Letest News
साईनामाशी नातं असलेली ज्येष्ठ व्यक्ती हरपली-आशालता ताई नागरे यांच्या निधनाने शिर्डीत शोककळा रामनवमी उत्सवात ‘रिल’चा स्फोट शिर्डीची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा ‘लाचखोरीचा स्फोट!’ — शिर्डीचे प्रांत सीताराम गायकर यांचे जावई लाचखोर गोविंद शिंदे यास दिवस पोलीस कोठ... ‘रॉकेल आहे… पण स्टोव्ह नाही!’ शिर्डीत नागरिकांची अक्षरशः कोंडी लक्ष्मीनगर अतिक्रमण प्रश्न तापला- शिर्डी प्रशासनाची मोठी हालचाल-स्थळपाहणी व चौकशीचे आदेश- तहसीलदारां... शिर्डीचा भूमिपुत्र निहार गीते पुन्हा झळकणार रुपेरी पडद्यावर-‘बेवारस’मधून साकारणार महत्त्वाची भूमिका “दारू पाजून काळी आई लुटली?” कॅप्टन खरातवर कोट्यवधींच्या जमिनीचा डल्ला-शिर्डीत संतापाचा ज्वालामुखी! साईनगरीत प्रामाणिकतेचा आदर्श-सुरक्षा व आरोग्य कर्मचाऱ्यांची ईमानदारी ठरली कौतुकास्पद! शिर्डीतून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा इशारा- भोंदूबाबा खरात प्रकरणात “कठोर कारवाई अटळ!” मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम
अ.नगरराजकीय

मी राधाकृष्ण विखे यांच्या मुलाच्या विरोधात निवडणूक लढविली विखे पाटील यांच्या मनामध्ये राग होता पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर

दिलीप खेडकर यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “माझ्या मुलीला जो त्रास झाला तो माझ्यामुळे झाला. मी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुलाच्या विरोधात निवडणूक लढविली होती. त्यामुळे माझ्या मुलीची बदनामी झाली”, असा आरोप दिलीप खेडकर यांनी केला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

बडतर्फ प्रशिक्षणार्थी IAS अधिरापी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. दिलीप खेडकर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आपल्या मुलीवर झालेले आरोप खोटे असल्याचं स्पष्ट केलं.

kamlakar

आपल्याविरोधात एफआयआर दाखल असल्याने दबाव होता. त्यामुळे आपण इतके दिवस समोर येऊ शकलो नाही, असा खळबळजनक आरोप दिलीप खेडकर यांनी केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची चिन्हं आहेत. “माझी मुलगी डॉ. पूजा खेडकर हिच्या बाबतीत जी माहिती दिली गेली

ती वस्तुस्थितीला धरून नाही. तिच्या बाबतीत एक फ्रॅाड मुलगी म्हणून सिलेक्शन झाल्याची माहिती गेली ती चुकीची आहे. तिचे आयुष्य उद्ध्वस्थ झाले आहे. माझ्या विरोधातही एफआयआर दाखल करण्यात आला होता म्हणून मला समोर येता आले नाही”, असं दिलीप खेडकर म्हणाले.

प्रस्थापितांना वाटत होतं उभं राहू नये. या नेत्यांनी जाणूनबुजून त्रास दिला. विखे पाटील यांच्या मनामध्ये राग होता. त्यांच्याकडे महसूल खाते होते. त्याचा शासकीय अधिकाऱ्यांवर प्रभाव पडला आहे. पण नैसर्गिक न्याय आम्हाला मिळायला पाहीजे होता. तो मिळाला नाही”, असा आरोप दिलीप खेडकर यांनी केला.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button