Letest News
शिर्डी परिसरात गुन्हेगारांची दहशत वाढली? भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला “साईंच्या नावावर ऑनलाईन दरोडा! बनावट वेबसाईटने भाविकांची फसवणूक” “साईचरणी ९२ लाखांचा सुवर्ण मुकुट… भक्तीसमोर सोन्यालाही तेज!” “वरून सर्व सेटिंग झाली का?” — शिर्डीतून अंजली दमानियांचा सरकारला थेट सवाल साई चरणी ३५०७ किलो सेंद्रिय केशर आंब्याचे अर्पण भाविकांना तीन दिवस आमरसाची मेजवानी २.१० लाखांची सोन्याची बांगडी सापडली-महिला सुरक्षा कर्मचाऱ्याने दाखवली प्रामाणिकता शिर्डीत मोकाट कुत्र्यांचा हैदोस-संस्थान कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला-हरिभाऊ कोते यांचा इशारा ठरला खरा? शिर्डीच्या दोन दमदार व्यक्तिमत्त्वांचा गौरव-विठ्ठलराव पवार आणि दिलीप खरात सन्मानित शिर्डीत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर-गरजू रुग्णांसाठी मोठा दिलासा अहिल्यानगर पोलीस मुख्यालयात स्मोक हँड ग्रेनेडचा स्फोट-चार प्रशिक्षणार्थी पोलीस जखमी
क्राईमशिर्डी

‘भोंदू’ खरात प्रकरणाला नवा टर्न-पत्नी कल्पना खरातच्या अटकपूर्व जामिनावर २२ तारखेला सुनावणी

शिर्डी : शिर्डी परिसरात गाजत असलेल्या बहुचर्चित फसवणूक प्रकरणात आता नवी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून चर्चेत असलेल्या तथाकथित ‘भोंदू’ खरात याच्या पत्नी कल्पना खरात हिने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला असून, त्या अर्जावर माननीय न्यायाधीश गुप्ता यांनी २२ तारीख सुनावणीसाठी निश्चित केली आहे.
प्रकरणाची पार्श्वभूमी काय?
शिर्डी परिसरात काही दिवसांपासून ‘भोंदू’ खरात यांच्या नावाने लोकांची आर्थिक फसवणूक झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. धार्मिक श्रद्धा, विविध उपाय आणि आर्थिक लाभाचे आमिष दाखवत अनेक नागरिकांकडून मोठ्या रकमा उकळल्याचा आरोप आहे. या प्रकरणात लाखो रुपयांच्या व्यवहारांची चर्चा असून, काही व्यवहार थेट कुटुंबीयांच्या खात्यांमार्फत झाल्याची माहिती तपासातून समोर येत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


तपास यंत्रणांनी या प्रकरणाचा वेग वाढवला असून, संबंधितांचे बँक व्यवहार, कॉल रेकॉर्ड आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर कल्पना खरात यांचे नावही तपासात पुढे आल्याने त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.
२२ तारखेला काय होणार?
माननीय न्यायाधीश गुप्ता यांनी या अर्जावर सुनावणीसाठी २२ तारीख निश्चित केली असून, त्या दिवशी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून न्यायालय निर्णय देणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले असून, कल्पना खरात यांना दिलासा मिळतो की काय याकडे सर्वांचे लक्ष आहे.
दरम्यान, पोलिस तपास सुरूच असून, या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button