Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
क्राईमशिर्डी

शिर्डीत मटक्याचा सुळसुळाट! टपरीच्या आडोशाला ‘कल्याण’चा डाव पोलिसांचा छापा एक जेरबंद

शिर्डी | प्रतिनिधी :
साईनगरी शिर्डीत मटका जुगाराचे धंदे पुन्हा डोके वर काढत असल्याचे चित्र समोर आले आहे. शहरातील कोते गल्ली परिसरात टपरीच्या आडोशाला सुरू असलेल्या ‘कल्याण मटका’ जुगाराच्या अड्ड्यावर शिर्डी पोलिसांनी छापा टाकत एका इसमाला रंगेहाथ पकडले. या कारवाईत ७६० रुपये रोख रकमेसह मटका जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.
पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांना गोपनीय बातमीदारामार्फत कोते गल्ली येथे टपरीच्या आडोशाला कल्याण मटका हारजितीचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी पंचांना सोबत घेत कारवाईची तयारी केली.
पोलिसांचे पथक १२ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास संबंधित ठिकाणी पोहोचले. छापा टाकताच दशरथ गेणू समशेर (वय ४८, रा. सीतानगर, शिर्डी) हा कल्याण मटका जुगार खेळताना पोलिसांच्या हाती लागला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्याकडून ७६० रुपये रोख आणि मटका जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी तो जप्त केला.
या प्रकरणी पोलीस शिपाई रविंद्र रंगनाथ गोंदे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून, आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साईनगरीत मटका चालतो तरी कसा?
शिर्डी हे देश-विदेशातून लाखो भाविक येणारे धार्मिक शहर असताना शहराच्या गल्लीबोळात मटका जुगाराचे डाव रंगत असल्याने नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

टपरीच्या आडोशाला मटका चालविण्याइतपत जुगार व्यावसायिकांचे धाडस वाढले असेल, तर त्यामागे मोठे नेटवर्क तर नाही ना? असा सवाल उपस्थित होत आहे.
पोलिसांनी एका जुगाऱ्यावर कारवाई केली असली, तरी मटका खेळणाऱ्यांपेक्षा हा जुगार चालविणारे मुख्य सूत्रधार कोण, पैसा कुठे पोहोचतो आणि शहरात आणखी किती ठिकाणी असे अड्डे सुरू आहेत, याचा शोध घेणे गरजेचे आहे.
आता शिर्डी पोलिसांच्या पुढील तपासात मटका जुगाराच्या या डावामागील मोठी साखळी उघडकीस येते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button