Letest News
शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना हरतालिका पूजेच्या साहित्यात चक्क प्लास्टिकचे बदाम! शिर्डी पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल “गुन्हेगारीचे उदात्तीकरण आक्षेपार्ह रील्स अन् वाढीव साऊंड खपवून घेणार नाही!” — भारती-गलांडे यांचा मं... पत्रकार’ असल्याचे सांगत पाच हजारांची खंडणी!तहसीलदार-प्रांत अधिकाऱ्यांकडून कारवाई करवून घेण्याची धमकी समृद्धी महामार्गावर दरोड्याचा डाव उधळला! तलवार- कत्ती- पंक्चर करण्यासाठी खिळ्यांच्या फळ्या अन् बनावट...
क्राईमशिर्डी

गाडेकर यांच्या पेट्रोलपंपावर उभ्या मालट्रक मधून रात्री डिझेल चोरी 

शिर्डी (प्रतिनिधी) नगर मनमाड तसेच निमगाव बायपास त्याचप्रमाणे इतर रस्त्यांवर उभ्या ट्रक मधून डिझेलची चोरी करणारी टोळी परत सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. नुकतीच निमगाव कोऱ्हाळे येथील बायपास रस्त्यावर गाडेकर पेट्रोल पंपावर रात्री ट्रक उभी असताना त्यातील डिझेल ची चोरी झाल्याचा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

त्यामुळे ट्रक चालकांमधून मोठी चिंता व्यक्त होत आहे. या संदर्भात सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की शहादेव मथरदेव ढाकणे या ट्रक चालकांनी शिर्डी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे की,आपण ड्रायव्हिंग चे काम करुन कुटुंबाची उपजीवीका चालवतो.मी व मित्र अनंत बालाजी ठेंगडे रा. रांजणगाव, ता. शिरुर, जिल्हा पुणे हा कोण चालक आहे.

आम्ही दोघेजण भकंज पोटावळे रा. वाघोली ता. शिरुर जिल्हा यांचे मालकीचे दोन कंटेनर नं.एम.एच-12, पी.क्यु-7501, व एम एच बारा पी क्यू 76 98 हा दोघे चालवत घेवुन दि. 29/05/2025 रोजी दुपारी 03/00 वाजणेचे सुमारास निघालो .

आम्ही रांजणगाव ता. शिरुर जिल्हा पुणे येथुन कंटेनर मध्ये फ्रिजचा माल भरुन मी व माझा मित्र आनंत असे आम्ही दोन्ही कंटेनरमध्ये प्रत्येकी 200 लिटर डिझेल भरुन भोपाळ येथे फ्रिजचा माल खाली करण्यासाठी रांजणगाव ता. शिरून जिल्हा पुणे येथुन अहिल्यानगर ते मनमाड मार्गे घेवुन जात होतो.

त्यानंतर दि.30/05/2025 रोजी रात्री 01/30 वाजणेचे सुमारास निमगाव को-हाळे शिवार ता. राहाता जिल्हा अहिल्यानगर येथुन जात असतांना आम्हाला झोप येत असल्यामुळे आम्ही गाडेकर यांचे मालकीचे भारत पेट्रोल पंप येथे आतमध्ये दोन्ही कंटेनर लावून आम्ही थांबलो. त्यानंतर मी झोपून गेलो व माझा मित्र अनंत याने मोबाईल चार्जिंग ला लावल्याने पहाटे 03/00 वाजेपर्यंत जागुन मोबाईल चार्जिंग करुन तो पण झोपला.

त्यानंतर दि. 30/05/2025 रोजी सकाळी 06/00 वाजणेचे सुमारास आम्ही दोघे झोपेतुन उठुन फ्रेश होवुन आम्ही तेथुन जाण्यासाठी कंटेनर चालु केले असता दोन्हीही कंटेनरचे डिझेलचा काटा झिरो झालेला होता. त्यावेळी आम्ही डिझेल टाकी चेक केली असता टाकीमध्ये काहीही डिझेल शिल्लक राहीलेले नव्हते. कंटेनर नं. एम. एच-12, पी.क्यु-7501, आणि कंटेनर नं.एम.एच-12, पी.क्यु-7698 यांचे डिझेलचे टाकीतील डिझेल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेले होते.

त्यामुळे त्यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात यासंदर्भात अज्ञात भामट्यांविरोधात फिर्याद दिली असून या फिर्यादीनुसार शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 593/ 2025 नुसार भारतीय न्याय संहिता 2023 कलम 303( दोन) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शिर्डीचे पोलीस निरीक्षक गलांडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.

दरम्यान नगर मनमाड महामार्गावर तसेच निमगाव बायपास त्याचप्रमाणे पुणतांबा फाटा ते झगडे फाटा तसेच पुणतांबा फाटा ते पुणतांबा यादरम्यान त्याचप्रमाणे जुना नागपूर हायवे यावर ढाबा किंवा हॉटेलवर रात्री ट्रक उभी असताना उभ्या ट्रक मधून डिझेलची चोरी होण्याचे प्रकार परत वाढले आहेत.

माळ ट्रक मध्ये चालक लांब पाल्याचा प्रवास असल्यामुळे जादा डिझेल भरतात. रात्री उभ्या ट्रक मधून डिझेलची चोरी करणारे टोळी परत सक्रिय झाली असून या टोळीचा पर्दाफाश करावा. अशी मागणी आता मालट्रक मालक, चालकांमधून होत आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button