Letest News
राहत्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट ! पीआय सरोदे यांच्यासमोर गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान लक्ष्मी नगरच्या विकासकामांना गती- ड्रेनेज समस्येवर अखेर कायमस्वरूपी उपाययोजनेचा शुभारंभ “इतना सन्नाटा क्यूँ छाया है…?” खरात प्रकरणात नेमकं कोणाला वाचवलं जातंय? समता पतसंस्थेतील व्यवहारांवर... राहता पोलीस ठाण्यात कायदा झोपला होता का?” — निष्क्रिय पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या कारभारावर ... ऑनलाईन औषध विक्रीविरोधात २० मे रोजी देशव्यापी बंद- जिल्ह्यातील सर्व केमिस्टनी बंदमध्ये सहभागी व्हावे... भोंदू अशोक खरात प्रकरण भोवले; दत्ता कराळे यांची बदली-खरातसोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर पोलीस वर्तुळ... “ओडीसाच्या साईभक्तेकडून साईचरणी सुवर्ण अर्पण ७.५६ लाखांचे आकर्षक सोन्याचे ब्रोच भेट” गर्भलिंग चाचणी रॅकेटमध्ये पुण्यातील तीन जण अटकेत -बेकायदेशीर सोनोग्राफी मशीन पुरवठा प्रकरणात कारवाई निष्क्रिय अधिकारी नितीन चव्हाण यांच्या कार्यकाळात गुन्हेगारीने गाठला उच्चांक-राहता शहराची बिघडलेली प... “द्वारकामाईत भक्तांना दिलासा-राजेंद्र कोते पाटील यांच्या मागणीला प्रशासनाचा तात्काळ प्रतिसाद”
क्राईमशिर्डी

शिर्डीत मानपानाच्या नावाखाली नवविवाहितेचा छळ- पतीसह सहा जणांवर गुन्हा!

शिर्डी : लग्नातील मानपानाच्या नावाखाली एका नवविवाहितेवर अमानुष अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. हुंडा व पैशांच्या हव्यासापोटी पतीसह सासरच्या मंडळींनी केलेल्या छळामुळे अखेर पीडितेला घराबाहेर काढण्यात आले असून, या प्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडितेच्या तक्रारीनुसार, १६ मे २०२५ रोजी शिर्डीत थाटामाटात विवाह पार पडला. मात्र लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच खरी परिस्थिती समोर आली. “मानपान मिळाला नाही, दोन तोळे सोने नाही, तुझे वडील निकम्मे आहेत” अशा अपमानास्पद शब्दांत सतत मानसिक छळ सुरू झाला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


याचबरोबर व्यवसायासाठी ५ लाख रुपये आणण्याचा दबाव टाकत विवाहितेला वारंवार त्रास देण्यात आला. पैसे न आणल्यास मारहाण, अपमान आणि उपेक्षा अशी वागणूक देण्यात येत होती. इतकेच नव्हे, तर चारित्र्यावर संशय घेऊन “हे लग्न जबरदस्तीने झाले” असे म्हणत तिच्या सन्मानालाच तडा देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
सततचा छळ असह्य झाल्यानंतरही संसार टिकवण्याच्या आशेने पीडिता सहन करत राहिली. मात्र दि. २६ सप्टेंबर २०२५ रोजी तिला निर्दयीपणे घरातून बाहेर हाकलण्यात आले, आणि तिच्या आयुष्याला मोठा धक्का बसला.
या घटनेनंतर पीडितेने धाडस दाखवत संभाजीनगर कौटुंबिक न्यायालयात घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत तक्रार दाखल केली. तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम १४४(१) अन्वये पती अक्षय निर्मळ, सासू-सासरे, नणंद व इतर नातेवाईक अशा सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


📢 संतप्त प्रतिक्रिया:
👉 “मानपानाच्या नावाखाली छळ कधी थांबणार?”
👉 “हुंड्याच्या लालसेने किती आयुष्ये उद्ध्वस्त करणार?”
👉 “अशा आरोपींवर कठोर शिक्षा व्हायलाच हवी!”
⚠️ इशारा:
लग्नातील मानपान, हुंडा किंवा पैशांसाठी होणारा छळ हा केवळ सामाजिक कलंक नाही, तर गंभीर गुन्हा आहे. अशा प्रकरणांमध्ये कठोर कारवाई होणे गरजेचे आहे, अन्यथा अशा विकृत प्रथा समाजात वाढतच राहतील.
👉 एकच संदेश – “छळ सहन करू नका, आवाज उठवा!”

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button