Letest News
मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी!
राजकीयशिर्डी

“ओडीसाच्या साईभक्तेकडून साईचरणी सुवर्ण अर्पण ७.५६ लाखांचे आकर्षक सोन्याचे ब्रोच भेट”

श्री साईबाबांप्रती अखंड श्रद्धेचा सुवर्ण नजराणा”
शिर्डी : जगभरातील कोट्यवधी साईभक्तांची श्रद्धास्थान असलेल्या श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट येथे दररोज भक्तांकडून विविध प्रकारच्या देणग्या अर्पण केल्या जातात. साईबाबांवरील अपार श्रद्धेतून ओडीसा राज्यातील भुवनेश्वर येथील साईभक्त श्रीमती संजुक्ता स्वाईन यांनी श्री साईचरणी तब्बल ७ लाख ५६ हजार ३३८ रुपये किमतीचे ६२ ग्रॅम वजनाचे आकर्षक नक्षीकाम केलेले सोन्याचे ब्रोच अर्पण केले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


“सोन्याच्या ब्रोचवर आकर्षक नक्षीकाम; भक्तीभावाचा अनोखा आविष्कार”
साईभक्त श्रीमती संजुक्ता स्वाईन यांनी अर्पण केलेल्या या सोन्याच्या ब्रोचवर अत्यंत सुंदर आणि आकर्षक नक्षीकाम करण्यात आले असून, त्यामधून साईबाबांप्रती असलेली निस्सीम भक्ती आणि श्रद्धा व्यक्त होत आहे. साईभक्तांकडून अशा प्रकारे होणाऱ्या देणग्यांमुळे साईसमाधीचे वैभव अधिक वृद्धिंगत होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.संस्थानच्या वतीने साईभक्तांचा सत्कार”
या देणगीप्रसंगी भिमराज दराडे यांनी संस्थानच्या वतीने साईभक्त श्रीमती संजुक्ता स्वाईन यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी संस्थानच्या अधिकाऱ्यांनी साईभक्तांच्या श्रद्धेला मानाचा मुजरा केला.


“देश-विदेशातील भक्तांकडून साईचरणी सेवाभाव”
शिर्डीतील साईसमाधी मंदिर हे देश-विदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले असून, भक्त विविध स्वरूपात देणग्या अर्पण करत असतात. साईबाबांवरील श्रद्धा, सेवाभाव आणि भक्तीचा हा सुवर्ण नजराणा पुन्हा एकदा साईभक्तांच्या अतूट विश्वासाची प्रचिती देणारा ठरला आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button