Letest News
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष...
Blog

शिर्डी जवळील निमगाव निघोज येथील मंगल कार्यालयात जेवणातून झालेल्या विषबाधेतील रुग्णांची सुधारत आहे तब्येत!

शिर्डी( प्रतिनिधी) शिर्डी जवळील निमगाव निघोज येथील साई पालखी लगत असणाऱ्या मंगल कार्यालयात शिर्डी येथील संजय वामन त्रिभुवन यांच्या मुलीच्या लग्नामध्ये वऱ्हाडी मंडळींना जेवणातून विषबाधा झाल्यानंतर त्यांना शिर्डीच्या श्री साईबाबा सुपर हॉस्पिटल व श्री साईनाथ हॉस्पिटलला रात्री उपचारार्थ दाखल करण्यात आले. सुमारे दीडशे च्या वर रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे यावेळी डॉक्टर प्रीतम वडगाव यांनी सांगितले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


दरम्यान या प्रकारामुळे शिर्डी परिसरात मोठी खळखळ उडाली असून हा प्रकार कसा घडला? कशामुळे घडला? याची चर्चा सध्या होत आहे. लग्नामध्ये सर्व नातेवाईक, जवळचे मित्रमंडळी, वऱ्हाडी मंडळी, व कुटुंबातील सदस्यही सर्व उपस्थित होते. वधू पित्यालाही जुलाब उलट्यांचा त्रास झाल्याचे समजते. जेवणातून विषबाधा झाल्याचे व या रुग्णांना शिर्डीतील दवाखान्यात उपचारार्थ दाखल करण्याचे वृत्त समजताच सर्व रुग्णांचे नातेवाईक, परिवार घाबरून गेले होते. त्यांनी शिर्डीला हॉस्पिटल कडे धाव घेतली. जो तो आपल्या परिवारातील सदस्य रुग्णांची विचारपूस करत होता दवाखान्यात गर्दी वाढली होती.

kamlakar

मात्र साई संस्थांनच्या दोन्ही रुग्णालयातील डॉक्टरांनी, आरोग्य कर्मचाऱ्यांनी, तातडीने उपचार सुरू केल्याने रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर आहे. विशेष म्हणजे शिर्डीतील संजय वामन त्रिभुवन( शिर्डीकर) यांच्या मुलीच्या लग्नात जे केटरर्स देण्यात आले होते. ते त्यांचे सख्खे बंधू रमेश त्रिभुवन यांचे होते. साई प्रयागा असे त्या केटरर्स नाव आहे. त्यामुळे जेवणातून विषबाधा होण्याचा प्रकार कसा घडला? हा त्रिभुवन कुटुंबालाही मोठा अचंबित करणारा प्रश्न आहे.शिर्डीत त्रिभुवन परिवार हे प्रतिष्ठित व्यापारी व राजकीय परिवार असल्याने समाजात त्यांचे नाव खूप मोठे आहे.


आणि घरातील एक सदस्य हे नगरसेवक असल्याने जितके लोकं त्यांना मानणारे आहेत् तितकेच विरोधी ही आहेत्.
म्हणुन हया विषबाधा झालेल्या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. कारण की हे शडयंत्र सुद्धा होऊ शकते. म्हणुन याची चौकशी होणे गरजेचे आहे. असेही बोलले जात आहे. मात्र सध्या रुग्ण लवकर बरे व्हावेत यासाठी सर्व जण प्रयत्न करत आहेत. शिर्डीतील दोन्ही रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची नावे पुढीलप्रमाणे आहेत–संगीता त्रिभुवन,लक्ष्मी बाई शिंदे,सुशीला शिंदे,सोनाली त्रिभुवन,पर्वताबाई त्रिभुवन,बत्तिशे सुनीता,बत्तीशे राधिका,आरणे कैलास,गायकवाड विकास, त्रिभुवन, आकाश ,त्रिभुवन प्रतिभा ,त्रिभुवन सरिता,बत्तीशे किरण,सरोदे वंदना ,सोळशे कार्तिक,आरणे निखिल,आराणे वंदना,काकडे नूतन,गायकवाड वैशाली,शिंदे रुपलाल राशिनाकर, रवींद्र मोरे,शुभम त्रिभुवन ,लता सरोदे ,कुणाल गोरख सरोदे ,वायदंडे अशोक ,त्रिभुवन रंजना ,पगारे शिवाजी ,निता पगारे ,सरोदे मच्छिंद्र ,सरोदे रंजना यांसह अनेक रुग्ण साईनाथ रुग्णालयात सुद्धा भरती झाले होते असे जवळपास 150 रुग्ण,आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button