Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
राजकीयशिर्डी

जर्मनीतील ४१ साईभक्तांची शिर्डीत भक्तीमय साईसेवा समाधी मंदिरात गुंजले साईभजन

शिर्डी | प्रतिनिधी
साईबाबांच्या भक्तीला देश-विदेशाच्या सीमा नसल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. जर्मनीतील तब्बल ४१ परदेशी साईभक्तांनी शिर्डीत येऊन श्री साईबाबांच्या समाधीचे अत्यंत श्रद्धा आणि भक्तिभावाने दर्शन घेतले. साईचरणी नतमस्तक होत त्यांनी आपल्या आध्यात्मिक प्रवासाची अविस्मरणीय अनुभूती घेतली.
दर्शनानंतर या सर्व साईभक्तांनी श्री साईबाबा समाधी मंदिरातील स्टेजवर सुमधुर साईभजनांचे सादरीकरण केले. त्यांच्या मधुर स्वरांनी आणि साईनामाच्या अखंड गजराने संपूर्ण समाधी मंदिर परिसर भक्तिरसाने भारावून गेला. देश-विदेशातील भाविकांनीही या भक्तिमय वातावरणाचा मनसोक्त आनंद घेत टाळ्यांच्या गजरात या साईसेवेचे कौतुक केले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


यावेळी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी जर्मनीतील सर्व साईभक्तांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला. त्यांनी परदेशातून येणाऱ्या साईभक्तांमुळे साईबाबांच्या श्रद्धा व सबुरीचा संदेश जगभर पोहोचत असल्याचे सांगत त्यांच्या भक्तिभावाचे कौतुक केले.
शिर्डीत आलेल्या या जर्मन साईभक्तांच्या भक्तिमय सेवेमुळे साईनामाचा जागतिक महिमा पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला. श्रद्धा, सबुरी आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या चरणी विविध देशांतील भाविक एकत्र येत असल्याने शिर्डीचे जागतिक आध्यात्मिक केंद्र म्हणून असलेले महत्त्व अधिक अधोरेखित झाले.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button