Letest News
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष...
क्राईमशिर्डी

शिर्डीत काही दिवसांपूर्वी हिंदू मुलीचा विनयभंग  व  त्या आरोपीविरोधात गुन्हा दाखल झालेले  वृत्त काढून टाकावे म्हणून फोन! 

शिर्डी( प्रतिनिधी) शिर्डी येथे गेल्या काही दिवसापूर्वी नांदुरखी रोड लगत कालिकानगर येथील आरशत ताहीर सय्यदयाने  एका मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्या संदर्भात शिर्डीतील हाजी अब्दुल बाबा यांचे वंशज समजल्या जाणाऱ्या हमीद पठाण यांचा नातू आरशत ताहीर सय्यद ह्या तरुणा विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. सर्वत्र या संदर्भात चर्चा सुरू असताना व गुन्हा दाखल झाला असताना त्या संदर्भातील वृत्त दैनिक साईदर्शनने प्रसिद्ध केले होते. शिर्डी येथील बजरंग दल व इतर हिंदुत्ववादी संघटनांनी या विरोधात आवाज उठवला होता व आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे. अशी मागणी केली होती. असे असताना या आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रकार सध्या शिर्डीतील मणिलाल पटेल या व्यक्तीकडून होतो की काय? अशी शंका येत आहे.

कारण मनीलाल पटेल यांनी दैनिक साई दर्शनचे संपादक जितेश लोकचंदानी यांना फोन करून या संदर्भातील वृत्त आपल्या दैनिक साई दर्शन या यूट्यूब  टाका असे आपल्या भ्रमणध्वनीद्वारे सांगितले. याचाच अर्थ ही धमकी तर म्हणायची नाही ना? असा   प्रश्न उपस्थित होत आहे. कोणत्याही वृत्तपत्र किंवा पत्रकाराने पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यानंतर ते वृत्त देणे, हे कोणाचेही विरोधात नाही.

जे सत्य आहे ते वृत्त प्रसिद्ध केले जाते. वृत्तपत्र किंवा पत्रकारा ने कोणत्या बातम्या द्यायच्या व देऊ नये हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मनीलाल पटेल काय किंवा कोणी काय यांनी ते सांगण्याची गरज नाही, एकीकडे बजरंग बल आणि हिंदुत्ववादी संघटनां या प्रकरणात पुढे आले आहेत. आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणाऱ्या शिर्डी सारख्या शहरांमध्ये एका हिंदू मुलीचा विनयभंग केला. त्या आरोपी विरोधात शिर्डी पोस्टेला गुन्हा दाखल झाला.  

शिर्डी शहराची त्यामुळे बदनामी झाली.  अशा आरोपींना कडक सजा व्हावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी त्यावेळी केली होती. या संदर्भात वृत्त प्रसिद्ध झाले होते. असे हे वृत्त दैनिक साई दर्शन पोर्टल वरून काढून टाका असे म्हणून थेट संपादकांना फोन केला जातो. एक प्रकारे हा गुन्हा दाखल झालेल्या आरोपीला पाठीशी घालण्याचाच  प्रकार तर नाही ना?

कोणतेही  आरोपीला पाठीशी घालणारा सुद्धा सह आरोपी  होऊ शकतो. ‌  कुणी कितीही मोठा असो तो कायद्यापेक्षा मोठा नाही. भारतीय संविधान सर्वात मोठे आहे व संविधानाने व कायद्याने सर्वांना अधिकार दिले आहे .कायद्याने जो चुकला त्यावर गुन्हा दाखल होणार आहे व कायद्या प्रमाणे त्यास सजा होणार आहे.

कुणीही मोठी प्रतिष्ठा किंवा पैशाच्या जीवावर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करू नये.  एखाद्या हिंदू मुलीला पकडणे, पाठलाग करून  बळजबरी करणे, विनयभंगासारखा शिर्डी पोस्टेला गुन्हा दाखल होणे .तरीही अशा आरोपीला पाठीशी घालणे किंवा त्या संदर्भात देण्यात आलेले वृत्त काढून टाकणे म्हणणे हा सुद्धा गुन्हा नाही का? असा सवाल आता नागरिकांमधून होत आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button