Letest News
मंगलमय वातावरणात श्रीसाईसच्चरित पारायण सोहळ्याचा शुभारंभ काळे रुमाल बांधलेल्या दोन चोरट्यांचा शिर्डीत धुमाकूळ लाखोच्या सोन्याची चैन हिसकावली गोरगरिबांच्या शिध्यावर डल्ला? राहात्यात ५.९० लाखांचा माल ताब्यात शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात पोलिसांची धडक मोहीम-भल्या पहाटे पोलिसांचा शहरभर धडाका नगर-मनमाड महामार्गाची साडेसाती संपणार कधी? सहा वर्षांत तीन कंत्राटदार बदलले तरी लोकप्रतिनिधींचे मौन ... तोतया पत्रकारांची धाड की खंडणीचा डाव? महिलेकडे मागितले तब्बल एक लाख! ग्रामपंचायत अधिकाऱ्याची १० हजारांची लाच मागणी ५ हजार घेताना ACBच्या जाळ्यात! साईबाबांच्या बदनामीकारक व्हिडीओंना चाप बसणार! दिल्ली उच्च न्यायालयाचे GAC ला दणका शिर्डीत १३ ते २१ ऑगस्टदरम्यान साईसच्चरित पारायण सोहळा! धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह...
अ.नगरराजकीय

ईद-ए-मिलादची शुक्रवारची सार्वजनिक सुट्टी रद्द सामान्य प्रशासन विभागाने हा निर्णय जाहीर केला

ईद-ए-मिलाद या इस्लाम धर्मीयांच्या महत्त्वाच्या सणानिमित्त मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यातील सार्वजनिक सुट्टीच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. याआधी शुक्रवार, दि. 5 सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र आता ही सुट्टी सोमवार, दि. 8 सप्टेंबर 2025 रोजी असणार असल्याची घोषणा सामान्य प्रशासन विभागाने केली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

शनिवार, दि. 6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी हा हिंदू धर्मीयांचा महत्त्वाचा सण आहे. या दिवशी मुंबईसह राज्यभरात मोठ्या प्रमाणावर गणेश विसर्जनाची मिरवणूक काढली जाते. त्यामुळे राज्यात ऐक्य व सलोखा टिकवण्यासाठी मुस्लीम समाजातील प्रमुखांनी हिंदू – मुस्लिम ऐक्य राखण्यासाठी मुस्लीम समुदायाने जुलूसचा कार्यक्रम 8 सप्टेंबर रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

यामुळेच सरकारने 5 सप्टेंबरला जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी रद्द करून 8 सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर केली आहे. मुंबई शहर व उपनगरातील शासकीय कार्यालये 5 सप्टेंबर रोजी नियमित सुरु राहतील, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रकाद्वारे दिली आहे.इतर जिल्ह्यांमध्ये 5 सप्टेंबरलाच सुट्टी राहणार असल्याने मुंबईकरांनी सुट्टीच्या तारखेत झालेल्या या बदलाची विशेष नोंद घ्यावी

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button