Letest News
दुसरे लग्न केल्याचा जाब विचारताच पतीकडून पहिल्या पत्नीला मारहाण! गुन्हा दाखल! बलात्कार करून, मुलाने ठोकली धूम! मात्र शिर्डी झाली हकनाक बदनाम साईभक्त महिलांप्रमाणेच आता स्थानिक महिलांच्याही गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांची धूम स्टाईल होवू लागल... शिर्डीच्या साई संस्थानमधील लाखो रुपयांच्या अपहाराच्या प्रकरणात याचिकाकर्त्या कुठलीही सक्तीची कारवाई ... शिर्डीत अपहरण करून एकाचा खून! या संदर्भात सात अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात! भरत मोरे यांच्या त्या" वादग्रस्त वक्तव्याचा वकील संघाकडून निषेध ! कोल्हार घोटी महामार्गावर कोकणगाव जवळ ट्रक व ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात! तीन ठार! सहा जण गंभीर जखमी! शिव,शाहु.फुले,आंबेडकर प्रबोधिनी समिती कडून शौकतभाई शेख सह सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान! तर मग साई संस्थान हाजी अब्दुल बाबा समाधी येथील देणगी व देखरेख स्वतःकडे का घेत नाही?--आ. संग्राम जगता... शिर्डीत व्हाइटनरची नशा करणाऱ्या तरुणांची वाढली संख्या! छत्रपती कॉम्प्लेक्स बनला त्यांचा अड्डा! आधार ...
शिर्डी

श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थेमध्‍ये ऑगस्‍ट २०२४ सत्राकरीता प्रवेश सुरु

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी संचालित श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था, शिर्डी या संस्‍थेमध्‍ये ऑगस्‍ट – २०२४ सत्राकरीता प्रवेश देणे सुरु आहे. या संस्‍थेमध्‍ये वेगवेगळया ११ व्‍यवसायांच्‍या २२ व्‍यवसाय तुकडयामध्‍ये प्रशिक्षण दिले जाते. ऑगस्‍ट – २०२४ सत्राकरीता प्रवेश क्षमता ३०४ इतकी आहे. सन १९८४ साली संस्‍थेची स्‍थापना झालेली आहे.या संस्‍थेमधील सर्व व्‍यवसायांना डीजीटी, नवी दिल्‍ली यांची कायमस्‍वरुपी संलग्‍नता आहे.सर्व व्‍यवसायांमध्‍ये अत्‍याधुनिक मशिनरीवर अभ्‍यास क्रमानुसार १००% प्रशिक्षण दिले जाते. याकामी असणारे सर्व प्रशिक्षक हे अनुभवी व उच्‍च विद्याविभूषित आहेत. सर्व प्रवेश प्रक्रिया ही संस्‍थेतील १००% प्रवेश क्षमतेच्‍या जागांवर महाराष्‍ट्र शासनाच्‍या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेने Online गुणवत्‍तेनूसार भरल्‍या जातात याकामी अत्‍यंत माफक शासनाच्‍या नियमानुसार प्रशिक्षण शुल्‍क आकारले जाते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


या संस्‍थेची उत्‍कृष्‍ठ निकालाची परंपरा असुन संस्‍थेमधील सात प्रशिक्षणार्थी आजपर्यंत देशात प्रथम आलेले आहेत व २३ प्रशिक्षणार्थी राज्‍यात प्रथम आलेले आहेत.संस्‍थेला केंद्र शासनाच्‍या सात वेळा वेगवेगळया ट्रेडमध्‍ये सर्वोत्‍कृष्‍ट संस्‍था पुरस्‍कार मिळालेले आहेत. प्रशिक्षण पुर्ण होण्‍याच्‍या अगोदरच संस्‍थेतील प्रशिक्षणार्थ्‍याची वेगवेगळया नामांकित कंपन्‍यामध्‍ये Campus Interview चे आयोजन करुन शिकाऊ ऊमेदवारी / नोकरीसाठी निवड केली जाते.महाराष्‍ट्र शासनाच्‍या तसेच केंद्र शासनाच्‍या वेगवेगळया शिष्‍यवृत्‍ती योजनांचा लाभ संस्‍थेतील प्रवेशीत प्रशिक्षणार्थ्‍यांना मिळण्‍यासाठी संस्‍थेकडुन मार्गदर्शन केले जाते. यांचा लाभ संस्‍थेतील बहुतांश प्रशिक्षणार्थ्‍यांना होतो.सन २०२२-२०२३ मध्‍ये जर्मन व जपान देशात डयुएल डिग्री अभ्‍यासक्रम व नोकरीकरीता या संस्‍थेच्‍या १३ प्रशिक्षणार्थ्‍यांची निवड झालेली आहे.


या सत्राकरीता ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्‍याची प्रक्रिया सुरु झालेली असुन दि.३० जून २०२४ पर्यंत ऑनलाईन प्रवेश अर्ज भरता येतील. याकामी श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थेत प्रवेश अर्ज भरण्‍यासाठी मदत व मार्गदर्शन केंद्र सुरु करणेत आलेले आहे.सर्व व्‍यवसायांसाठी १० वी उत्‍तीर्ण ही शैक्षणिक अर्हता आहे.

तरी जास्‍तीत जास्‍त विदयार्थ्‍यानी प्रवेश अर्ज भरुन ह्या सुवर्ण संधीचा लाभ घ्‍यावा असे आवाहन श्री गोरक्ष गाडीलकर, मुख्‍य कार्यकारी अधिकारी, श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी प्राचार्य, श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था, शिर्डी (फोन नं.०२४२३ २५८८५८) यांचेशी संपर्क साधावा.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button