Letest News
श्रीरामपूरात खळबळ! अल्पवयीन मुलीचे अपहरण-अत्याचार आरोपी सोनू बेगच्या अडचणीत मोठी भर २० हजारांचा सौदा'! संगमनेरच्या तांबे हॉस्पिटलवर ACB चा गुन्हा मॅनेजरसह दोघे जाळ्यात ऊर्जा बचतीचा संदेश देत श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी अल्पवयीनेचे अपहरण करून बलात्कार आरोपीला नैसर्गिक मृत्यूपर्यंत सश्रम कारावास! शिर्डी दर्शनावरून परतणाऱ्यांवर थरारक दरोडा अपहरण करणाऱ्या टोळीतील ५ जण स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्य... शिर्डी हादरवणाऱ्या हत्येतील आरोपी महिलांना कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी साईनगरीत रक्तरंजित थरार! मंदिराच्या गेट क्रमांक ४ समोर महिलेचा निर्घृण खून- जागेच्या वादातून दोन तरु... बँकेच्या 2.11 कोटींच्या थकबाकीवरून शिर्डीत हॉटेलवर कारवाई-ताबा घेण्यास विरोध-चार महिलांविरुद्ध शिर्ड... साईबाबांच्या चरणी विधानपरिषद अध्यक्ष राम शिंदे समाधी दर्शनानंतर संस्थानकडून सत्कार "निष्ठावान कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये-भाजप सदैव त्यांच्या पाठीशी उभा आहे" – विधानपरिषदेचे सभापती प...
अ.नगरक्राईम

कोपरगावच्या दुय्यम कारागृहाला अखेर टाळे-२० कैद्यांची कडेकोट बंदोबस्तात नाशिकला रवानगी

कोपरगाव | प्रतिनिधी
राज्य शासनाने राज्यातील वापरात नसलेली व अत्यल्प क्षमतेने चालणारी ८० दुय्यम कारागृहे कायमस्वरूपी बंद करण्याचा घेतलेला निर्णय आता प्रत्यक्षात उतरू लागला आहे. त्याच अनुषंगाने गुरुवार (२ जुलै) रोजी कोपरगाव येथील दुय्यम कारागृहातील २० कैद्यांना कडेकोट पोलीस बंदोबस्तात नाशिक मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले. या प्रक्रियेनंतर अनेक वर्षांचा इतिहास असलेल्या कोपरगावच्या दुय्यम कारागृहाला प्रत्यक्षात टाळे लागले.
सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास पोलीस वाहनांच्या ताफ्यातून कैद्यांची रवानगी करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संपूर्ण स्थलांतर प्रक्रिया शांततेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात आली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


राज्य शासनाने १२ जून २०२६ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील महसूल विभागाकडील ११६ दुय्यम कारागृहांपैकी ८० कारागृहे कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक कारागृहांचा वापर अत्यल्प असल्याने, काही इमारती जीर्ण व मोडकळीस आल्याने तसेच त्यांच्या देखभाल, दुरुस्ती व सुरक्षेवर होणारा वाढता खर्च लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
या धोरणानुसार संबंधित भागातील कैद्यांची व्यवस्था जवळच्या जिल्हा अथवा मध्यवर्ती कारागृहात करण्यात येणार आहे. त्याचाच भाग म्हणून कोपरगाव येथील सर्व २० कैद्यांना नाशिक मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले.


कारागृह विभागाच्या मते, या निर्णयामुळे उपलब्ध मनुष्यबळ, सुरक्षा यंत्रणा आणि इतर संसाधनांचा अधिक परिणामकारक वापर होणार असून प्रशासनाच्या कामकाजात अधिक सुसूत्रता येईल. तसेच कारागृह विभागावरील आर्थिक भारही मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, कोपरगावच्या दुय्यम कारागृहाला टाळे लागल्यानंतर या शासकीय जागेचा भविष्यात कोणत्या कामासाठी वापर केला जाणार, याकडे नागरिकांसह स्थानिक प्रशासनाचे लक्ष लागले आहे. शासन या जागेचा सार्वजनिक हितासाठी पुनर्वापर करणार की अन्य शासकीय कार्यालयासाठी उपलब्ध करून देणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button