Letest News
शिर्डीत पर्यटकांच्या गाड्यांवर चोरट्यांचा डल्ला साईभक्ताची बॅग-मोबाईल आणि रोख रक्कम लंपास पोलीस असल्याची बतावणी-प्रेमसंबंधांचे आमिष अन् शिर्डीत अत्याचार? नांदगाव प्रकरणाने खळबळ “डेथ नेटवर्क”चा फैलाव? राहाता तालुक्यात गर्भलिंग रॅकेटची भीषण साखळी उघड होण्याची चिन्हे पोलीस ठाण्यातही लिंगपिसाट भोंदू खरातचा माज साक्षीदारांनाच दिली दमदाटी! भोंदू खरातचा जेलमधील मुक्काम वाढला-कोर्टाकडून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी राहात्यात गर्भलिंग रॅकेटचा महाभंडाफोड-पुण्यापर्यंत पोहोचले धागेदोरे- राहता तालुक्यातील “मोठे मासे” र... साईदरबारात पुन्हा दिसली प्रामाणिकतेची झलक-१५ हजारांची पर्स साईभक्ताला सुखरूप परत इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैनस्नॅचिंग-श्रीरामपूरची टोळी जेरबंद-LCB ची धडाकेबाज कारवाई पाथर्डीत समता पतसंस्थेचा गाशा गुंडाळला? ठेवीदारांचे लाखो अडकले? पाथर्डीत एकच खळबळ समता पतसंस्थेच्या घोटाळ्यात ED ची मोठी एन्ट्री-अशोक खरातच्या लॉकरमधून कोट्यवधींचं घबाड
क्राईमशिर्डी

किराणा दुकान फोडून सुमारे 40 हजार रुपये किंमतीचा माल व रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी केली लंपास!

शिर्डी( प्रतिनिधी) राहाता तालुक्यातील रुई येथील अहिरे यांचे किराणा दुकान फोडून सुमारे 34 हजार रुपये किंमतीचा किराणा माल व रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद्र पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. या संदर्भात येथील मोहनीश मधुकर अहिरे यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की, रुई येथे माझे मालकीचे आहीरे जनरल किराणा दुकान मी स्वत चालवतो व त्यावर माझा प्रपंच चालवतो.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

माझे घरापासून काही अंतरावरच माझे किराणा दुकान आहे.दिनांक-12/03/2025 रोजी रात्री 08.30 वा. चे सुमारास मी नेहमी प्रमाणे माझे दुकान बंद करुन दुकानाचे शटर आत मधून बंद करून दुकानाच्या मागील दरवाजाला कुलूप लावून घरी गेलो होतो. दि. 13/03/2025 रोजी सकाळी 07/.00 वा. चे सुमारास मी नेहमी प्रमाणे माझे किराणा दुकान उघण्यास गेलो असता माझ्या दुकानाचे मागील बाजुस असलेल्या दरवाजाचा कडी कोंडा तुटलेला मला दिसला

त्यामुळे मी व माझ्या बरोबर आलेली माझी आई मनिषा असे आम्ही दुकानात जावून पाहणी केली असता आमच्या दुकानाचे तीन साखरेचे कटटे, तांदळाचे कट्टा, शेंगदाणे चा कट्टा, सुटटे गोडतेल कॅन किरकोळ किराणा सामान व गल्ल्यातील रोख रक्कम ही मला दिसली नाही त्यामुळे माझी खात्री झाली की कुणीतरी अज्ञात चोरटयाने माझ्या दुकानाचे मागील बाजुचे दरवाजाचा कडीकोंडा तोडून दुकानात प्रवेश करून चोरी केली आहे.

1) 6,000/- रु कि तीन साखरेचे कटटे ,2) 5100/- रु किं चे तांदुळ 30 किलो ,3) 2500/- रु किं चा एक शेंगदाणा कटटा 25 किलो 4) 5300/- रु किं चे एक गोडतेल कॅन 35 किलो ,5) 5000/- रु कि चे किरकोळ किराणा सामान व 6) 10000/-रु.रोख रक्कम त्यात वेगवेगळ्या दराच्या नोटा व चिल्लर असी 33,900/- रुपये किमंतीची चोरी झाली आहे. अशा आशयाची फिर्याद मोहिनिश मधुकर अहिरे यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शिर्डी पोलीस करत आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button