Letest News
राहात्यात गर्भलिंग रॅकेटचा महाभंडाफोड-पुण्यापर्यंत पोहोचले धागेदोरे- राहता तालुक्यातील “मोठे मासे” र... साईदरबारात पुन्हा दिसली प्रामाणिकतेची झलक-१५ हजारांची पर्स साईभक्ताला सुखरूप परत इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैनस्नॅचिंग-श्रीरामपूरची टोळी जेरबंद-LCB ची धडाकेबाज कारवाई पाथर्डीत समता पतसंस्थेचा गाशा गुंडाळला? ठेवीदारांचे लाखो अडकले? पाथर्डीत एकच खळबळ समता पतसंस्थेच्या घोटाळ्यात ED ची मोठी एन्ट्री-अशोक खरातच्या लॉकरमधून कोट्यवधींचं घबाड “साईप्रसाद की भ्रष्टाचार?” प्रसादालयातील खरेदीवर गंभीर प्रश्नचिन्ह शिर्डीत फसवणुकीचा नवा डाव! गजराच्या नावाखाली भाविकांची लूट लोणीत गर्भलिंग निदान रॅकेटचा मोठा पर्दाफाश- आणखी १ डॉक्टरसह २ एजंट जाळ्यात निमगाव को-हाळे बायपासवर भीषण अपघात — कातोरे वस्ती हादरली! काका कोयटे हजर हो! SID ची नोटीस-समता पतसंस्थेत १००+ बोगस खाती?
अ.नगरशिर्डी

शिक्षक विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यात अपयशी ठरत असेल तर त्यांचा पन्नास टक्के पगार कमी करावा” केसरकर

शिर्डी (अहिल्यानगर) – “कोकणात उद्योग येण्याला आपला विरोध नाही. मात्र, कोकणातील बागायती क्षेत्राची आणि मासेमारी उद्योगाची हानी न करणाऱ्या उद्योगांची गरज आहे. ही आपली भूमिका कायम आहे”, असे माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याबद्दलच्या वक्तव्याचा माध्यमांनी विपर्यास केला आहे. उद्योगमंत्री असताना उदय सामंत जगभर फिरत असल्यानं त्यांना जगाचा अनुभव आहे. त्यात उपरोधीकपणा काहीच नसल्याची सावरासावर दीपक केसरकर यांनी करत वादावर पडदा टाकला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

माजी मंत्री दीपक केसरकर यांनी 26 डिसेंबर रोजी शिर्डीत येत साईबाबांच्या धुपाआरतीला हजेरी लावलीय. साई दर्शनानंतर माध्यमांशी बोलतांना केसरकर म्हणाले, ” मंत्री केले नाही म्हणून मी नाराज नाही. कोकण आणि मतदारसंघाच्या विकासासाठी लक्ष केंद्रीत केलं आहे.

आपण शालेय शिक्षण मंत्री असताना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मुंबईत मराठी भवन निर्माण करण्याचा निर्णय घेतला . आपण घेतलेले निर्णय पुढे नेण्याबाबतची भूमिका नवीन शिक्षण मंत्री ठरवतील. मात्र, केरळच्या धर्तीवर मुलांमध्ये स्कील डेव्हलपमेंट प्रोग्रॅम राबवण्याची गरज आहे,” असे केसरकर यांनी सांगितले. “शिक्षक विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यात अपयशी ठरत असेल तर त्यांचा पन्नास टक्के पगार कमी करावा,” अशी अपेक्षा केसरकरांनी व्यक्त केली.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button