Letest News
ड्रेनेजची तक्रार केली म्हणून महिलेवर हात उचलला! लाथाबुक्क्यांनी मारहाण दगडाने डोके फोडले ‘कुटुंबाला... शिर्डीत भक्तिमय वातावरणात श्री गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात अनाथ बालकांसोबत ‘दबंग’ अधिकाऱ्याचा वाढदिवस!कायदा-सुव्यवस्थेत कणखर भूमिका सामाजिक जाणीवेतही तितकीच सं... मध्यस्थीची भावना जुनी आधुनिक स्वरूप अधिक परिणामकारक! — न्या. शिवाजी कचरे प्रमुख जिल्हा व सत्र न्याया... कडक शिस्तीच्या अधिकाऱ्याला सर्वपक्षीय सलाम! अमोल मोरे यांची प्रांताधिकारीपदी पदोन्नती सापडलेला लाखाचा मोबाईल साईभक्ताला परत संस्थान कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाला सलाम! निर्व्यसनी तरुणाईची एकजूट ढोल-ताशांच्या गजरात रंगणार गोविंदांचा जल्लोष शिर्डीच्या साईदरबारी भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा गोकुळाष्टमीनिमित्त साईचरणी सोन्याचा ब्रोच अर्पण भगवान थोरात यांची ग्राहक संरक्षण समितीच्या राहाता तालुका प्रवक्तेपदी नियुक्ती
राजकीयशिर्डी

रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र निवड समितीवर डॉ. सुरेश हावरे यांची नियुक्ती

शिर्डी | प्रतिनिधी
शिर्डी श्री साईबाबा संस्थानचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ उद्योगपती डॉ. सुरेशजी हावरे यांची श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) निवड समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती धार्मिक, सामाजिक आणि व्यवस्थापन क्षेत्रात त्यांच्या दीर्घ अनुभवाची दखल मानली जात असून शिर्डीसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब ठरत आहे.
डॉ. हावरे यांनी शिर्डी साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात पारदर्शक प्रशासन, भाविकाभिमुख सुविधा आणि विकासकामांवर भर देत प्रभावी नेतृत्व केले होते. उद्योग, व्यवस्थापन, समाजसेवा आणि सार्वजनिक जीवनातील त्यांचा व्यापक अनुभव लक्षात घेऊन त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राशी संबंधित विविध प्रशासकीय प्रक्रिया अधिक सक्षम आणि गुणवत्तापूर्ण करण्यासाठी निवड समितीची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. अशा समितीवर डॉ. हावरे यांची निवड झाल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
या नियुक्तीमुळे धार्मिक वारशाचे जतन, सुयोग्य प्रशासन आणि विकासात्मक निर्णयप्रक्रियेला अधिक बळ मिळेल, असा विश्वास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केला आहे.
डॉ. सुरेशजी हावरे यांच्या नियुक्तीचे वृत्त समोर येताच सामाजिक, धार्मिक, औद्योगिक तसेच शिर्डी परिसरातील विविध संस्था, पदाधिकारी आणि नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील कार्यासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button