Letest News
समता पतसंस्थेच्या कथित बनावट खातेप्रकरणी एसआयटीचा तपास वेगात? अशोक खरातच्या ताब्याची चर्चा-अनेकांमध्... श्रीरामपूरच्या गुन्हेगारी विश्वाला मोठा हादरा! १६ गंभीर गुन्ह्यांतील 'सोन्या बेग' अखेर जेरबंद प्रेमाच्या जाळ्यात पाच वर्षे अडकवून लाखोंची फसवणूक? लग्नाचे आमिष-शारीरिक संबंध आणि 13 लाखांसह 3 तोळे... कोपरगावच्या दुय्यम कारागृहाला अखेर टाळे-२० कैद्यांची कडेकोट बंदोबस्तात नाशिकला रवानगी शिक्षणातील आर्थिक साक्षरता' : योग्य माहिती असेल तर पैशांची अडचण ठरत नाहीशिक्षण महाग नाही… योग्य नियो... दीड लाखांचे दागिने आणि व्हिसा असलेली पर्स साईभक्ताला सुखरूप परत । सोन्याचे दागिने-व्हिसा अन् प्रामाण... कट्टर शिवसैनिक नानक सावंत्र यांची जिल्हा मुष्टीयुद्ध संघटनेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती-शिर्डीत अभिनंद... २२ महिने उलटले… तरीही ५९८ कामगारांना सेवा लाभ नाहीत मुख्यमंत्री फडणवीसांकडे डॉ. राजेंद्र पिपाडांची न... घरकुलाच्या अनुदानासाठी २० हजारांची लाच-ग्रामविकास अधिकारीसह तिघांवर एसीबीचा सापळा प्रेम-पैसे आणि 'खंडणी'चा गुंता-आता सत्य बाहेर काढणार तपास! शिर्डीत योगेश तिया प्रकरणाची जोरदार चर्चा
अ.नगरराजकीय

गणेशोत्सवात 7, 12 अन् 17 मद्यविक्री बंद

7th, 12th and 17th sale of alcohol closed during Ganeshotsav

गणेशोत्सव काळात दारु पिऊन धिंगाणा होऊ नये, किंवा दारु हे कुठल्याही अनुचित प्रकाराचे कारण ठरु नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी चक्क दारुबंदीचे आदेशच काढले आहेत. त्यानुसार, गणपती बाप्पांच्या आगमनाच्या दिवशी म्हणजे शनिवार 7 सप्टेंबर रोजी श्री गणेश चतुर्थी दिनी रत्नागिरी जिल्ह्यात दारुबंदी करण्यात आली आहे

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी सणासुदीच्या, गणेशोत्सवाच्या काळात तीन दिवस मद्यविक्रीला (Liquor) बंदी घातली आहे. त्यानुसार, शनिवार 7 सप्टेंबर रोजी श्री गणेश चतुर्थी दिनी, गुरुवार 12 सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरी विसर्जन आणि मंगळवार 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी या तीनही दिवशी जिल्ह्यातील सर्व किरकोळ देशी/विदेशी मद्य विक्री व ताडी/माडी विक्री अनुज्ञप्ती संपूर्ण दिवस बंद राहतील,

असे आदेश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले आहेत. यंदाच्या वर्षी 7 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2024 या कालावधीत गणेशोत्सव साजरा होणार आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने मुंबई मद्य निषेध अधिनियम 1949 चे कलम 142 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या

अधिकारांचा वापर करुन जिल्हाधिकारी सिंह यांनी शनिवार 7 सप्टेंबर रोजी श्री गणेश चतुर्थी, गुरुवार 12 सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरी विसर्जन, मंगळवार 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी या तीनही दिवशी जिल्ह्यातील सर्व किरकोळ देशी/विदेशी मद्य विक्री व ताडी/माडी विक्री अनुज्ञप्ती संपुर्ण दिवस बंद राहतील, असे आदेश जारी केले आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button