Letest News
शिर्डीत रिक्षातून वृद्धाची लूट सराईत गुन्हेगार रहीम पठाणसह दोघांना २ दिवसांची पोलीस कोठडी समता घोटाळा : व्यवस्थापकाला पोलीस कोठडी आता 'मोठ्या माश्या'वर कारवाई कधी? शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा
क्राईमशिर्डी

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्याशी वाढत चाललेले संबंध व पक्ष संघटनेत वाढलेले प्रभुत्व देखवत नसल्यामुळेच कमलाकर कोतेंवर खोटे आरोप

शिर्डी (प्रतिनिधी)   जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांचे शिवसेना शिंदे गटात तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे व पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी अधिक घनिष्ठ संबंध होत असल्याकारणाने व पक्षांमध्ये चांगले प्रभुत्व निर्माण झाल्यामुळे  पक्षातीलच काहीजणांना ते आवडत नसावे,

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

म्हणूनच असे असंतुष्ट काहीजण विनाकारण जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांना काहीतरी कारण दाखवून बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. असा आरोप शिवसेना शिंदे गटाचे शिर्डी शहरप्रमुख योगेश जगताप यांनी म्हटले आहे. शिवसेना शिंदे गटाची शिर्डी शासकीय विश्रामगृहात मीटिंगमध्ये किरकोळ वाद झाले.

त्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या एका पदाधिकाऱ्याने कमलाकर कोते यांच्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार दिली. या संदर्भात  शहरप्रमुख योगेश जगताप   यांनी सांगितले की, पक्षातीलच काही जणांना जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांचे  राज्याचे मान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे ,

पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह शिवसेना पक्षांमध्ये वाढत चाललेले प्रभुत्व हे त्यांच्या मनात खटकत आहे. पक्ष वाढीसाठी जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांचे  प्रयत्न सातत्याने सुरू आहे. मात्र पक्षातीलच काही या पक्ष संघटनेमध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करत आहेत. याला शिर्डीसह काही पक्षाचे पदाधिकारीच पाठीमागून हातभार लावण्याचे काम करत आहेत.

त्यामुळेच जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांना  विनाकारण यातून बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र आपण अशा खोट्या आरोपांना भिक घालत नाही. असे शहरप्रमुख योगेश जगताप  यांनी म्हटले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button