Letest News
राहात्यात गर्भलिंग रॅकेटचा महाभंडाफोड-पुण्यापर्यंत पोहोचले धागेदोरे- राहता तालुक्यातील “मोठे मासे” र... साईदरबारात पुन्हा दिसली प्रामाणिकतेची झलक-१५ हजारांची पर्स साईभक्ताला सुखरूप परत इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैनस्नॅचिंग-श्रीरामपूरची टोळी जेरबंद-LCB ची धडाकेबाज कारवाई पाथर्डीत समता पतसंस्थेचा गाशा गुंडाळला? ठेवीदारांचे लाखो अडकले? पाथर्डीत एकच खळबळ समता पतसंस्थेच्या घोटाळ्यात ED ची मोठी एन्ट्री-अशोक खरातच्या लॉकरमधून कोट्यवधींचं घबाड “साईप्रसाद की भ्रष्टाचार?” प्रसादालयातील खरेदीवर गंभीर प्रश्नचिन्ह शिर्डीत फसवणुकीचा नवा डाव! गजराच्या नावाखाली भाविकांची लूट लोणीत गर्भलिंग निदान रॅकेटचा मोठा पर्दाफाश- आणखी १ डॉक्टरसह २ एजंट जाळ्यात निमगाव को-हाळे बायपासवर भीषण अपघात — कातोरे वस्ती हादरली! काका कोयटे हजर हो! SID ची नोटीस-समता पतसंस्थेत १००+ बोगस खाती?
क्राईमशिर्डी

शिर्डीच्या डी मार्ट मॉल मधून महिलेच्या पर्सची चोरी! ———सावधान डी मार्ट मॉलमध्ये जाताना बेसावध राहिला तर भामटे पडतील भारी!

शिर्डी (प्रतिनिधी)

sai nirman
जाहिरात

शिर्डी येथे असणाऱ्या डी मार्ट या मॉल मधून पर्सची चोरी झाली आहे. यासंदर्भात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,सौं.मिसाळ ह्यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की,

DN SPORTS

kamlakar

आपण दि. 26/05/2025 रोजी दुपारी 04/00 वाजण्याचे सुमारास शिर्डी साकुरी शिव येथे डी मार्ट मध्ये खरेदी करण्यासाठी गेलो होतो. जातांना तेथे सोबत पर्स आत मध्ये घेवुन गेले होते. त्यामध्ये लाल रंगाचे छोटे पॉकेट होते .त्यात एक ग्रॅम सोन्याची नथ, सहा हजार रुपये रोख रक्कम त्यात, 500 रुपये दराच्या 10 नोटा, तसेच 100 रुपये दराच्या 10 नोटा असे एकुन 6000/-रुपये घेतले होते.

डी मार्ट मध्ये जावुन आम्ही आमची खरेदी करुन 26 मे 2019 रोजी 04/30 वाजण्याचे दरम्यान कांउटरवर बील पेड करुन बाहेर आले . बाहेर आल्यानंतर घेतलेला टॉप बघीतला .तो त्यांना पसंत पडला नाही म्हणुन तो रिटर्न करण्यासाठी कांऊरवर परत गेले. तेव्हा तेथे कांऊटवर ड्युटीस असलेले कर्मचारी यांनी सदर टॉपचे पैसे परत केले व त्यांनी त्यांच्याकडून सुट्टे दोन रुपये मागीतले.

सौं मिसाळ यांनी त्यांना सुट्टे पैसे देत असतांना त्यांच्या हातातील पॉकेट काऊंटवर ठेवले. त्यावेळी पैसे देवुन ते बाहेर आले. त्यानंतर ते राहाता येथे जितेंद्र दुकानात खरेदी करण्यासाठी गेले. तेथे त्यांनी काही कपडे खरेदी करुन तेथे कांऊटवर बील देण्यासाठी पर्स बघीतली असता त्यांच्या पर्स मधील लाल रंगाचे छोटे पॉकेट दिसले नाही.

त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की, माझ्या हातातील लाल रंगाचे पॉकीट डी मार्टच्या कांऊटरवर कोणीतरी चोरुन घेतले आहे. त्यामध्ये असणारे पाच हजार रुपयाची सोन्याची नथ, रोख रक्कम सहा हजार रुपये असे एकूण
11,000/-रुपयाची चोरी झाली असल्याची तक्रार सौं मिसाळ यांनी शिर्डी पोलीस स्टेशनला दिली आहे.

या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 584 /2025 प्रमाणे भारतीय न्याय संहिता 303 (2 )प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शिर्डी पोलीस करत आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button