Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
Blog

गाडी खाली चिरडून हत्या करणारा आरोपीस अद्याप अटक नाही  पोलिसांचा तपास जारी

कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथील शेतकऱ्यास शिविगाळ केल्या प्रकरणी पोलिसांत तक्रार देण्यासाठी मुलासह निघालेल्या शेतकऱ्याला कारखाली रावसाहेब पुंजाबा गागरे (वय-५५) यांना चिरडून खून केल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर या घटनेतील आरोपी अमोल शिंदे हा उपचाराच्या निमित्ताने रात्री फरार झाला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”गुरूवार दि .17 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारातून शेतीचे कामे आटोपून रावसाहेब गागरे,त्यांचा मुलगा प्रवीण व प्रशांत गागरे हे ट्रॅक्टरमधून घरी जात होते.त्यावेळी रस्त्यात आरोपी अमोल बळीराम शिंदे (रा.धोत्रे,तालुका कोपरगाव) हा त्याच्या मित्रांसोबत रस्त्यावर दारू पीत बसला होता.

त्यावेळी त्यांना प्रवीण गागरे म्हणाला की,”आमचा ट्रॅक्टर जाऊ द्या” त्याचा राग अमोल शिंदे याला आला होता.दरम्यान गागरे पिता-पूत्र तेथून निघून घरी गेले होते.त्यानंतर अमोल शिंदे याने रावसाहेब गागरे यांना फोन करून शिवीगाळ केली होती.

दरम्यान शिवीगाळ केल्यानंतर अमोल शिंदे विरूद्ध पोलिसांत तक्रार करण्यासाठी रावसाहेब गागरे व प्रवीण आणि त्याचा भाऊ प्रशांत गाग्रे हे रात्री आठच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून कोपरगावकडे निघाले होते.तेव्हा धोत्रे ते खोपडी रस्त्यावर अमोल बळीराम शिंदे याने त्यांच्यावर पाळत ठेवून आपल्या कारने (एम.एच.१७ सी.एच.९९१९) गागरे यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली होती.धडकेमुळे तिघेही खाली पडले.

तेव्हा अमोल शिंदे याने रावसाहेब गागरे यांचे अंगावरून दोन-तीन वेळेस कार मागेपुढे करून रावसाहेब गागरे यांचा खून केला होता.यात प्रवीण व प्रशांत हे सुद्धा जखमी झाले.दरम्यान सदर घटनेनंतर अमोल शिंदे पळून गेला होता.

दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात प्रवीण रावसाहेब गागरे (वय ३२) यांनी गुन्हा दाखल केला होता.त्यावरून अमोल शिंदे या आरोपी विरूद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३ (१), ३५२, ३५१ (२)(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यामुळे धोत्रे आणि परिसरात खळबळ उडाली होती.

दरम्यान या प्रकरणातील आरोपी अमोल शिंदे याचा शोध घेण्यासाठी तालुका पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली होती,तेव्हा आरोपी अमोल शिंदे हा वैजापूर येथील खासगी रूग्णालयात दाखल झाल्याची माहिती त्यांना मिळाली होती.तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी व त्यांचे पोलिस पथक वैजापूरला गेले होते.

यावेळी अमोल शिंदे याच्याही डोक्यास मार लागल्याने त्यास पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रूग्णालयामध्ये हलविण्यात आले असल्याची माहिती हाती आली होती.घाटी रूग्णालयात योग्य पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून डिस्चार्ज मिळताच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली होती.मात्र उपचाराच्या बहाण्याने त्याने रात्री धूम ठोकली असून तो परागंदा झाला आहे.त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button