवाला सामोरी जात आहे. *‘श्रद्धा आणि सबुरी’*चा संदेश देणाऱ्या या पवित्र भूमीत गुटख्यासारखा घातक व बंदी असलेला पदार्थ खुलेआम विकला जात आहे, ही बाब शिर्डीकरांसाठी अत्यंत लाजिरवाणी आणि संतापजनक ठरत आहे.
गोळ्या-बिस्किटे, चॉकलेट, यांच्या आड गुटख्याची तस्करी व विक्री तेजीत असून, बंटी नावाच्या इसमाचा हा अवैध धंदा शहरात जोमात सुरू असल्याची चर्चा उघडपणे होत आहे. विशेष म्हणजे, या धंद्याला कोणतीही भीती नसल्याचे चित्र असून, कायद्यालाच आव्हान दिले जात असल्याचे दिसून येत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

पवित्र शिर्डीत ‘विष’ विक्री; श्रद्धेचा अपमान की अन्न व औषध प्रशासनाची झोप?
देश-विदेशातून लाखो भाविक शिर्डीत दर्शनासाठी येतात. साईबाबांच्या समाधीसमोर माथा टेकणाऱ्या या भाविकांच्या शहरातच कर्करोगास कारणीभूत ठरणारा गुटखा सहज उपलब्ध असणे, हा साईबाबांच्या विचारांचा थेट अपमान असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
ज्या भूमीत ‘सबका मालिक एक’चा संदेश दिला जातो, त्याच भूमीत तरुण पिढीला विष विकले जाते, ही बाब अत्यंत गंभीर असून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते.

‘खाबीयां’नी वर डोके काढले; १२ जणांची संघटित तस्करी साखळी
विश्वसनीय माहितीनुसार, शिर्डी तालुक्यात एकूण १२ जण गुटखा तस्करीत सक्रिय असून, त्यांनी शहर व परिसरात ठरावीक खाब्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुटखा साठवून पुढे लहान दुकाने, टपऱ्या, पानठेले यांच्या माध्यमातून विक्री सुरू ठेवली आहे.
ही तस्करी संघटित स्वरूपात चालत असून, कोण कुठे माल आणतो, कोण साठवतो आणि कोण विकतो — याची साखळी व्यवस्थित आखलेली आहे. त्यामुळेच वारंवार तक्रारी होऊनही मुख्य सूत्रधार आजतागायत मोकाट असल्याचे बोलले जात आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे आर्थिक दुर्लक्ष? संशय अधिक गडद
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, हा सगळा प्रकार दिवसाढवळ्या सुरू असताना अन्न व औषध प्रशासन (FDA) मात्र पूर्णपणे निष्क्रिय असल्याचे चित्र आहे.
हे केवळ दुर्लक्ष आहे की आर्थिक हितसंबंधांमुळे केलेली डोळेझाक? असा थेट सवाल आता उपस्थित केला जात आहे.
कधीमधी एखाद्या छोट्या विक्रेत्यावर कारवाई करून कारवाई झाल्याचा दिखावा केला जातो; मात्र मोठ्या माशांवर हात टाकण्याची हिंमत का होत नाही? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.


तरुण पिढी व भाविकांच्या आरोग्यावर घाला
गुटखा सेवनामुळे कर्करोग, तोंडाचे आजार, हृदयविकार यांसारखे गंभीर परिणाम होतात, हे सर्वश्रुत असताना शिर्डीतील लहान मुले, युवक आणि कामगार वर्ग सहजपणे या विषाच्या आहारी जात आहेत.
भाविक, पर्यटक आणि स्थानिक नागरिक यांच्यासाठी ही बाब थेट आरोग्याशी खेळणारी आहे.

कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांकडे शिर्डीकरांचे लक्ष
या संपूर्ण गंभीर प्रकरणाकडे शिर्डी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी अमोल भारती व रणजित गलांडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे .
गुटखा तस्करी करणाऱ्या १२ जणांवर कठोर कारवाई होणार का?
मुख्य सूत्रधार बंटी, खाबिया व त्याच्या नेटवर्कवर गुन्हे दाखल केले जाणार का?
FDA व पोलीस प्रशासन संयुक्त धडक कारवाई करणार का?

की नेहमीप्रमाणे कारवाई फक्त छोट्या विक्रेत्यांपुरती मर्यादित राहणार, हा प्रश्न शिर्डीकरांना सतावत आहे.शिर्डी —

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button