Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
राजकीयशिर्डी

दहीहंडी फोडून पारायण सोहळ्याची सांगता ८ हजार २०० पारायणार्थींचा सहभाग — साईनामाच्या जयघोषाने शिर्डी दुमदुमली

गोपाळकालाच्या गजरात साईसच्चरित्र पारायण सोहळ्याची भक्तिमय सांगता
दहीहंडी फोडून पारायण सोहळ्याची सांगता; ८ हजार २०० पारायणार्थींचा सहभाग — साईनामाच्या जयघोषाने शिर्डी दुमदुमली
शिर्डी : श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी नाट्य रसिक मंच आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने १३ ऑगस्टपासून सुरू असलेल्या श्री साईसच्चरित्र पारायण सोहळ्याची आज भक्तिमय वातावरणात सांगता झाली. ह.भ.प. सौ. राधिका कालेकर, कोल्हापूर यांच्या रसाळ गोपाळकाला कीर्तनानंतर दहीहंडी फोडून पारायण सोहळ्याची सांगता करण्यात आली.
या पारायण सोहळ्यात शिर्डी तसेच पंचक्रोशीतील तब्बल ८ हजार २०० पारायणार्थींनी सहभाग घेतला. आठवडाभर साईसच्चरित्राच्या अध्यायांचे वाचन, साईनामाचा जयघोष आणि भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण साईनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


अध्याय क्रमांक ५३च्या वाचनाने ग्रंथसमाप्ती
२० ऑगस्ट रोजी सकाळी अध्याय क्रमांक ५३ अर्थात अवतरणिकेचे वाचन करण्यात आले आणि श्री साईसच्चरित्र ग्रंथाची विधिवत समाप्ती झाली. त्यानंतर श्री साईसच्चरित्र या पवित्र ग्रंथाची पूजा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. वंदना गाडीलकर यांच्या हस्ते करण्यात आली.
भव्य मिरवणुकीने शिर्डीत भक्तीचा जल्लोष
ग्रंथसमाप्तीनंतर दुपारी २ वाजता पारायण समारोपाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये पारंपरिक संबळ वाद्यांची तब्बल १० ते १२ पथके सहभागी झाली होती.
श्री देव कुडाळेश्वर मित्र मंडळ, कुडाळ यांचे तीन धार्मिक देखाव्यांचे चित्ररथ हे मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरले. तसेच रंजीनी आर्ट्स, मालाप्पुरा, केरळ यांच्या पारंपरिक वाद्यांसह सादर करण्यात आलेले दक्षिणात्य नृत्य आणि विविध सोंगे यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.


गोपाळकालाच्या कीर्तनाने वातावरण झाले भक्तिमय
आज सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. सौ. राधिका कालेकर, कोल्हापूर यांचे गोपाळकाला कीर्तन झाले. कीर्तनानंतर दहीहंडी फोडून पारायण सोहळ्याची उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली.
यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, मंदिर प्रमुख विष्णु थोरात, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी, नाट्य रसिक मंचाचे पदाधिकारी, पारायणार्थी तसेच शिर्डीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


महाप्रसादाने भक्ती सोहळ्याची सांगता
सांगता सोहळ्यानंतर दुपारी १२.३० ते ४ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. दरम्यान, आज सायंकाळी ७.३० ते रात्री ९.३० या वेळेत ह.भ.प. सौ. राधिका कालेकर यांचा भारुडाचा कार्यक्रम होणार आहे.
साईसच्चरित्राच्या पारायणातून साईभक्तीचा जागर करत आठवडाभर रंगलेला हा सोहळा भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक एकात्मतेचा सुंदर संगम ठरला. साईनामाच्या जयघोषात झालेल्या या सांगता सोहळ्याने साईनगरीतील भक्तिमय वातावरणाला आणखी उंची मिळाली.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button