Letest News
मंगलमय वातावरणात श्रीसाईसच्चरित पारायण सोहळ्याचा शुभारंभ काळे रुमाल बांधलेल्या दोन चोरट्यांचा शिर्डीत धुमाकूळ लाखोच्या सोन्याची चैन हिसकावली गोरगरिबांच्या शिध्यावर डल्ला? राहात्यात ५.९० लाखांचा माल ताब्यात शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात पोलिसांची धडक मोहीम-भल्या पहाटे पोलिसांचा शहरभर धडाका नगर-मनमाड महामार्गाची साडेसाती संपणार कधी? सहा वर्षांत तीन कंत्राटदार बदलले तरी लोकप्रतिनिधींचे मौन ... तोतया पत्रकारांची धाड की खंडणीचा डाव? महिलेकडे मागितले तब्बल एक लाख! ग्रामपंचायत अधिकाऱ्याची १० हजारांची लाच मागणी ५ हजार घेताना ACBच्या जाळ्यात! साईबाबांच्या बदनामीकारक व्हिडीओंना चाप बसणार! दिल्ली उच्च न्यायालयाचे GAC ला दणका शिर्डीत १३ ते २१ ऑगस्टदरम्यान साईसच्चरित पारायण सोहळा! धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह...
क्राईमशिर्डी

शिर्डीच्या साई संस्थानमधील लाखो रुपयांच्या अपहाराच्या प्रकरणात याचिकाकर्त्या कुठलीही सक्तीची कारवाई करू नये- उच्च न्यायालय

शिर्डीच्या साई संस्थानमधील लाखो रुपयांच्या अपहाराच्या प्रकरणात याचिकाकर्त्या, संस्थेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध तत्कालीन तूर्तास कुठलीही सक्तीची कारवाई करू नये, असे अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गुरुवारी दिले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

याचिकाकर्त्यांचे म्हणणे न ऐकताच संस्थानने अपहाराच्या रकमेच्या वसुलीसाठी, बजावलेल्या नोटिसांच्या अनुषंगाने न्या. नितीन डब्ल्यू सांबरे आणि न्या. सचिन एस. देशमुख यांनी हे आदेश दिले. याचिकाकर्त्यांनी मागणी केलेली कागदपत्रे त्यांना उपलब्ध करून देता येतील काय, याचा विचार करण्याचे खंडपीठाने संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. १० जुलैला पुढील सुनावणी होईल.

निवृत्त कार्यकारी अभियंता रघुनाथ आहेर, रवी घुले आणि इतरांनी याचिकेत म्हटल्यानुसार काही दिवसांपूर्वी विद्युत विभागातील एक कर्मचारी संशयितरीत्या संस्थानची विद्युत उपकरणे बाहेर नेताना आढळला. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले.

प्रथम चौकशीमध्ये अपहाराची रक्कम ८३ लाखांच्या आसपास असल्याचे निदर्शनास आले. म्हणून, २०१७ ते २०२२ दरम्यानचे विद्युत विभागाच्या लेखा परीक्षणाचे आदेश त्यांनी दिले. त्यात एका कर्मचाऱ्याला दोषी ठरवून व त्याच्यावर ७७लाखांच्या अपहाराचा आरोप ठेवून, फौजदारी गुन्हा दाखल करून निलंबित केले.

त्यानंतर अपहाराच्या रकमेपैकी ५० टक्के रक्कम २०१७ ते २०२२ या कालावधीतील विद्युत विभागात सेवा बजावलेले कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता व इतर पदांवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून वसूल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले. कार्यरत आणि निवृत्त अधिकाऱ्यांनी ५० हजार ते साडेतीन लाख रुपये ३० दिवसांत जमा करावेत.

अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत नोटिसा बजावल्या. म्हणून त्यांनी अॅड. अविनाश खेडकर यांच्यामार्फत याचिका दाखल केल्या. याचिकाकर्त्यांना बाजू मांडण्याची संधी व कागदपत्रे न देता थेट वसुलीची रक्कम निश्चित करून पैसे जमा करण्याचे दिलेले आदेश बेकायदेशीर आणि नैसर्गिक न्याय तत्त्वाच्या विरुद्ध असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button