Letest News
साईनगरीत रामनवमीचा जल्लोष- लाखोंच्या गर्दीतही शिस्तीचा विक्रम!भक्तीचा महासागर शिर्डीत उसळला-प्रशासना... शिर्डीत भाविकांना लक्ष्य- मंदिरातच दागिन्यांवर डल्ला – 1.25 लाखांचा ऐवज लंपास 🔥 शिर्डीत रेशन घोटाळा उघड-दुकानदाराची दादागिरी शिगेला- नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! 78 लाखांचा कापड घोटाळा उघड-अहिल्यानगर पोलिसांची राजस्थानपर्यंत धडक कारवाई AI फोटोचा धक्कादायक प्रकार-AK-47 दाखवत इंस्टाग्रामवर दहशत पसरवण्याचा प्रयत्न-दोघांवर गुन्हा! लिंगपिसाट खरात भोंदूबाबाच्या देवस्थानाला कोट्यवधींचा निधी-प्रस्तावच गायब?  ईशानेश्वर देवस्थान प्रकरण... “घरावरचा बुलडोझर थांबला!” – शिर्डीत गरीबांना मोठा दिलासा-फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय-“फडणवीसांच्य... शिर्डी सह राहता तालुक्यात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस-नागरिकांची धांदल उडाली साईनामाशी नातं असलेली ज्येष्ठ व्यक्ती हरपली-आशालता ताई नागरे यांच्या निधनाने शिर्डीत शोककळा रामनवमी उत्सवात ‘रिल’चा स्फोट शिर्डीची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा
राजकीयशिर्डी

साईसेवेचा सुंदर नमुना-संस्थानला २५ लाखांची अत्याधुनिक स्कूल बस भेट

शिर्डी | प्रतिनिधी
श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी संचलित शैक्षणिक संकुलासाठी बेंगळुरू येथील साईभक्त श्री. सुमंत रेड्डी यांनी SML ISUZU कंपनीची अत्याधुनिक स्कूल बस देणगी स्वरूपात अर्पण केली आहे. सुमारे २५ लाख ३८ हजार ४०६ रुपये किंमतीची ही बस संस्थानच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षित आणि सुलभ प्रवासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
आज सकाळी या नूतन वाहनाची देणगीदार साईभक्तांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आली. त्यानंतर स्कूल बसची चावी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्याकडे औपचारिकरित्या सुपूर्द करण्यात आली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


संस्थानतर्फे सत्कार
यावेळी संस्थानचे प्रशासकीय अधिकारी श्री. अतुल वाघ, मंदिर विभाग प्रमुख श्री. विष्णु थोरात यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
देणगीदार साईभक्त श्री. सुमंत रेड्डी यांचा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी शाल व साईबाबांची प्रतिमा देऊन सत्कार केला.


विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित प्रवासाची सोय
ही अत्याधुनिक बस संस्थानच्या शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रवासासाठी उपयोगी ठरणार असून, सुरक्षितता आणि सोयीसुविधांच्या दृष्टीने महत्त्वाची भर मानली जात आहे.
साईभक्तांकडून शिक्षण आणि सामाजिक कार्यासाठी मिळणाऱ्या देणग्या या साईसेवेच्या परंपरेचा सुंदर भाग असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.


🕉 साईराम… सेवा हीच खरी साईभक्ती! 🙏✨

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button