Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
राजकीयशिर्डी

फायरब्रँड मीराताईंचा दमदार आगाज! प्रभाग 5(ब) मधून लोक क्रांती सेनेची अधिकृत उमेदवारी दाखल

राहाता शहरातील प्रभाग 5(ब) मध्ये राजकीय तापमान चांगलंच वाढलं आहे. जेष्ठ नेते बापूजी पुरोहित व युवक नेते वीराट पुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली लोक क्रांती सेना मंडळाच्या अधिकृत उमेदवार म्हणून फायरब्रँड सौं. मीराताई कृष्णा साना यांनी आज भव्य जल्लोषात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

sai nirman
जाहिरात

उमेदवारी अर्ज दाखल होताच प्रभागात मोठीच खळबळ माजली आहे. मीराताईंची निवड निश्चित झाल्यापासून अनेकांच्या भुवया उंचावल्या असून प्रभागातील चर्चांना अक्षरशः उधाण आलं आहे. कारण—मीराताई या नेहमीच पदापेक्षा कामाला प्राधान्य देणाऱ्या, कोणत्याही पदावर नसताना सातत्याने सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात.

मीराताई म्हणाल्या,
“आजपर्यंत कोणतेही पद नसतानाही मी फक्त लोकांसाठी काम केले. माझ्या प्रभागातील जनतेने मला उभे राहण्याची विनंती केली, म्हणून मी आज उमेदवारी भरली आहे. लोकांचा विश्वास, बापूजी पुरोहित व वीराट पुरोहित यांचे मार्गदर्शन… ह्या शक्तीवर माझा विजय निश्चित आहे.”

DN SPORTS

निवडणूक विभागात अर्ज दाखल करताना कार्यकर्त्यांची भव्य उपस्थिती, महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि तरुणांचा जोश—यामुळे संपूर्ण वातावरण घोषणांनी दुमदुमून गेले. प्रभाग 5(ब) मध्ये मीराताईंचा प्रवेश हा “फायरब्रँड शैलीतला धडाकेबाज राजकीय आगाज” मानला जात आहे.

प्रभागातील पाणी, रस्ते, साफसफाई, प्रकाशयोजना, महिलांची सुरक्षा, आणि ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी—हे सर्व प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. ह्या प्रश्नांवर काम करण्याची संधी मला द्या, असे आवाहनही मीराताईंनी यावेळी मतदारांना केले.

आगामी आठवड्यांत मीराताईंची प्रचारयात्रा जोरात सुरू होणार आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग 5(ब) मधील लढत अधिकच रंगतदार होणार यात शंका नाही.

फायरब्रँड मीराताईंचा दम—
प्रभाग 5(ब) मध्ये ‘लोक क्रांती सेना’ चा झेंडा नक्की फडकणार!

kamlakar

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button