Letest News
समकालीन साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे वाड्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतले दर्शन साईसच्चरिताचा जयघोष सवाद्य मिरवणुकीने पारायण सोहळ्याला दिमाखात सुरुवात! मंगलमय वातावरणात श्रीसाईसच्चरित पारायण सोहळ्याचा शुभारंभ काळे रुमाल बांधलेल्या दोन चोरट्यांचा शिर्डीत धुमाकूळ लाखोच्या सोन्याची चैन हिसकावली गोरगरिबांच्या शिध्यावर डल्ला? राहात्यात ५.९० लाखांचा माल ताब्यात शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात पोलिसांची धडक मोहीम-भल्या पहाटे पोलिसांचा शहरभर धडाका नगर-मनमाड महामार्गाची साडेसाती संपणार कधी? सहा वर्षांत तीन कंत्राटदार बदलले तरी लोकप्रतिनिधींचे मौन ... तोतया पत्रकारांची धाड की खंडणीचा डाव? महिलेकडे मागितले तब्बल एक लाख! ग्रामपंचायत अधिकाऱ्याची १० हजारांची लाच मागणी ५ हजार घेताना ACBच्या जाळ्यात! साईबाबांच्या बदनामीकारक व्हिडीओंना चाप बसणार! दिल्ली उच्च न्यायालयाचे GAC ला दणका
क्राईमशिर्डी

“श्रद्धा सबुरी पतसंस्था की ४१.९७ कोटींचा स्फोटक खेळ? १४ वर्षांचा हिशेब मागतोय जनतेचा सवाल!

१४ वर्षे ‘ऑल क्लिअर’… आणि आता ४१.९७ कोटींचा भूकंप! ही चूक की संगनमत?
शिर्डी प्रतिनिधी | राहाता तालुका
निमगाव कोराळे येथील श्रद्धा सबुरी पतसंस्था प्रकरणाने आता केवळ आर्थिक अनियमिततेची चौकट ओलांडली आहे. तब्बल ४१ कोटी ९७ लाख रुपयांचा कथित गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर एकच सवाल जिल्हाभर घुमतोय —
“जर सर्व काही सुरळीत होतं, तर हा महाघोटाळा अचानक कुठून उगवला?”
सलग १४ वर्षे लेखापरीक्षण करणारेच लेखापरीक्षक फिर्यादी असल्याची माहिती समोर आल्यानंतर संशयाचे सावट अधिक गडद झाले आहे. वर्षानुवर्षे दिलेले ‘स्वच्छ’ अहवाल आता प्रश्नांच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


🔎 लेखापरीक्षण की लपवाछपवी? जबाबदारीच्या साखळीवर थेट बोट
जर गैरव्यवहार सुरू होता, तर तो दरवर्षीच्या अहवालात का दिसला नाही?
गंभीर निरीक्षणे कुठे गायब झाली?
संस्थेला दिलेली श्रेणी कसल्या आधारावर होती?
राहाता येथील सहाय्यक निबंधक कार्यालय आणि संपूर्ण सहकार नियंत्रण साखळी आता रडारवर आली आहे. “केवळ संचालकांवर गुन्हा दाखल करून जबाबदारी झटकता येणार नाही; लेखापरीक्षण ते मंजुरीपर्यंत प्रत्येक कडीची चौकशी झालीच पाहिजे,” अशी ठाम मागणी ठेवीदारांनी केली आहे.


⚖️ अटक पुरेशी नाही; आमचे पैसे परत द्या!
काही आरोपी अटकेत असले तरी ठेवीदारांच्या जखमा अजून ताज्याच आहेत.
“आयुष्यभराची कमाई अडकली… परतफेडीचा ठोस आराखडा कुठे आहे?” असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
लवकरच ठेवीदार प्रतिनिधी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि जिल्हाधिकारी पंकज आशिया यांची भेट घेऊन स्वतंत्र, निष्पक्ष आणि उच्चस्तरीय तपासाची मागणी करणार असल्याची माहिती आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास सोपवण्याची मागणीही जोर धरत आहे.


🔥 सत्य बाहेर येईपर्यंत लढा थांबणार नाही!
“१४ वर्षे सर्व काही ठीक होतं की सत्य मुद्दाम दडवण्यात आलं?”
हा प्रश्न आता जनतेच्या मनात पेटलेल्या ज्वालामुखीसारखा धगधगत आहे.
जोपर्यंत जबाबदारीची साखळी उघड होत नाही, दोषींवर कठोर कारवाई होत नाही आणि ठेवीदारांना न्याय मिळत नाही — तोपर्यंत हा संताप शांत होणार नाही, हे स्पष्ट दिसत आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button