Letest News
लक्ष्मीनगर अतिक्रमण प्रश्न तापला- शिर्डी प्रशासनाची मोठी हालचाल-स्थळपाहणी व चौकशीचे आदेश- तहसीलदारां... शिर्डीचा भूमिपुत्र निहार गीते पुन्हा झळकणार रुपेरी पडद्यावर-‘बेवारस’मधून साकारणार महत्त्वाची भूमिका “दारू पाजून काळी आई लुटली?” कॅप्टन खरातवर कोट्यवधींच्या जमिनीचा डल्ला-शिर्डीत संतापाचा ज्वालामुखी! साईनगरीत प्रामाणिकतेचा आदर्श-सुरक्षा व आरोग्य कर्मचाऱ्यांची ईमानदारी ठरली कौतुकास्पद! शिर्डीतून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा इशारा- भोंदूबाबा खरात प्रकरणात “कठोर कारवाई अटळ!” मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम शिर्डीत ‘4 एकर’चा स्फोटक घोटाळा-गहाण जमीन थेट विक्रीत-कोट्यवधींचा खेळ उघड! शिर्डीत श्री रामनवमी उत्सवाची भक्तीमय सांगता-दहिहंडी फोडत उत्सवाचा समारोप २ लाखांची लाच घेताना शिर्डीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी रंगेहात- पुणे महसूल विभाग हादरला भोंदू बाबाशी नाव जोडल्याने केसरकर संतापले ‘राजकीय कट’ असल्याचा थेट आरोप!” “ओळख मान्य पण संबंध नाकारल...
अ.नगरक्राईम

पोलीस निरीक्षक कुंभार अ‍ॅक्शन मोडमध्ये-कोपरगावात गुन्हेगारीला थेट इशारा!”

कोपरगाव (प्रतिनिधी) – आगामी शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राबविण्यात आलेल्या ‘ऑल आऊट ऑपरेशन’मुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. दिनांक १७ फेब्रुवारी रोजी राबवलेल्या या विशेष मोहिमेत पोलिसांनी शहरातील विविध भागात एकाचवेळी धडक कारवाया करत गुन्हेगारी प्रवृत्तीवर थेट घाव घातला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


⚔️ हनुमान नगरात तलवारींसह दोघे ताब्यात
हनुमान नगर परिसरात सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे तलवार बाळगणारे अर्जुन राजू सोनावणे (वय ३२) व विशाल संजय जगधाने (वय २०) यांना पोलिसांनी तत्काळ पकडले. दोघांवर आर्म्स अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले. शिवजयंतीसारख्या संवेदनशील काळात शस्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाईचा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला.


🎲 महादेवनगरात जुगार अड्ड्यावर धाड; रोकड व साहित्य जप्त
महादेवनगर येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून हर्षल सुरेश गवळी (वय २६) व किशोर शंकर दीक्षित (वय ५६) यांना रंगेहात पकडण्यात आले. ३,७५० रुपये रोकड व जुगार साहित्य जप्त करण्यात आले असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई सुरू आहे.


🍾 हातभट्टी दारूवर घाव; ४० लिटर तयार दारू जप्त
जेऊर पाटोदा परिसर व बुद्धविहार भागात गावठी हातभट्टी दारू विक्रीवर पोलिसांनी छापे टाकले. बाळासाहेब केशव आहेर (वय ५७) व गोरख बळीराम पवार (वय ३४) यांच्याकडून ४० लिटर तयार दारू व ४०० लिटर कच्चे रसायन जप्त करून पंचांसमक्ष नष्ट करण्यात आले. सुमारे २९,३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.


🚫 तंबाखूयुक्त माव्यावर कारवाई; अडीच किलो माल जप्त
शहरातील विविध ठिकाणी आरोग्यास अपायकारक तंबाखू मिश्रित मावा विक्री करणाऱ्या साहिल उमर कुरेशी (वय १९) व नदीम सलीम शेख (वय ३५) यांच्यावर गुन्हे दाखल करून सुमारे अडीच किलो मावा व पॅकिंग साहित्य जप्त करण्यात आले.


👮‍♂️ कडक इशारा; मोहीम पुढेही सुरूच
पोलीस निरीक्षक कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या धडक मोहिमेमुळे शहरातील अवैध धंदे करणाऱ्यांना स्पष्ट इशारा मिळाला आहे. “शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या कठोर कारवाया सातत्याने सुरू राहतील,” असा इशारा पोलिस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
दरम्यान, शिवजयंती शांततेत व उत्साहात पार पाडण्यासाठी पोलिसांनी उचललेल्या या ठोस पावलांचे नागरिकांकडून स्वागत होत असून, गुन्हेगारीविरोधात अशीच कठोर भूमिका कायम ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button