Letest News
समता पतसंस्थेच्या कथित बनावट खातेप्रकरणी एसआयटीचा तपास वेगात? अशोक खरातच्या ताब्याची चर्चा-अनेकांमध्... श्रीरामपूरच्या गुन्हेगारी विश्वाला मोठा हादरा! १६ गंभीर गुन्ह्यांतील 'सोन्या बेग' अखेर जेरबंद प्रेमाच्या जाळ्यात पाच वर्षे अडकवून लाखोंची फसवणूक? लग्नाचे आमिष-शारीरिक संबंध आणि 13 लाखांसह 3 तोळे... कोपरगावच्या दुय्यम कारागृहाला अखेर टाळे-२० कैद्यांची कडेकोट बंदोबस्तात नाशिकला रवानगी शिक्षणातील आर्थिक साक्षरता' : योग्य माहिती असेल तर पैशांची अडचण ठरत नाहीशिक्षण महाग नाही… योग्य नियो... दीड लाखांचे दागिने आणि व्हिसा असलेली पर्स साईभक्ताला सुखरूप परत । सोन्याचे दागिने-व्हिसा अन् प्रामाण... कट्टर शिवसैनिक नानक सावंत्र यांची जिल्हा मुष्टीयुद्ध संघटनेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती-शिर्डीत अभिनंद... २२ महिने उलटले… तरीही ५९८ कामगारांना सेवा लाभ नाहीत मुख्यमंत्री फडणवीसांकडे डॉ. राजेंद्र पिपाडांची न... घरकुलाच्या अनुदानासाठी २० हजारांची लाच-ग्रामविकास अधिकारीसह तिघांवर एसीबीचा सापळा प्रेम-पैसे आणि 'खंडणी'चा गुंता-आता सत्य बाहेर काढणार तपास! शिर्डीत योगेश तिया प्रकरणाची जोरदार चर्चा
क्राईमशिर्डी

प्रेमाच्या जाळ्यात पाच वर्षे अडकवून लाखोंची फसवणूक? लग्नाचे आमिष-शारीरिक संबंध आणि 13 लाखांसह 3 तोळे सोनं घेतल्याचा आरोप

शिर्डी | प्रतिनिधी

sai nirman
जाहिरात

शिर्डीत प्रेमसंबंधाच्या आडून एका तरुणीची तब्बल पाच वर्षे मानसिक, आर्थिक आणि शारीरिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नाचे गोड आश्वासन देत विश्वास संपादन केला, वारंवार शारीरिक संबंध ठेवले, त्यानंतर लाखो रुपयांची रक्कम आणि सोनं घेत अखेर लग्नालाच नकार दिल्याचा गंभीर आरोप एका 29 वर्षीय तरुणावर करण्यात आला आहे. या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 मधील गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

DN SPORTS

kamlakar

पोलीसांकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार, जून 2021 ते जून 2026 या कालावधीत आरोपीने पीडित तरुणीला लग्नाचे आश्वासन देत शिर्डीतील छत्रपती नगरजोशीहॉस्पिटल शेजारी असलेल्या.एस. पॅलेस हॉटेल येथे वेळोवेळी बोलावून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, लग्न निश्चित होणार असल्याचा विश्वास निर्माण करून आरोपीने पीडितेकडून वेळोवेळी सुमारे 13 लाख रुपये रोख रक्कम तसेच 3 तोळे सोनं घेतले.

मात्र, अनेक वर्षे आश्वासने देऊनही आरोपीने लग्न करण्यास नकार दिला. एवढेच नव्हे तर घेतलेली रक्कम आणि सोनं परत देण्यासही टाळाटाळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर पीडित तरुणीने अखेर शिर्डी पोलीस ठाण्यात धाव घेत न्यायाची मागणी केली.

या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक 589/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलम 316(2) आणि 69 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून संबंधित आरोपीचा शोध आणि पुरावे संकलित करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

या घटनेमुळे प्रेमसंबंधांच्या नावाखाली आर्थिक व्यवहार करताना आणि लग्नाच्या आश्वासनांवर आंधळा विश्वास ठेवताना किती मोठे परिणाम भोगावे लागू शकतात, याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

ना फिर्यादी शिर्डीची… ना आरोपी शिर्डीचा; मग बदनामी मात्र साईनगरीचीच!

या प्रकरणातील फिर्यादी शिर्डीची नाही, आरोपीही शिर्डीचा रहिवासी नाही. मात्र, फिर्यादीतील आरोपांनुसार अनेक वर्षे शिर्डीतील एसएस हॉटेलचा वापर झाल्याचा उल्लेख असल्याने पुन्हा एकदा साईनगरीचे नाव चर्चेत आले आहे.
देश-विदेशातील लाखो साईभक्तांसाठी श्रद्धेचे केंद्र असलेल्या शिर्डीचे नाव अशा प्रकरणांमुळे वारंवार चर्चेत येणे ही चिंतेची बाब मानली जात आहे. गुन्हा करणारे बाहेरचे, पीडित बाहेरची; पण बदनामी मात्र शिर्डीची—अशी भावना अनेक नागरिक व्यक्त करत आहेत.
अशा घटनांना आळा घालण्यासाठी हॉटेलमधील गिर्‍हाईक ची नोंदीं चाकाटेकोर पडताळणी, संशयास्पद हालचालींवर त्वरित लक्ष आणि नियमांचे कठोर पालन होणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

फिर्यादीचे पती दिवंगत; आरोपीशी सोशल मीडियावर संपर्क? तपासातून होणार स्पष्ट

प्रेमसंबंधांची सोशल मीडियावर चर्चा; फिर्यादीचे पती दिवंगत
या प्रकरणातील फिर्यादी महिलेचे पती दिवंगत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आरोपी आणि फिर्यादी यांच्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमसंबंध असल्याच्या चर्चा सुरू होत्या. या बाबींची अधिकृत पुष्टी न्यायालयीन नोंदी किंवा तपास यंत्रणांनी केलेली नसून, या सर्व बाबींची सत्यता पोलीस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे कोणताही अंतिम निष्कर्ष काढणे उचित ठरणार नाही.

पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांचा इशारा : “आरोपी फरार असून, लवकरात लवकर ताब्यात घेतले जाईल”
या प्रकरणातील आरोपी सध्या फरार असल्याची माहिती संबंधित पोलीस निरीक्षकांनी दिली आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध पथके कार्यरत असून, त्याला लवकरात लवकर ताब्यात घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पुढील तपास पोलीस करत असून, आरोपीला अटक झाल्यानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button