Letest News
भाविक सेवेत SBIची ‘साईसेवा’ ६९ लाखांचे अत्याधुनिक डिश वॉशिंग मशीन देत जपली सामाजिक बांधिलकी! समकालीन साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे वाड्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतले दर्शन साईसच्चरिताचा जयघोष सवाद्य मिरवणुकीने पारायण सोहळ्याला दिमाखात सुरुवात! मंगलमय वातावरणात श्रीसाईसच्चरित पारायण सोहळ्याचा शुभारंभ काळे रुमाल बांधलेल्या दोन चोरट्यांचा शिर्डीत धुमाकूळ लाखोच्या सोन्याची चैन हिसकावली गोरगरिबांच्या शिध्यावर डल्ला? राहात्यात ५.९० लाखांचा माल ताब्यात शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात पोलिसांची धडक मोहीम-भल्या पहाटे पोलिसांचा शहरभर धडाका नगर-मनमाड महामार्गाची साडेसाती संपणार कधी? सहा वर्षांत तीन कंत्राटदार बदलले तरी लोकप्रतिनिधींचे मौन ... तोतया पत्रकारांची धाड की खंडणीचा डाव? महिलेकडे मागितले तब्बल एक लाख! ग्रामपंचायत अधिकाऱ्याची १० हजारांची लाच मागणी ५ हजार घेताना ACBच्या जाळ्यात!
अ.नगरखेळ

नियम धाब्यावर बसवून केले अतिक्रमण! तक्रार करून व अतिक्रमण असल्याचे सिद्ध होऊनही ते काढणार कधी?

शिर्डी (प्रतिनिधी)
ग्रामपंचायत चिचोंडी पाटिलचे सरपंच शरद खंडु पवार यांच्या अतिक्रमणाबाबतचा अहवाल पंधरा दिवसांपूर्वीच तयार झाला असला तरी अदयाप काहीच कारवाई झाली नसल्याने सामाजिक कार्यकर्ते दिलीप रामभाऊ कोकाटे यांनी सखेद आश्चर्य व्यक्त करून कारवाई कधी होणार ?असा सवाल आता केला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


चिचोंडी पाटीलचे सरपंच श्री. शरद खंडू पवार यांनी
त्यांच्या राहत्या बंगल्याच्या मागे ग्रामपंचायतने शासकिय निधीतुन तयार केलेल्या सार्वजनिक रस्त्यावर ताबामारी करून जनावरे बांधण्यासाठी दावण तयार केली तसेच सार्वजनिक रस्त्यावर जनावरे बांधून ग्रामस्थांना अडथळा निर्माण केला. राहत्या बंगल्याच्या पुढील बाजूस सार्वजनिक रस्त्यावर बंगल्यात गाडया नेण्यासाठी सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार केला.

चिचोंडी पाटील एसटी स्टैंड येथे शेकडो वर्षांपूर्वीच्या सार्वजनिक रस्त्यावर ताबामारी करून दोन गाळ्यांचे शेड उभे करून सार्वजनिक रस्ता बंद केला.चिचोंडी पाटील येथील स्मशानभूमीत स्वतःच्या पूर्वजांच्या नावाचे फ्लेक्स बोर्ड लावले.सरपंच असूनही सार्वजनिक रस्त्यावर ताबामारी करून दावण बांधण्याचा दरिद्रीपणा केल्याबद्दल तसेच फ्लेक्स बोर्ड लावू नये. असे शासनाचे नियम असतानाही स्मशानभूमीत म्हणजेच शासकीय जागेत स्वतःच्या पूर्वजांचे फ्लेक्स बोर्ड लावून उदात्तीकरण केल्याबद्दल व सार्वजानिक

आणि शासकिय जागेचे विद्रुपीकरण केल्या बद्दल व इतर अतिकमणांबद्दल दबक्या आवाजात ग्रामस्थ कुजबुजायचे मात्र सरपंच हे खूप नंगट प्रवृत्तीचे असल्याने तसेच सरपंचांवर पूर्वी अनेक गुन्हे दाखल असल्यामुळे तसेच त्यांनी बाहेरगावचे लोक गावात आणुन दादागिरी केल्यामुळे लोक सरपंचाला घाबरून आहेत.


पण प्राण गेला तरी बेहतर परंतु अन्यायाच्या विरोधात लढायचे असा चंग बांधुन ही सर्व अतिक्रमणे काढण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते दिलीप कोकाटे यांनी जिल्हा परिषद, अहिल्यानगर समोर दि.24.01.2025 ते दि.27.01.2025 पर्यंत लक्षवेध आंदोलन केले, जिल्हा प्रशासनाने आंदोलनाची तातडीने दखल घेत गटविकास अधिकारी, पंचायत समिती, अहिल्यानगर यांनी सहाय्यक गटविकास अधिकारी, पंचायत समिती,

अहिल्यानगर यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणुक केली चौकशी अधिकारी यांनी दिनांक 05.02.2025 रोजी अहवाल सादर केला आहे. या अहवालामध्ये सकृतदर्शनी सदरची अतिक्रमणे दिसून येत असल्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे.चौकशी अधिकारी चौकशीसाठी आल्यानंतर सरपंच शरद खंडू पवार यांनी इज्जत तसेच पद जाण्याच्या भीतीने रात्रीतून जनावरांची दावण काढून रस्ता रिकामा केला.

सरपंच असल्याने ग्रामपंचायतमध्ये कागदपत्र प्लांट करून दावण नव्हती असा कांगावा केला मात्र ही कागदपत्रे तक्रारदार असणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते दिलीप कोकाटे यांना कधीच दिली नव्हती. अर्थात चौकशी अधिकारी यांनी चौकशीला आल्यानंतर दावणीचे स्वतः उभे राहुन फोटो काढलेले आहेत त्यामुळे सरपंच शरद पवार यांनी ग्रामपंचायामध्ये खोटी कागदपत्र तयार करून केलेला गोलमाल त्यांच्याच अंगलट आला आहे.
मात्र अद्याप स्मशान भूमीतील शेड वरील नावे, एसटी स्टँडवरील सार्वजनिक रस्त्यावर ताबेमारी करून बांधलेले गाळे व बंगल्या पुढील सिमेंट काँक्रीट चे अतिकमण निघालेले नाही .हे अतिक्रमण कधी निघणार? असा सवाल करून तातडीने अतिक्रमणे निघाली नाही तर केव्हाही, कोठेही व कोणत्याही स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते दिलीप कोकाटे यांनी दिला आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button