Letest News
नगर-मनमाड महामार्गाची साडेसाती संपणार कधी? सहा वर्षांत तीन कंत्राटदार बदलले तरी लोकप्रतिनिधींचे मौन ... तोतया पत्रकारांची धाड की खंडणीचा डाव? महिलेकडे मागितले तब्बल एक लाख! ग्रामपंचायत अधिकाऱ्याची १० हजारांची लाच मागणी ५ हजार घेताना ACBच्या जाळ्यात! साईबाबांच्या बदनामीकारक व्हिडीओंना चाप बसणार! दिल्ली उच्च न्यायालयाचे GAC ला दणका शिर्डीत १३ ते २१ ऑगस्टदरम्यान साईसच्चरित पारायण सोहळा! धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका...
क्राईमशिर्डी

साईबाबा रुग्णालयातील स्टाफ नर्स विरुद्ध ७.९० लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा

शिर्डी | प्रतिनिधी
शिर्डीतील श्री साईबाबा रुग्णालयातील एका स्टाफ नर्सविरुद्ध तब्बल ₹७ लाख ९० हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घर खरेदीसाठी तात्पुरत्या स्वरूपात पैसे घेऊन ते व्याजासह परत करण्याचे आश्वासन दिल्यानंतरही रक्कम परत न करता फिर्यादीची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शिर्डीतील करडोबा नगर येथील रहिवासी व श्री साईबाबा रुग्णालयात कॅथलॅब टेक्निशियन म्हणून कार्यरत असलेले शेषराव राधाकृष्ण कुलभैय्या (वय ५५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


फिर्यादीनुसार, रुग्णालयात स्टाफ नर्स म्हणून कार्यरत असलेल्या संगीता शशिकांत कुमावत (रा. श्रीरामपूर) यांनी सन २०२१ मध्ये श्रीरामपूर येथे नवीन घर खरेदी करताना पैशांची अडचण असल्याचे सांगून मदत मागितली. स्वतःकडे पैसे नसल्याचे फिर्यादीने सांगितल्यानंतरही त्यांनी वारंवार विनंती करत क्रेडिट सोसायटीतून कर्ज काढण्यास प्रवृत्त केले आणि नाशिकमधील घर विकल्यानंतर एक-दोन महिन्यांत संपूर्ण रक्कम व्याजासह परत करण्याचे आश्वासन दिले.
या विश्वासावर फिर्यादीने श्री साईबाबा संस्थान क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीतून कर्ज घेतले. त्यानंतर फोनपे, आरटीजीएस आणि बँक चेकद्वारे टप्प्याटप्प्याने एकूण ₹७ लाख ९० हजारांची रक्कम आरोपी महिलेच्या खात्यावर वर्ग केली. या पैशांतून तिने श्रीरामपूर येथे घर खरेदी केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.


यानंतर वारंवार पैशांची मागणी करूनही आरोपी महिलेने “नाशिकचे घर विकल्यानंतर पैसे देते” असे सांगत वेळकाढूपणा केला. फिर्यादी व त्यांची पत्नी अनेक वेळा तिच्या घरी जाऊनही रक्कम परत मिळाली नाही. दरम्यान, चौकशीअंती नाशिकचे घर वर्षभरापूर्वीच विकल्याचे फिर्यादीला समजले. याबाबत विचारणा केली असता आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली आणि आजतागायत रक्कम परत केली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 316(2) आणि 318(4) अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आर्थिक व्यवहाराची कागदपत्रे, बँक व्यवहार आणि डिजिटल पेमेंटची माहिती तपासात महत्त्वाची ठरणार आहे.

र आरोप समोर आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button