Letest News
साईनामाशी नातं असलेली ज्येष्ठ व्यक्ती हरपली-आशालता ताई नागरे यांच्या निधनाने शिर्डीत शोककळा रामनवमी उत्सवात ‘रिल’चा स्फोट शिर्डीची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा ‘लाचखोरीचा स्फोट!’ — शिर्डीचे प्रांत सीताराम गायकर यांचे जावई लाचखोर गोविंद शिंदे यास दिवस पोलीस कोठ... ‘रॉकेल आहे… पण स्टोव्ह नाही!’ शिर्डीत नागरिकांची अक्षरशः कोंडी लक्ष्मीनगर अतिक्रमण प्रश्न तापला- शिर्डी प्रशासनाची मोठी हालचाल-स्थळपाहणी व चौकशीचे आदेश- तहसीलदारां... शिर्डीचा भूमिपुत्र निहार गीते पुन्हा झळकणार रुपेरी पडद्यावर-‘बेवारस’मधून साकारणार महत्त्वाची भूमिका “दारू पाजून काळी आई लुटली?” कॅप्टन खरातवर कोट्यवधींच्या जमिनीचा डल्ला-शिर्डीत संतापाचा ज्वालामुखी! साईनगरीत प्रामाणिकतेचा आदर्श-सुरक्षा व आरोग्य कर्मचाऱ्यांची ईमानदारी ठरली कौतुकास्पद! शिर्डीतून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा इशारा- भोंदूबाबा खरात प्रकरणात “कठोर कारवाई अटळ!” मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम
अ.नगरक्राईम

राहात्यात अवैद्य धंद्यांचा उच्छाद-पण  पोलीस-प्रशासन-मंत्री सगळेच मौन… “इतना सन्नाटा क्यू छाया है भाई?”

राहाता | निर्भीड प्रतिनिधी – दैनिक साईदर्शन
राहाता शहरात कायद्याची माती करून अवैद्य सावकारी, गुटखा तस्करी, बिंगो वाळू तस्करी जुगाराचे साम्राज्य उभे राहिले असताना, पोलीस प्रशासन आणि राज्यकर्त्यांच्या रहस्यमय शांततेने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे. गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेली नसून, कायदाच गुन्हेगारांच्या पायाशी लोळण घेतोय का? असा थेट सवाल नागरिक विचारत आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

दीपक पोकळे : गुन्हेगार की ‘संरक्षित सत्ता केंद्र’?
राहाता शहरात अवैद्य व्यवसायांच्या जोरावर मोठा झालेला कुख्यात गुन्हेगार दीपक पोकळे हा केवळ एक आरोपी नाही, तर तो सत्तेच्या कुबड्यांवर चालणारा गुन्हेगिरीचा ब्रँड बनला आहे कि काय?. अनेक गंभीर गुन्हे दाखल असतानाही त्याचे अवैद्य व्यवसाय दिवसाढवळ्या सुरू राहणे म्हणजे पोलीस व राजकीय आशीर्वादाशिवाय अशक्य बाब आहे.

सचिन गिधे हत्या : प्रशासनाच्या अंगावर काटा आणणारी अमानुषता
मानवतेला काळीमा फासणारी घटना – सचिन गिधे या तरुणास टायरवर टाकून, रॉकेल-डिझेल ओतून जिवंत जाळण्यात आले. ही घटना राहाता पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली…
प्रश्न एकच – तेव्हा पोलिसांचे हात कुठे होते?

अटक केवळ दिखावा का? अवैद्य धंदे आजही राजरोस
गुन्हेगार अटकेत असतानाही त्याचे अवैद्य व्यवसाय सुरुच असणे म्हणजे पोलीस कारवाई हा केवळ कागदी देखावा आहे का? असा संतप्त सवाल उपस्थित होतो. शहरात खुलेआम चालणारी अवैद्य सावकारी, गुटखा व जुगार वाळू तस्करी प्रशासनाला दिसत नाही की दिसूनही दुर्लक्ष केले जाते?

दैनिक साईदर्शनचा निर्भीड आरसा
दैनिक साईदर्शनने सत्याचा आरसा दाखवत या गुन्हेगाराची संपूर्ण कुंडली उघडी पाडली. ही बाब थेट राज्याचे मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे, तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर मांडली.
मात्र त्यानंतरही परिस्थिती ‘जैसे थे’च राहिल्याने, हे मौन निष्क्रियतेचे की सहभागाचे? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

नागरिकांचा रोष उफाळला – ‘कारवाई नाही तर संघर्ष’
राहाता शहरातील नागरिक आता गप्प बसणार नाहीत, असा इशारा देत आहेत.
नागरिकांची ठाम मागणी आहे की –
ना. राधाकृष्ण विखे यांनी पालकमंत्री म्हणून जबाबदारी घ्यावी
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी थेट धडक कारवाई करावी
अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी
उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी अवैद्य व्यवसाय तात्काळ बंद करावेत
अन्यथा, “कायद्याची अब्रू रस्त्यावर फेकली गेली” असा इतिहास राहात्याच्या नावावर कोरला जाईल, असा इशारा नागरिक देत आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button