Letest News
मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी!
अ.नगरक्राईम

शिर्डीचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांची धडक कारवाई – 454 किलो गांजा जप्त!

संगमनेर/शिर्डी –
संगमनेर शहरालगत सुकेवाडी येथे नार्कोटिक्स विभागाने केलेल्या धाडीत तब्बल 454 किलो सुका गांजा आणि एकूण ₹1 कोटी 14 लाख 50 हजारांचा मुद्देमाल हस्तगत झाला आहे. ही कारवाई आज रविवार, दि. 11 डिसेंबरच्या पहाटे करण्यात आली आहे.
या धडक मोहिमेचे नेतृत्व शिर्डीचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक व सध्या नार्कोटिक्स डिपार्टमेंटचे पोलीस उपअधीक्षक गुलाबराव पाटील यांनी केले.

sai nirman
जाहिरात

या प्रचंड प्रमाणात मिळालेल्या मालामुळे संपूर्ण संगमनेर परिसरातील ड्रग्स माफियांचे जाळे पूर्ण उघडे पडले आहे. मात्र याचबरोबर स्थानिक संगमनेर पोलीस किती जागरूक? किती सक्षम? — हा प्रश्नही जनतेसमोर मोठा बनून उभा आहे.


धडाकेबाज छापा: मध्यरात्रीपासून सुरू ऑपरेशन, पहाटे मोठा स्फोटक उलगडा

DN SPORTS

नाशिकहून आलेल्या नार्कोटिक्स पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीनुसार:

सुकेवाडी गावातील एक गुप्त ठिकाण टार्गेट

प्लास्टिक पिशव्यांमध्ये सीलबंद केलेला प्रचंड प्रमाणात गांजा

शेंडे, बीया, काड्या — सर्व व्यवस्थित पॅक

ठिकाणावरच पंचनामा, वजन काट्याद्वारे अचूक मोजणी

kamlakar

454 किलो गांजा हस्तगत

आरोपी तुषार उत्तम पडवळ (रा. सुकेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल, मात्र तो धाडीच्या वेळी पळून जाण्यात यशस्वी झाल्याने फरार.
त्याच्या संपूर्ण नेटवर्कची सखोल चौकशी सुरू आहे.


स्थानिक पोलिसांवर गंभीर सवाल : एवढा माल शहरात येतो कसा? जातो कुठे? माहिती नसणे शक्यच नाही!

ही कारवाई एवढ्या मोठ्या प्रमाणात झाली…
पण स्थानिक संगमनेर पोलिसांना काहीच माहिती नव्हती?

हे नक्की विश्वास ठेवावे इतकं सोपं आहे का?

जनतेत मोठा सवाल–

शहरात 1 कोटींचा गांजा फिरतो

त्याचे व्यवहार एका गावातच सुरू

मुख्य आरोपी शहरात मुक्तपणे वावरतो

काहीजणांच्या “हाताला मलिदा” लागल्याची चर्चा

डीबी स्थापन झाल्यानंतर काही अवैध धंद्यांना “अभय” मिळाल्याच्या कुजबुजा

फरार महिला आरोपी अद्याप शहरात अवैध व्यापार चालवत असल्याची माहिती

अनेक मोठ्या गुन्ह्यांची उकल वर्षानुवर्षे होत नाही

किरकोळ गुन्ह्यांवरच कारवाई, मोठ्या मास्यांना संरक्षण?

ही गंभीर स्थिती संगमनेर शहर पोलिसांची कार्यक्षमता आणि प्रामाणिकपणा दोन्हींवर प्रश्नचिन्ह उभे करते.


नार्कोटिक्स पथकाची दमदार टीम — अचूक माहिती, धाडसी छापा

या कारवाईत खालील अधिकाऱ्यांचा सहभाग अत्यंत कौतुकास्पद ठरला:

पोलीस उपअधीक्षक गुलाबराव पाटील

एपीआय भागवत व्यवहारे

एपीआय पंकज खरे

पो. ना. माळी

पो. हे.कॉ. विश्वास बेरड

पो. ह. डांबले

पो. कॉ. गणेश महाले

पो. कॉ. वैभव पांढरे

पो. कॉ. गणेश मिसाळ

पो. कॉ. चव्हाण

त्यांच्या तातडीच्या अॅक्शनने मोठी ड्रग्स तस्करी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली.


शिर्डीचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांची ओळख पुन्हा अधोरेखित

गुलाबराव पाटील यांनी आधी शिर्डीतही अनेक अवैध रॅकेट्स, मादक पदार्थ विक्रेत्यांवर, गुन्हेगारांवर धडक कारवाया केल्या आहेत.
त्यांची कार्यपद्धती:

गुप्त माहितीदार जाळे मजबूत

झडप घालण्याची वेगवान शैली

जिथे स्थानिक पोलिसांची पोहोच नाही, तिथे थेट धडक

मोठ्या रॅकेट्सना लक्ष्य

या कारवाईने हे पुन्हा एकदा सिद्ध झाले —
खरं पोलिसिंग म्हणजे गोड बोलणे नव्हे… तर गुन्हेगारीच्या मुळावर घाव घालणे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button