शिर्डी मध्ये दिवाळीनिमित्त साई भक्तांनी व ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात व हजारो दिवे लावून दीपोत्सव साजरा केला.
दिवाळीनिमित्त शिर्डीत साई मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे परिसरात साई संस्थानच्या वतीने ठीक ठिकाणी फुलांच्या व रंगीबेरंगी रंगोळींनी आकर्षक चित्रे रेखाटण्यात आली आहे. दीपावलीनिमित्त साईबाबांनी श्री द्वारकामाई मंदिरात पाण्याचे दिवे लावून दिवाळी साजरी केली होती. त्यामुळे शिर्डीत साईभक्त व ग्रामस्थ दिवाळीला मोठ्या प्रमाणात दिवे लावून दीपोत्सव साजरा करत असतात.
यंदाही लेंडी बागेतील दीपमाळे वर व दीपमाळे समोर हजारो दिवे लावण्यात आली होती. त्याचप्रमाणे श्री द्वारकामाई मंदिरा समोरही सचिन तांबे व ग्रामस्थांच्या साई भक्तांच्या वतीने सुमारे अकरा हजार दिवे लावून आकाश कंदील लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. शिर्डी मध्ये साई मंदिर व परिसर आकर्षक फुलांनी व आकर्षक विद्युत रोषणाईने सजला आहे शिर्डीतील सर्व इमारतींवर आकर्षक विद्युत रोषणाई मुळे रात्रीचा लखलखाट दिसून येत आहे. सणानिमित्त फटाक्यांची मोठी आतिशबाजी होत आहे. दीपावलीनिमित्त मार्केटमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून येत आहे.

हार फुलांना मोठी मागणी वाढली आहे. मिठाईलाही मागणी वाढली आहे. विविध ठिकाणी ना नफा ना तोटा या धर्तीवर दिवाळीनिमित्त मिठाई विक्रीचे स्टॉल मानण्यात आले आहेत. दिवाळी निमित्त घरोघरी रात्री लक्ष्मीपूजन करून फटाक्यांच्या आतषबाजी करण्यात आली. आज बलिप्रतिपदा असून ईडा पिडा जाऊ दे! बळीचे राज्य येऊ दे अशी प्रार्थना केली जात आहे. व पाडवा आणि भाऊबीज साठीही आता घरोघरी उत्साहात तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे.