Letest News
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष...
क्राईमशिर्डी

दोन हजार रुपये ऍडव्हान्स परत देण्यास नकार! साई भक्ताची फसवणूक! शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल 

शिर्डी ( प्रतिनिधी) शनिशिंगणापूर जाण्यासाठी गाडी ठरवून डीझेलसाठी तीन हजार रुपये ॲडव्हान्स घेतले. मात्र गाडी आलीच नाही. हजार रुपये परत दिले मात्र दोन हजार रुपये देण्यास नकार देऊन फसवणूक केल्याची तक्रार शिर्डी पोलीस स्टेशनला साई भक्तांनी दाखल केले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

यासंदर्भात बेंगलोर येथील सिद्धेश शिवकुमार यांनी शिर्डी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे की, दि.06/05/2025 रोजी बेंगलोर येथून मी मेल‌द्वारे व फोनद्वारे 20 मे 2025 रोजी चे ट्रॅव्हेलींगचे बुकींग केले होते. त्यासाठी 7500/-रुपये चे भाडे सकाळी 11/00 ते रात्री 11/00 वाजे पावेतो ठरले होते. त्यात त्यांनी स्थानिक ठिकाणी साईनगरी आम्ही शनिशिंगनापुर येथे घेवुन जावुन परत शिर्डीत आणुन सोडायचे ठरले.

त्यासाठी मी स्थानिक एजंट राजवीर सिंग मोबाईल नंबर 9552263769 द्वारे Fun on the wheels Tours & travels शिर्डी चे बुकींग केले. त्यासाठी 1000/- रुपये अॅडवान्स दिला. अविनाश (मोनं. 9529888153) हा ड्रायव्हर तसेच गाडी मालक निलेश कुमार (मोनं. 7038743838) यांची गाडी देण्यात आली.

त्यासाठी नवीन गाडी क्र.एम.एच-15, ईएफ-0633 ही ठरवण्यात आली. परंतु प्रत्यक्षात त्यांनी जुनी गाडी क्र.एम.एच-47, वाय-3866 ही अत्यंत वाईट अवस्था असलेली गाडी दिली. तसेच त्यासाठी 3000/- रुपये डिझेल साठी पेड केले. साईबाबांचे दर्शन झाल्यानंतर ड्रायव्हर अविनाश याने शनि शिंगनापुर जाण्यास नकार दिला

व त्याने त्यांची गाडी रस्त्याच्या कडेला पार्क करुन तो दुचाकीवरुन निघुन गेला. परंतु मी त्यासाठी त्यांना एकुन 4000/-रुपये दिले होते. त्यातील 1000/- रुपये त्यांनी मला दिले. ठरल्या प्रमाणे त्यांचेकडे 2000/-रुपये बाकी राहिले होते ते मागीतले असता त्यांनी ते देण्यास नकार दिला व आता ते माझे कॉल उचलत नाही.

तेव्हा माझी खात्री झाली की, त्यांनी माझी 2000/-रुपये ची फसवणुक केली असून तशी फिर्याद शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. तीन पाच तीनशे अठरा चार त्यावरून शिर्डी पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता कलम 3 (5) , 318 (4) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शिर्डी पोलीस करत आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button